जादूचं घर
माझ्या घरात कौलारू छपरातून एक तिरीप यायची. जमिनीवर निट वर्तुळ काढणारी. आणि तिच्यात असंख्य रंगीबेरंगी पऱ्या रहायाच्या. घराला माळा होता. त्यावर जुनी पुस्तकं , नारळ , भांडी, ट्रंका असं काहिही शोधताना खजिन्याचा मालक असल्या सारखं वाटायचं . लपाछपी च्या खेळात सतत जिंकवण्या साठी असंख्य जागा अपोआप तयार व्हायच्या . फटाक्यांची पिशवी अडकवायला फक्त ताई चाच हात पोचेल असा मोठा खिळा होता . चौकात आंधळी कोशिंबीर कितीही मुलं खेळू शकतील एवढी जागा होती. पडवी वरच्या सोप्या सारखा सुबक सोपा मी कुठेही बघितला नाही आणि पडवी वरच्या रांगोळी सारखी रांगोळी कधीही कुठेच सजली नाही .
मिसळपाव
त्याचं विचित्र वागणं आता सगळ्यांनाच माहिती झालं होतं. दिवसभर समुद्रावर भटकणार्या मोहनला लोक एव्हाना वेडा म्हणायला लागले होते. एकटा मुरुगप्पाच रोज रात्री मोहनला आपल्या घरी घेऊन जाई, जेवायला घाली आणि मुलासारखं थोपटून झोपवी. मित्रत्वाच्या व्याख्येपलिकडे जाऊन तो मोहनला जपत होता; बायकोचा रोष ओढवूनही. एका अशाच संध्याकाळी मुरुगप्पा मोहनला शोधत किनाऱ्यावर आला. मोहन वाळूत घर बनवत होता.
"काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले.
"हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले
"ऑल ओके?"
"हो" तोच स्वर
"ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला.
"कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले.
"वाटलंच होत मला!
आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा .
नवी मुंबईचं खारघर रेल्वे स्टेशन. मी रात्री मुंबईला जाणाऱ्या गाडीची वाट बघत होतो. स्टेशन वर त्यामानाने गर्दी नव्हती. इतक्यात समोरच्या प्लॅटफ़ॉर्मवर एक तरुण एका दहा - बारा वर्षाच्या मुलाला मानगुटीला धरून चालताना दिसला. मुलाच्या एकंदर अवतारावरून तो भिकारी दिसत होता. तो तरुण त्या मुलाला रेल्वे पोलिसांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. आत जाऊन त्याने दरवाजा ओढून घेतला. क्षणभर मी चरकलो. तळव्यांना घाम फुटायला लागला.