Skip to main content

प्रकटन

शेती ह्या विषयासाठी वेगळा विभाग असावा....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, गेली २०-२२ वर्षे मी शेती ह्या विषयावर माहिती गोळा करत होतो आणि अजूनही माहिती गोळा करत आहेच. मिपावर पण ह्या विषयावर बरेच लेख असावेत.पण "शेती" ह्या विषयासाठी स्वतंत्र विभाग नसल्याने, ह्या विषयावरील माहिती शोधतांना खूपच वेळ वाया जातो. सुरंगी, नाखू ह्यांनी ह्या विषयावर बरेच लिखाण पण केले आहे.

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला.

रहाट

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 03/07/2016 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
झुंजूमुंजू झालं कोंबडं आरवलं बामनाला जाग आली सडा सारवन पंचारती धडाडून चूल पेटली घुगऱ्या पुरण पोळी पहिला निवद अंबाबाईला मग येडाय रुकड्याय माळावरचा म्हसोबा शेवटून बाभळीखालचा वेताळ खांद्यावर जानवं हातात परात नैवैद्याची रिकामी, उदबत्तीचा धूर सुगंधी केवडा रामप्रहरी, रांगोळीतला मोर आणि हळदीकुंकू उंबरठ्याशी, शेणाचे गोळे ताटलीभर निवद वळचणीला, उनउन लाप्शी प्रसादाला बामन देवळात गेला घंटानाद अखंड दुग्धाभिषेक साडी चोळी खण ओवाळणी बाकी निर्माल्य, कपाळाला अष्टगंध पवित्र, याखेपेस गणपती वाटणीचा? नंदीबैलावर डोळा चिल्लर खुर्दा देवीचा 'वार' जणू दिवाळी दसरा फूलात फूल जास्वंदाचं मोगरा चमेली शोधून सापडेना सिता

चो..पली ३

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 01/07/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
चो.. पली बोलतोय, जरा त्रास देतोय परत "ओ.के. नावाला जागायला पाहीजे रे परेशान अली" हॅ हॅ हॅ. मला एक सांग ९२% मिळवलेल्या मुलाचे आय.आय.टी चे चान्सेस किती? "पवई कॉम्प चा चान्स ०.००३ टक्के नॉर्मल- भारत भर असलेल्या १७ आयआयटी मधे कुठलीही स्ट्रीम ०.३ टक्के" अग्गायायाया. जे आयला म्हणजे तुला भेटायलाच पाहीजे. " हे सुद्धा 'च' च्या बाराखडीत अडकला नाही तर" .................. तो आत आला. बाबा सुद्धा बरोबर होते. १.५ एकर शेती करणारा बळी राजा. दुष्काळी भागातला. कर्ज बाजारी.

चो..पली २

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 29/06/2016 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
खालील प्रकटन मतमतांतराचा आदर राखुन,२० वर्षाच्या अनुभवावर आधारित. प्रतिसादात आलेला विषय अ‍ॅप्टीट्युड टेस्ट. अशा सर्व कल परिक्षा "सर्वसकटीकराण" ह्या सदरात मोडतात. ग्रॉस जनरायलेझशन. एक पेपर, सर्वांना सारखा. त्या पेपरातल्या मार्कांवरुन कॉमर्स, आर्ट्स, सायन्स कसे काय ठरु शकते? मुलांना त्यांचे क्षेत्र निवडायची मुभा असते, असावी. गोंधळ असेल तर माहीती द्यावी. पण कुणी तरी ३ रा एका पेपर वरुन तुमचे भविष्य ठरवणार आणि तुम्हाला सांगणार की मुलगा उपकरण अभियंता होणार? कहर आहे कळप प्रव्रुत्ती चा. ......... " ए बाबा तुला काय करायचे आहे? जे काय करायचे त्याची माहीती गोळा कर.फक्त एक कर.

चो..पली

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 26/06/2016 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
चो... अरे पली बोलतोय " बोल रे" अरे तुला घरी भेटायचे आहे "काही खास" माझ्या पुतणीला तुला भेटायचे आहे. तीच्या मुलाला दहावीत ९२ % मार्क मिळाले आहेत. "व्वा व्वा, अभिनंदन" तु नसतास हे शक्यच नव्हते. ७२ वरुन डायरेक्ट ९२. तुझे पेपर्स आणि मार्गदर्शन एकदम बुल्स आय. पर्सनली भेटुन पेढे द्यायचे आहेत.कधी भेटशील. "येत्या रविवारी ७ वाजता स॑काळी" चालेल, तु काय बाबा बिझी माणुस. तो पर्यंत एक सल्ला हवा होता. आय आय टी ला चांगला क्लास कुठला रे? "हे राम" (मनातल्या मनात) नाही पुतणी दोन क्लासेस ला जाउन आली. अ चे इन्फ्रा सॉलिड आहे ब पण वाईट नाही. "मेलो मेलो"(म.... म...) रिझल्ट दोन्ही कडे आहे.

लॉजिक-जिम-लॉजिक

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 26/06/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिक-जिम-लॉजिक प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग प

पाऊस असा...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 24/06/2016 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी... पाऊस थोडा सुस्तावलाय आता. म्हणून तर पागोळीचं ठिबकणं इतकं छान स्पष्ट ऐकू येतंय...

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 22/06/2016 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार लोक्स! काय म्हणतंय तब्येतपाणी? व्यवस्थित? तर आमच्यायेथे - म्हणजे वाशीला - ऐन नव्या मुंबईत कट्टा करण्याचा पिलाण आहे. कार्य सिद्धीस नेण्यास श्री, टकाश्री आणि कट्टप्पा उर्फ मुवि हे समर्थ आहेतच. तरी मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड, डोंबिवली, ठाकुर्ली आणि जिथे जिथे मिपाकर आहेत तिथून सर्वांनी या कट्ट्याला येऊन मिपाधर्म वाढवावा अशी णम्र विनंती आहे. कोणी तगडा प्रायोजक मिळाल्यास आणंदी आणंद गडे नाहीतर तुझे तुझ्याकडे, माझे माझ्याकडे! च्यामारी लोक न्यूयाॅर्कात कट्टे करुन रायले ना बाप्पू! त्यामुळे आता एक जंगी कट्टा होऊनच जाऊ दे!