Skip to main content

क्रिकेट रेकॉर्ड - माझी ही एक जिलबी - भाग १ ...

लेखक चौकटराजा यांनी रविवार, 12/02/2017 19:44 या दिवशी प्रकाशित केले.

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत जे जे दारूण पराभव झाले त्यात एक निकष असा धरला की १ डाव व दोनशे धावा अशा किंवा यापेक्षा जास्त दारूण पराभव स्वीकारण्याचे पातक कोणी किती केले आहे ? तर खालील प्रमाणे माहिती मिळते...

ऑस्ट्रेलिया - ५ वेळा
भारत - ७ वेळा
विण्डीज ५ वेळा
इंग्लन्ड ४ वेळा
बांगला देश ७ वेळा
द आफिका २ वेळा
पाकिस्तान १ वेळा
न्युझीलण्ड ३ वेळा
झिम्बाब्वे ६ वेळा
श्रीलंका ३ वेळा

यात भारताचा जास्तीत जास्त वेळा असा पराभव कोणी करावा ?
परम्परागत शत्रू पाकिस्तानने की एके कालच्या बलाढ्य विन्डीजने
की सदा सामर्थ्यवादी ऑसीसने .... ?
उत्तर आहे ७ पैकी चार वेळा इंग्लंडने .

नेव्हील कार्डस म्हणत असत स्कोर बोर्ड हा गाढव असतो. त्याकडे कानाडोळा करून काही निष्कर्श.
१. पाकिस्तान मधे खरोखरच किलर इंस्टिन्क्ट आहे.
२. द आफिका बरेच वर्ष वाळीत टाकलेले असल्याने त्यांच्या फक्त २ आकड्यामुळे त्यांची वाहवा करायचे कारण नाही.
३. ऑसीसचे पराभव ५ पैकी ३ इंग्लंडने केले आहेत ते १९३८ पूर्वी.
४. श्रीलंकेचे ३ पराभव आहेत सबब ते किलर म्हणून कौतिकास पात्र ठरावेत.
५. बांगला देश व झिम्बाब्वे कमी क्रिकेट खेळूनही अधिक प्रमाणात दारूण पराभव स्वीकारलेले आहेत.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1567
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

चौरा,

हे दारुण पराभव घडवून आणणारे संघ कोणते? बक्कीने किती घडवून आणले? इत्यादि आकडेवारी वाचायला आवडेल.

आ.न.,
-गा.पै.


In reply to by गामा पैलवान

इन्ग्लन्ड १५ वेळा
ऑस्ट्रेलिया ९ वेळा
विन्डीज ४ वेळा
पाक २वेळा
न्यूझीलंड २ वेळा
श्रिलंका ६ वेळा
भारत २ वेळा
द आफिका ५ वेळा

सर्वात मोठा पराभव -जेता इन्ग्लंड- पराभूत ऑस्ट्रेलिया - १ डाव व ५७९ धावा चक्क.
सर्वात लहान पराभव -जेता ऑस्ट्रेलिया पराभूत इन्ग्लंड- १ डाव व २०० धावा.

भारताच्या मोठ्यात मोठ्या दारूण पराभवाचे कारण - सामना १ रोहन कन्न्हाय द्वोशतक गिल्ख्रिस्ट ९ विकेटस
सामना २ -डेनिस अमीस १८८ ख्रिस ओल्ड ९ विकेट्स
सामना ३ -जो रूट १४९ जोर्डन ६ विकेट्स
सामना ४- ऑलिस्टरकुक २९४ , अ‍ॅन्डरसन व ब्रोड ६/६ विकेट्स