Skip to main content

शुभकार्य..

लेखक वारा यांनी शनिवार, 21/08/2010 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक शुभकार्य थोड्याच दिवसात येउ घातलेल आहे. यानिमीत्ताने काहीतरी दान धर्म करावा अशी इच्छा मनात घर करु लागली आहे. त्याचबरोबर हे दान धर्म सर्वसमावेशक असाव, व कुठल्या स्पेसिफीक वर्गाला किंवा व्यक्तीला याचा लाभ मिळणे मर्यादीत न राहता बहुजनास लाभ मिळावा अशी इच्छा आहे. माझ्या मते काही पर्याय सुचत आहेत ते खालीलप्रमाणे, १) स्मशानभुमी व तेथील जागेमधे गरज असणारे एखादे उपकरण. उदा. पाण्यासाठी कुलर, लाकडे वाहण्यासाठी ट्रॉली, ई. कारण : या जागी येण्याचा योग कधी येतो हे सर्वांना माहीती आहेच, अशा प्रसंगी एखादी गोष्ट मिळाली नाही तर लोकांना मनस्ताप फार होतो. २) पी. एम.

विदेशी दिनदर्शिकेसंबंधीत माहिती

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 10/07/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
आय टी उद्योगच नव्हे तर आजकाल सगळ्याच उद्योगांत काम करतांना बर्‍याचदा पाश्चात्य देशांशी संबंध येत असतो. त्या कारणाने तेथील वेळा, सण वार, सुट्या, राष्ट्रिय सण, समारंभ, स्थानिक सुट्या आदी असल्या तर त्या भारतात राहून समजत नाही. येथे अनेक सदस्य आयटी/ अन्य कारणाने भारताबाहेर वास्तव्यास आहेत. माझी एक विनंती आहे की त्यांनी त्या त्या देशातल्या वर उल्लेखिलेल्या सुट्यांचे वेळापत्रक सरकारतर्फे जाहिर झालेले वेळापत्रक म्हणा किंवा त्याशी संबंधीत संस्थळ किंवा दिनदर्शिका असेल तर ते येथे द्यावे जेणे करून येथील अनेक सदस्यांना त्याचा उपयोग होवू शकेल.

मिपावर प्रसिद्ध कसे व्हावे ?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 21/06/2010 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
डीसक्लेमर :- खालील लेखन हे मौजमजा, विरंगुळा म्हणुन केले आहे. ह्या लेखात व सार्वजनीक जिवनात काही साम्य आढळल्यास तो एक योगायोग समजावा. खालील युक्त्या ह्या गंमत म्हणुन दिल्या आहेत, त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करु नये, तोंडावर पडल्यास लेखक अथवा मिपा जबाबदार नाही. "पर्‍या , यार मिपावर कोण विचारत नाही बे आपल्याला. इतके लेखन केले, प्रतिक्रीया दिल्या पण चार सदस्य पण धड ओळखत नाहीत." आमचे मित्रवर्य उद्वेगाने म्हणत होते.

महिला कारागृहात काही तास

लेखक अरुंधती यांनी सोमवार, 24/05/2010 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
आजची काही माझी तुरुंगातली पहिली वेळ नव्हती. ह्या आधीही दोनदा आले होते मी इथे. पण दोन्ही खेपेस जरा घाईगडबडीत होते. ह्या वेळेला मात्र ठरवले होते की निवांतपणे जायचे. गेल्या खेपांमध्ये फक्त स्त्री कैद्यांच्या बराकी, भटारखाना आणि रोजगार प्रशिक्षणाची पत्र्याची शेड एवढाच परिसर ओझरता पाहिलेला. त्या भेटीत पाहिलेल्या बराकींमध्ये भिंतीलगत गुंडाळून ठेवलेल्या वळकट्या व दोर्‍यांवर लटकणार्‍या कपड्यांखेरीज ओक्याबोक्या भिंती होत्या फक्त!

कळकळीचे आवाहन - मदत

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 15/05/2010 14:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र मैत्रिणिंनो, तुम्ही सगळेच मोठ्या मनाचे आहात. ह्या न त्या कारणाने तुम्ही मदत करता मग ती कुठलीही असो हे हल्लीच सिद्ध झाले आहे. मला सुध्दा एक मदत अपेक्शित आहे. क्रुपया chuchu.marathe10 ह्या माझ्या आय्डीला तुमची शेजारीण म्हणुन तुमच्या शेतात अ‍ॅड करुन घ्या. मला माझे शेत अपग्रेड करायचे आहे. तुम्हाला मी गिफ्ट म्हणुन ह्यान त्या हस्ते ३% आपलं हे न ते काहितरी गिफ्त पाठ्वत जाइन. तुमची, (कश्टकरी) चुचु

बेस्ट ऑफ बेस्ट गाणी

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 16/04/2010 17:22 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अंताक्षर्‍या (मिक्स/मराठी), शिणेमे (आवडते/नावडते) यांना उत आलाय. पब्लीक उत्साहाने भाग घेउन भरगोस प्रतिसाद बी द्येतय.. म्हनल आपुन बी हात धुन घावा ;) इथे तुम्हाला आवडणारी मराठी/हिंदि गाणी नमुद करा. पण लेको तुम्हाला खालच्या वर्गवारीतल सर्वात जास्त आवडणार एकच गाण द्यायचय बर. (इतक्या आवडणार्‍या गाण्यातुन एकच निवडाच म्हणजे कठीण आहे. पण करा प्रयत्न) या माहितीचा मला माझ्या संकलना साठी उपयोग होइलच इतर गरजुं नाही होईल. गाणी: युगुल गीत : प्रेम गीत : विरह गीत / सॅड साँग: गायकाच्या आवाजातल : गायीकेच्या आवाजातल : माझी चॉईस : युगुल गीत : तुझ्या गळा माझ्या गळा..

मजेमजेशीर हँगओव्हर निवारण उपाय!

लेखक अरुंधती यांनी रविवार, 11/04/2010 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वर पार्टी रे पार्टी पाहिल्यावर माझ्या मनात विचार सुरु झाले..... बिच्चारे पार्टीजीव!!! :S आधी पार्टी पार्टी करत ढोस ढोस ढोसतील आणि दुसर्‍या दिवशी डोकं धरून बसतील. मग दुखर्‍या डोक्यानं घरात बायको, पोरं, हापिसात हाताखालचे लोक आणि सहकारी ह्या सर्वांवर चिडचिडाट करतील.... सर्वांचाच दिवस खराब होऊन जाईल!!! : हँगओव्हर हा प्रकार टाळता येऊ शकतो असा सल्ला/ मत अनेक आहारतज्ञ व डॉक्टर्स प्रदर्शित करतात. त्याचे गमक तुम्ही मद्यपानाच्या अगोदर खाणे, मद्यपानादरम्यान पाणी पीत राहणे व मद्यपानानंतर काही ठराविक पथ्ये पाळणे [उदा.

माझी निघाली वार्‍यावरची वरात: पुढील मदत हवी आहे

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/04/2010 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मागच्या वर्षी मी एक घरगूती पवनचक्की बनविण्याचा प्रयत्न केला. खेळण्याची मोटर वापरून केलेली पवनचक्की एक खेळण्यातील डिसी मोटर वापरून एक पवनचक्की केली. त्यात थोड्याप्रमाणात मिली व्होल्टस मध्ये डिसी व्होल्टेज जनरेट होत होते. हे कमी प्रमाणातील व्होल्टेज पुढे बॅटरीत साठवता येईल का? त्यासाठी एखादा रेडीमेड बॅटरी चार्जर असतो तो वापरला तर चालेल काय? पुढील दिशा कशी असावी? आपल्यापैकी कुणी यात प्रयोग केला आहे का? माझा प्रयत्न हा एखाद्या शाळेत वापरण्यासाठी केलेला प्रयोग आहे.