Skip to main content

उपाय सुचवाल ?

लेखक उगा काहितरीच यांनी शुक्रवार, 11/03/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मी सरकारी निवासस्थानात राहतो. (क्वॉर्टर) मागच्या काही दिवसांपासुन आमच्या शेजा-याने एक बोका पाळला आहे. तो बोका कधिच बांधलेला नसतो. रात्री तो माझ्या गाडीच्या (Honda cb twister) कव्हर मध्ये जाउन झोपतो. त्यामुळे गाडीच्या सीटला, टाकीला ओरखडे पडले /पडतात. त्या शेजा-यांना बरेचदा सांगुन पाहीले. परंतु काहिच उपयोग नाही. त्या बोक्याला मारायला गेलो कि तो पळुन जातो. काही केल्या हातात येत नाही. गाडीवर कव्हर टाकणे अत्यावश्यक आहे. (नाहीतर पेट्रोल गायब) यावर मिपाकरांच्या सुपीक डोक्यातुन काही उपाय निघतील काय ?

लै समस्या

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 14/02/2011 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
शेतीची मशागत करतांना, ती फुलवताना फळवतांना अनेक समस्या उद्भवू शकतात. जसे की वाफ्याचा बांध फुटणे. ही एक नेहमी आढळणारी कॉमन समस्या आहे. जमिनीच्या पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर ते अवलंबून असलं तरी योग्य प्रयत्नांनी आपल्याला आपले अवखळ पाणी थोपवून ठेवणे जमू शकते. बांध फुटणे ही एक नैसर्गिक प्रक्रियाच. पाण्याचा लोड वाढला, पाटातून पाणी बेफाम वाहू लागले किंवा वाफाच जर कमी उंचीचा असेल तर बांध हा फुटणारच. कमालीचा उमाळा येऊन किंवा भुसभुशीत मातीचा संग लाभल्यामुळे पाणी थोपवून धरणे जिकीरीचे बनते. अशा उस्फुर्त प्रसंगी बांध फटाफट फुटणे अपरिहार्य ठरते.

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे च अगदी मोबाईल नंबर सहित.

PAN ची गंमत

लेखक गौरव व्यवहारे यांनी बुधवार, 09/02/2011 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला ही गोष्ट बरिच उशिरा कळली, आता CA असुनही ही गोष्ट एवढ्या उशिरा कळणे म्हणजे खरच लाज आहे, पण म्हणतात ना Its never too late. तर ठिक आहे, तर गंमत अशी की तुम्ही तुमचा PAN ज्याला काही लोक PAN नंबर सुद्धा म्हणतात, आता पॅन म्हणजे Permanant Account Number मग त्याला पुन्हा नंबर का म्हणायचे, काही लोक tds कापला का अस म्हणतात, आता tds म्हणजे tax deducted at source, मग अजुन काय कापणार आहे त्यात, हे म्हणजे दळण दळुन आणल्या सारखे आहे.

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग १

लेखक अवलिया यांनी शनिवार, 05/02/2011 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपण अनेक लेख कविता वाचत असतो. त्यातील व्यक्तीरेखा आपल्या मनात घर करुन बसलेल्या असतात. कित्येकदा बोलता बोलता समोरच्या व्यक्तीचे बोलणे किंवा लेखन वाचून आपण आधी कधी वाचलेल्या कथेतील व्यक्तिरेखेशी असलेले साम्य शोधतो. कित्येकदा तसे बोलुनही दाखवतो. पण जर आपल्याला असे सांगितले की ती व्यक्तीरेखाच तुम्ही आहात असे कल्पुन त्या व्यक्तिरेखेचे मनोगत किंवा मनोव्यापार लिहा तर आपल्यापैकी किती जणांना ते जमेल? मला नाही फार हात वर होतील. एखादी व्यक्तीरेखा आपण तयार करुन उतरवणे वेगळे आणि दुसर्‍याने तयार केलेली व्यक्तीरेखा आपण पुन्हा लिहिणे वेगळे. हे येरागबाळ्याचे काम नोहे.. तेथे पाहिजे जातीचे !

लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन

लेखक चिंतामणी यांनी शनिवार, 22/01/2011 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न करणां-याना तज्ञ माणसाचे मार्गदर्शन अर्थात पुन्हा एकदा अभीनंदन आजच्या सामनात पुन्हा एकदा आपले आघाडीचे सभासद प.रा उर्फ प्रसाद ताम्हणकर याचा एक लेख प्रसीध्द झाला आहे. विषय आहे. "लग्न डॉट कॉम" लग्नाळुंना प.रा.ने मार्गदर्शन केले आहे. प्रथमतः त्याचे पुन्हा एकदाअभीनंदन. सामनात फुलोरावर क्लिक करा आणि इच्छुकांनी मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. (इतरांनी काय करायचे हे मी सांगायला नको) http://www.saamana.com/

सावधानः महत्वाची सूचना

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 28/12/2010 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो आज मला माझ्या जीमेल अकाउन्टवर एच डी एफ सी ब्यान्केकडून एक ईमेल आले त्यातील मजकूर खालील प्रमाणे त्या मेल चे शीर्षक होते HDFC Third Party error code HDFC442190X!! पाठवणाराचा पत्ता होता HDFC Customer Care एच डीफची ब्यान्केचा लोगो इमेज पटकन आली नाही.

मदत हवीय

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 23/12/2010 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मला तातडीने काही औषधी अमेरिकेतून मागवायची आहेत. साधारण १५ दिवसात ही औषधी मागवायची आहेत. मिपाकरांपैकी कुणी किंवा मिपाकरांच्या ओळखीपैकी कुणी जर येत्या १५-२० दिवसात भारतात येणार असेल (पुण्यात येणार असल्यास अधिक उत्तम) तर कृपया मला सांगा. औषधी सोबत आणण्यात काही अडचण नसेल तर खूप मदत होईल. धन्यवाद, समीर