Skip to main content

प्रकटन

सात खून माफ

लेखक जेपी यांनी गुरुवार, 12/01/2017 22:03 या दिवशी प्रकाशित केले.
रेल्वे आपला भोंगा वाजवत फलाट २ वर आली.रात्रीची १० वाजायला आलते. फलाटावर उतरलो तसा फुलारी समोर आला,सलाम ठोकुन माझ्या हातातील बॅगला हात घातला. "राहु दे आतली सुटकेस घे." किडमीडा फुलारी सुटकेस उचलत माझ्या मागे ओढत येत राहीला. मला त्याची पर्वा नव्हती,मरु दे साला.! ** १० वर्ष नंतर पुन्हा स्वत:च्या गावात आलतो. १० वर्षापुर्वी सोडल त्या पेक्षा फार बदलत नव्हत. गाडीत बसताना ताईच्या घरचा पत्ता दिला.

ट्रेलर समिक्षा : गौतमीपुत्र सातकर्णी.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 12/01/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
गौतमीपुत्र सातकर्णी. चित्रपटाचा ट्रेलर समिक्षा. दुसर्‍या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजघराणातल्या गौतमीपुत्र सातकर्णी ह्याच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक-काल्पनिक घटनांचा समावेश असलेला चित्रपट येत आहे. गौतमीपुत्र सातकर्णी म्हटल्यावर मला सर्वात आधी प्रचेतसभौ उर्फ वल्लीदा यांची आठवण झाली. केवळ त्यांच्यासाठी म्हणून हा धागा काढत आहे. ट्रेलरमधे दिसत असलेल्या कथानक, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा यांचा उहापोह करुयात. ट्रेलर आवडला.

जलदुर्गराज नामे सिंधुदूर्ग

लेखक कर्रोफर नमुरा यांनी गुरुवार, 12/01/2017 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
मराठ्यांच्या इतिहासात मराठा आरमाराचे स्थानही अतिशय महत्वाचे आहे. यादव साम्राज्य लयाला गेल्यावर पुढे तीनशेहून अधिक वर्षे भारतात पूर्णवेळ कार्यरत असलेले समुद्री आरमार नव्हते. आशियातील बलाढ्य सत्ता असलेल्या मुघल साम्राज्याने देखील दक्खन आणि दक्षिण भारताचा ध्यास घेतल्यानंतरही आरमार उभारण्याचा काही फारसा विचार केलेला दिसत नाही. मुघलांच्या थोडयाफार ज्या काही आरमारी मोहिमा झाल्या त्या हंगामी होत्या. अरबांनी व्यापारी जहाजे भाडेपट्टीने घेऊन त्यावर हत्यारबंद अरब व मुघल सैनिक चढवून काठाकाठाने काही मोहीमा झाल्या, त्या खोल समुद्रपासून लांबच राहिल्या.

तो राजहंस एक !

लेखक चिनार यांनी बुधवार, 11/01/2017 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
२००४-०५ चा तो काळ. भारतीय क्रिकेट संघ बऱ्यापैकी स्थिरावलेला. आता या संघात नवीन कुणी नको असं वाटायचं. आणि तो आला ! बलाढ्य शरीर, पिंजारलेले लांब सोनेरी केस, डोळ्याला गॉगल,आणि विकेटकीपरचे हेल्मेट ह्या अवतरामुळे त्याचा चेहरा कधी नीट दिसताच नव्हता. तो म्हणे भारताचा नवीन विकेटकीपर होता. नाव -महेंद्रसिंग धोनी! भारतीय क्रिकेटला विकेटकीपरची समृद्ध आणि लांबलचक अशी परंपरा लाभली आहे. दर दोन-तीन महिन्याला नवीन कोणीतरी यायचा. त्याच कारण म्हणजे भारतात विकेटकीपर हे नेहमीच एक स्वतंत्र संस्थान असायचं. त्यांचा काम म्हणजे चेंडू थोपवणं एवढंच! ह्या संस्थानिकांच्या हाती एकदा जरी बॅट दिली की संस्थाने खालसा व्हायची.

नीलकांत आणि प्रशांत, मनःपूर्वक अभिनंदन !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 10/01/2017 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
नवी थीम मोबाईल आणि कंप्युटर दोन्हीवर उत्तम चालते आहे. नवा फाँटसुद्धा वाचायला छान आहे. मिपासारखी सुरेख सुविधा नुसती पुरवण्याबद्दलच नव्हे तर ती वेळोवेळी अपग्रेड करण्याच्या तुमच्या मेहेनतीचं विषेश कौतुक ! नीलकांतनी काढलेल्या चर्चेच्या धाग्यावर प्रतिसाद न देता हा धागा मुद्दाम यासाठी काढला की मोठ्या चर्चेत असे प्रतिसाद हरवून जातात. इथे लिहायला आता पूर्वीपेक्षा जास्त मजा येईल हे नक्की. सध्या मिसळपाव हे मराठीतलं अत्यंत देखणं आणि मोस्ट यूजर फ्रेंडली संकेतस्थळ झालं आहे. सो थँक्स अ लॉट अँड ऑल द बेस्ट !

यंका - २

लेखक गवि यांनी सोमवार, 09/01/2017 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
यंका स्वप्नात आला होता की खरोखर जागेपणीच्या जगात हे मला स्वप्नातच असताना कसं कळणार ? ते तळघर आता अस्तित्वातच नाही. त्यामुळे मी उठून तिथे गेलोच तर ध्यानात असतानाच शक्य आहे. यंकाही मीच बनवलेलं काल्पनिक पात्र आहे. तो उठून खऱ्या आयुष्यात येणं शक्य नाही. आणि आत्ता मी ध्यानात नाही. म्हणजे स्वप्नच असणार.. असा अर्थ मी काढला. स्वप्नाशिवाय दुसरा कोणताही अर्थ मला झेपणारा नव्हता. तर.. यंका समोर पाटावर बसला होता तो उठून उभा राहिला आणि थेट मला म्हणाला "अशक्या. बास्टर्ड .. मोकळं कर मला." माझाच आवाज ..माझाच तुलपा.. तो माझा तुलपा की मी त्याचा ? मी भीतीने थरथरलो. मोकळं कर म्हणजे काय?

यंका - १

लेखक गवि यांनी सोमवार, 09/01/2017 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी लिहितोय. मीच लिहितोय. नक्की मीच. लाईट बंद करणार नाही. लाईट बंद केला की तो येतो. सध्यातरी चोवीस तास लख्ख प्रकाशात राहाणं भाग आहे. मला सांगितलं गेलं होतं की तुलपा हा तुमच्याच मनाची एक क्रिएशन असते. ती तुम्हाला कधीच त्रास देऊ शकत नाही. मला सांगितलं गेलं होतं की तुमचा तुलपा हा तुम्हाला कधीच वरचढ ठरत नाही. पण आता माझ्या बाबतीत तरी जे काही होऊन बसलं त्यामुळे माझ्या मनात ही भलती आयडिया घालणारा बेकारतुंबडी बास्टर्ड अशक्या तडफडून मरावा अशी मी इच्छा करत गेलो. आणि तो लगेचच बसच्या मागच्या चाकाखाली येऊन रक्त ओकत मेलासुद्धा.

पैसा झाला खोटा…

लेखक इरसाल कार्टं यांनी रविवार, 08/01/2017 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
पैसा झाला खोटा… मागच्या दोन महिन्यांपासून भारतभर नोटबंदीचा विषय ट्रेंडींग आहे, जवळ असलेले पैसे असे रातोरात गेलाबाजार झाले. कोणीही ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारेनसे झाले. पण मागच्या दोन वर्षाच्या काळात कामानिमित्त भारतभर(खासकरून उत्तर भारत) फिरताना मला नोटबंदी नसतानाही असले अनुभव आले होते, त्यातील काही… लखनऊ ला जात होतो, रेल्वेने. हि माझी दुसरी फेरी होती लखनऊ ला. सगळं व्यवस्थित पॅक केले आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन निघालो. रेल्वेने प्रवास करायचा म्हणजे मी जवळ कमीत कमी रोकड बाळगत असे. ए.टी.एम. आता बर्यापैकी स्टेशन्स वर उपलब्ध असल्यामुळे डेबिट कार्ड वापरणे मी सोयीस्कर मनात होतो.

काही ठिकाणे काही आठवणी-३ (पुणे विशेष भाग)

लेखक औरंगजेब यांनी शनिवार, 07/01/2017 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
सन २०१२-१३ मध्ये मी राज्यसेवा परीक्षेसाठी क्लास लावल्यामुळे पुण्यात राहायला होतो. त्यावेळच्या काही आठवणी. माझा क्लास म्हणजे नव्यापेठेतील चाणक्य मंडळ परिवार.आणी मी रहायचो ते पेरुगेटाजवळ. पेरुगेटचवळचे पुना बोर्डिंग म्हणजे माझी जेवणावळ. रोज तेथुन जेवण आणणे आणी खाणे यामुळे तेथील लोकांची छान(च) ओळख झाली. पेरुगेटवरुन मागे ज्ञानप्रबोधीनीकडे गेलं की त्या कॉर्नरला आनारसेवाला समोसे वाला आहे.त्याचे समोसे अख्या जगात ( पुणेकरांच्यामते)फेमस आहेत. बाजुलाच A1 का काय ते नाव आसलेला ज्युसवाला आहे. त्याचाकडे ज्युस/मिल्कशेक फार छान मिळतात. बाकी बादशाहीथाळी बद्दल मी बोलणे योग्य नव्हे.

RIP पंडित

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 06/01/2017 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
पंडित आताच तू गेल्याची बातमी वाचली आणी जाणवलं पुण्याशी आपुलकीने नातं असलेला अजून एका कलाकार गेला. कित्येक चित्रपटातून तू भेटत होतास अगदी विविध रोल्स मध्ये पण तुझं खास असं अस्तिव जाणवलं ते 'माचीस' मध्ये त्यातला 'सनातन' तू ज्या दहकतेने रंगवला आहेस त्याला तोड नाही. 'जंगल बुक' मधला 'बघिरा' कोण विसरू शकेल, त्या आवाजातच एवढी जरब होती कि बस्स..... अगदी कालपरवा तुझा 'मकबूल' पाहिला, त्यात नासिर बरोबरची तुझी जोडी झकासच होती. तुम्ही दोघही FTII च्या एकाच बॅच मधले असल्याने दोघांमधल जे को-ऑर्डिनेशन होतं, ते लाजबाब होतं.