Skip to main content

प्रकटन

सोलापूरचे कुणी आहे का?

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 30/04/2016 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, कालच "मिळून सार्‍याजणी-दिवाळी अंक-२०१५" वाचला. त्यातील "सौर उर्जा शेती" ह्या विषयावरील "आय.आय.टी की डोंबल" हा अरूण देशपांडे लिखित लेख वाचण्यात आला. ही शेती अंकोले ह्या सोलापूर शहराजवळच्या गावांत आहे. आज श्री. अरूण देशपांडे ह्यांच्या बरोबर प्राथमिक बोलणे झाले. मी आणि आमची सौ.

आपल्या मालोजीचे कचकून अभिनंदन

लेखक प्रचेतस यांनी शनिवार, 30/04/2016 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी वर्तमानपत्र वाचायला उघडलं तर पहिल्याच पानावर आपल्या मालोजीची बातमी. शिवाजी महाराजांची दोन अस्सल चित्रे नेदरलॅण्ड्स आणि क्रोएशिया येथील संग्राहकांकडून मालोजीने मिळवून महाराष्ट्रात आणली. तुझा अभिमान वाटतो मित्रा. अधिक माहिती येथे पहा. a

मराठी भाषा प्रेमींचा कट्टा

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 29/04/2016 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, १ मे च्या महाराष्ट्र दिनानिमित्त मायमराठीवर प्रेम करणार्या लोकांचा सर्वसमावेशक कट्टा उद्या संध्याकाळी संभाजी उद्यान, पुणे येथे आयोजीत करण्यात आला आहे, ज्यात मराठी ब्लाॅगर्स, इतर मराठी संस्थळावरील आयडी हजेरी लावू शकतात. वेळ: शनि. दि. ३० एप्रिल २०१६, संध्याकाळी ५ ते ८ कट्ट्यानंतर रात्री सुकांताला आमरस थाळीचा पर्याय उपलब्ध आहेच. अधिक माहितीसाठी येथेही पाहावे.

सध्या आरसीसी बांधकामाचा खर्च काय आहे ?,तो कसा कमी करता येईल.?

लेखक चंद्रनील मुल्हेरकर यांनी मंगळवार, 26/04/2016 14:09 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या तीन गुंठे क्षेत्रफळ असलेल्या प्लॉटवर मी आरसीसी घर बांधणार आहे,घराचे एकूण क्षेत्रफळ १००० स्केअर फूट असणार आहे.मी तालुका प्लेसवर राहतो,माझे काही प्रश्न आहेत १. प्रती चौरस फूट बांधकामाचा खर्च सध्या कीती येतो? २. हा खर्च कमी करण्यासाठी काय करता येईल? ३. घर बांधतानाचे मिपाकरांचे अनुभव काय आहेत ? ईतर काही दुर्लक्षीत पण फायद्याचे अनुभव व आयडीया असतील तर तेही सांगा .धन्यवाद.

खुरटी झुडपं

लेखक जव्हेरगंज यांनी सोमवार, 25/04/2016 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
एका अवाढव्य शिळेला टेकून जरावेळ बसलो. त्याची तिरपी सावली अंगावर पडली. रखरखत्या आयुष्यात ओलावा दाटला. मग भरुन घेतली माती ओंजळीत, अन उधळून दिली आभाळात. थोडी डोळ्यात पण घुसली. मग झोळीनंच तोंड पुसलं अन उभारलो ठार वेड्यासारखा. पाठीत उसण भरली. गडद वीज खोल आभाळात जाऊन चमकली. ऐन दुपारी डोळ्यापुढं अंधारी आली. जीव घामाघुम झाला. एक पाय वाकवून हाडं मोडली तेव्हा कुठं उभारी आली. मग झोळी पाठीवर टाकून चालायला लागलो. त्या हिरव्या सपाट मैदानावर म्हटलं तर गवत तसं फारसं नव्हतं. खुरटी झुडपं मात्र बक्कळ. दूरवरचे डोंगरमाथे आभाळाला भिडणारे. उतारावरुन खाली घसरत गेलेल्या नागमोडी पायवाटा.

मरण!

लेखक DEADPOOL यांनी सोमवार, 25/04/2016 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
"अरे का तापलायेस माझ्यावर? या निष्ठुर जगातल्या लोकांनी दिलेले चटके कमी आहेत का! तु तरी घे एकदाचा जीव माझा!" म्हातारा आकाशकडे पाहुन बडबडत होता.

आईस्क्रीम, कुल्फी इ. इ. की आणखी काही?

लेखक पुणे मुंग्रापं यांनी सोमवार, 25/04/2016 07:57 या दिवशी प्रकाशित केले.
आपण जे खातो ते ‘तेच’ आहे का, असा प्रश्न आपल्याला सहसा पडत नाही, म्हणजे बटाटेवडा मागितला आणि मका पॅटीस समोर आले, तर ओळखतोच की पटकन! किंवा तेलपोळीला कुणी पुरणपोळी म्हणू लागले तर त्याला वेडयातच काढू की नाही?

ईशावास्य उपनिषदातला शांतीमंत्र

लेखक विवेक ठाकूर यांनी रविवार, 24/04/2016 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ विद्युत दाहिनीच्या प्रवेशव्दाराशी लावलेल्या ईशावास्य उपनिषदातल्या या शांतीमंत्राचा अर्थ... ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते। पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ ॐ शांतिः शांतिः शांतिः॥ तिथे लिहीला जावा अशी विनंती तिथल्या मुख्य स्टाफपैकी एकानं केली. जेणे करुन या गहन पण अत्यंतिक अर्थपूर्ण मंत्राचा उलगडा, तिथे येणार्‍यांना होईल. थोडक्यात, स्मशानातल्या विदारक मनस्थितीत, लोकांना मृत्यूच्या भयापासून राहत मिळावी असा हेतू आहे. वास्तविकात, आकाश हेच आपले स्वरुप असल्याने जन्म आणि मृत्यू देहाला आहे, आकाशाला नाही असा त्या शांतीमंत्राचा साधा अर्थ आहे.

जागतिक पुस्तक दिनः वाचन आणि आपण

लेखक नीलमोहर यांनी शनिवार, 23/04/2016 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
United Nations Educational, Scientific and Cultural Organization (UNESCO) ने १९९५ मध्ये २३ एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक दिन (World Book Day) म्हणून घोषित केला आहे. महान लेखक शेक्सपिअर तसेच इतरही अनेक नामवंत लेखकांना आदरांजली वाहण्यासाठी दरवर्षी हा दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. UNESCO तर्फे नामांकन करून, ठराव मांडून एक शहर एका वर्षासाठी 'जागतिक पुस्तक राजधानी' 'World Book Capital' म्हणून निवडण्यात येते, त्यानिमित्ताने वर्षभर तेथे अनेक उपक्रम राबवण्यात येतात. २०१६ साठी व्रोक्लॉ (पोलंड) या शहराची 'जागतिक पुस्तक राजधानी' म्हणून निवड झाली आहे. आपले दिल्ली शहर २००३ साली 'जागतिक पुस्तक राजधानी' होते. पुस्तक दिन लेखक आणि पुस्तकांना समर्पित केला गेला आहे. हा दिवस साजरा करण्यामागील प्रमुख हेतू म्हणजे
  • लेखक, प्रकाशक आणि प्रताधिकार यांचे महत्व अधोरेखित करणे.
  • लहान मोठे सर्वांमध्येच वाचनाची आवड निर्माण करणे.
  • ज्या लोकांनी लेखनाद्वारे मानवजातीच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी अमूल्य योगदान दिलेले आहे त्यांच्याप्रति आपला आदर व्यक्त करणे.

ध्वनी अनुदिनी - पुष्प - २ मुंबई ग्राहक पंचायत - अभिनव वितरण व्यवस्था

लेखक पुणे मुंग्रापं यांनी शुक्रवार, 22/04/2016 01:44 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व श्रोत्यांना सस्नेह नमस्कार, पहिल्या भागाच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल, तसेच प्रतिक्रिया/सूचनांबद्दलही धन्यवाद. या पुणे विभागाच्या अनुदिनी गटाच्या अभिनव प्रयोगाची पावले मिसळपाव.कॉम, मायबोली.कॉम, ऐसीअक्षरे.कॉम या मराठी संकेतस्थळावरही या निमित्ताने पडली हे विशेष. या सर्व संकेतस्थळांवरही या प्रयत्नाचे चांगले कौतुक झाले. व्हॉटस्अॅप सारख्या माध्यमातूनही या अनुदिनीच्या लिंक्स सर्वत्र फिरत होत्या हे या अभिनव ध्वनी अनुदिनीचे यशच म्हणावे लागेल.