Skip to main content

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात- भाग ३ विजेची निर्मिती

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 25/12/2013 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
Power Stations मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान मागील भागावरून पुढे चालू ... काही विशिष्ट रसायनांमध्ये दोन भिन्न धातूंचे कांब (रॉड किंवा इलेक्ट्रोड्स) बुडवून ठेवले आणि त्या कांबांना तांब्याच्या तारेने जोडले तर त्याम

आणि रजनीकांत रडला - धूम ३

लेखक मृत्युन्जय यांनी रविवार, 22/12/2013 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
१८ मे १९७४ भारतीय इतिहासात एक अतिशय क्रांतिकारक घटना घडली. पोखरण मध्ये पहिली अण्वस्त्र चाचणी घेण्यात आली आणि भाभा अणुसंशोधन केंद्राच्या प्रमुखांनी डॉ. होमी सेठनांनी पंतप्रधानांच्या सचिवांना दूरध्वनीवरुन ही रोमांचकारक बातमी देताना सांकेतिक भाषेत सांगितले "आ़णि बुद्ध हसला. काही लोकांच्या मते "आणि बुद्ध हसला" वगैरे असे काही सांगितले गेले नाही. ही नंतर बुद्धजयंतीचे निमित्त साधुन काही लोकांच्या डोक्यातुन निघालेली सुपीक कल्पना असेल. डिसेंबर २०१३ मध्ये एक अशीच अजुन एक क्रांतिकारक घटना घडली. धूम ३ प्रदर्शित झाला.

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग २ ऊर्जेचे उगमस्थान

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 22/12/2013 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज मागील भागावरून पुढे चालू ... आपल्या रोजच्या ओळखीचे परंपरागत ऊर्जेचे काही प्रकार आपण पहिल्या भागात पाहिले. पण आपल्याला यांच्याबद्दल कितीशी माहिती असते? आपल्या हातापायांमधले बळ आपल्याला खाण्यापिण्यामधून मिळते एवढे सगळ्यांना माहीत असते. लाकूड जाळल्याने जशी आग निघते त्याचप्रकारे पण एक सौम्य आग (जठराग्नि) आपल्या पोटात तेवत असते आणि त्या अग्नीला अन्नाची आहुती देतांना आपण एक यज्ञ करत असतो असे 'वदनि कवळ घेता ..

ऊर्जास्त्रोतांच्या शोधात - भाग १ - ऊन, वारा, अग्नि आणि वीज

लेखक आनंद घारे यांनी शनिवार, 21/12/2013 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
"या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता । नमस्तसै नमस्तसै नमस्तसै नमोनमः।।" असे देवीच्या प्रार्थनेतल्या एका श्लोकात म्हंटले आहे. "सर्व प्राणीमात्रांमध्ये शक्तीच्या रूपाने निवास करणा-या देवीला नमस्कार." असा या श्लोकाचा अर्थ होतो. 'शक्ती' या मराठी शब्दाचा रूढ अर्थ बराच मोघम आणि व्यापक आहे. मंत्रशक्ती, तंत्रशक्ती, दैवी शक्ती, इच्छाशक्ती वगैरेंचासुद्धा त्यात समावेश होतो. 'शक्ती' या शब्दाचा उपयोग 'सामर्थ्य' या आणखी एका मोघम अर्थाने सुद्धा केला जातो. पण हा लेख विज्ञानासंबंधी असल्यामुळे 'तशा' प्रकारच्या शक्तींना यात स्थान नाही.

चीनला हवीत मुले

लेखक अमित खोजे यांनी शुक्रवार, 20/12/2013 03:36 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीपासून आपल्या देशातली घाण आणि भ्रष्टाचार याला आपली लोकसंख्या जबाबदार आहे हा विचार माझ्या डोक्यात अगदी पक्का बसला होता. नेहमी मला वाटायचे कि अमेरिकेत असते तशी स्वच्छता, टापटीपपणा, कमी भ्रष्टाचार, वाहतुकीच्या नियमांची अंमलबजावणी हे सर्व आपल्याकडे का नाही तर जनसंख्या. एवढी लोकं असताना कुणाकुणाला आणि कधी शिस्त लावणार? त्यामुळे आपल्या देशात जर चीन सारखी "हम दो हमारा एक" अशी योजना जर केली तर किती बरे होईल!

स्मरणीय " संध्या" - एका कट्ट्याची कहाणी

लेखक चौकटराजा यांनी गुरुवार, 19/12/2013 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर आपण सारे मुख्यत" दोन गोष्टीसाठी येतो .व्यक्त होण्यासाठी व व्यक्त झालेल्याना प्रतिसाद देण्यासाठी. प्रिट मिडीयाचे मालक, संपादक निरनिराळ्या ईझम्सचे रंग फासून वावरत असतात. सुदैवाने मिपा सारखे माध्यम असा कोणताही एकच रंग घेऊन वावरत नाही. मिपा हे व्यक्तीगत आयुष्यातली कसे भिनत जाते याचे प्रत्यंतर आम्हा काहीना येणार होते. १७ डिसेंबर २०१३ ची संध्याकाळ काही पुणेकरांसाठी एक अचानक जमलेला कट्टा या स्वरूपात अवतरली. अत्यंत अल्प काळात आपल्या दर्जेदार लेखनाने मिपाप्रिय ठरलेले श्री इस्पिक एक्का हे पुण्यात आले आहेत असे ब्याटम्यान याना कळले.

हठयोग- कुंडलिनी (१)

लेखक शरद यांनी मंगळवार, 17/12/2013 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
कुंडलिनी...हठयोग मागे पातंजल योगशास्त्रावर लेख लिहला होता तेव्हा कांही जणांनी कुंडलिनी बद्दल विचारणा केली होती. आज आपण त्या संबंधी थोडी माहिती पाहू. सर्व जण मान्य करितात की ब्रह्माचा-परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात वास करत असतो. पण जीवाला त्याची जाणिव नसते. अद्वैत तत्वज्ञान सांगते की मायेचा पडदा जीवावर अज्ञानाचे झापड घालतो. हा पडदा दूर केला की जीवाला आपण ब्रह्मच आहो याची जाण होते. हठयोगात हे जरा निराळ्या पद्धतीने सांगितले आहे. त्यांनी "कुंडलिनी" नावाची एक शक्ती प्रत्येकाच्या शरीरात वास करीत असते असे मानले. ही शक्ती निद्रित असते.

मला आवडलेली शेअर ट्रेडिंग पद्धत....

लेखक ज्ञानव यांनी शनिवार, 14/12/2013 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रेडिंगला सुरुवात कशी करावी? त्याला साधा सोपा अभ्यास काय ? तांत्रिक (आणि त्या मागील मांत्रिक )विश्लेषण बाजूला ठेऊन जर सुरवात करायची असे असेल तर एक सोपी पद्धत खालील प्रमाणे :- कंपनी : बँक ऑफ इंडिया वर्ष : २०१३ महिना ------- उच्च पातळी (हाय) ............ नीचतम पातळी (लो) जानेवारी ------- ३९३ ............ ३३२.४०(अ) फेब्रुवारी ------- ३५८.५० ............ ३१२.१० मार्च ------- ३३०.७० ............ २८१.९० एप्रिल ------- ३४५.८० ............

Cognitive Dissonance ची थेअरी

लेखक कुमारकौस्तुभ यांनी बुधवार, 11/12/2013 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
सानंदा चा कल्ट मानसशास्त्रज्ञ लिऑन फ़ेस्टींजर ने ही कॉग्नीटीव्ह डिसोनन्स ही थियरी विकसित केली. त्याच्या उगमाची कथा इंटरेस्टींग आहे, १९५६ मध्ये प्रकाशीत त्याच्या व्हेन प्रॉफ़ेसी फ़ेल्स या पुस्तकात ही विस्ताराने दिलेली आहे ती अशी. मारीयो कीच या लेकसीटी मिनिओपोलीस मध्ये राहणारया एका साध्या गृहीणीला अचानक एक दिवस एक मेसेज सानंदा नावाच्या देवाकडुन आला, की २१ डीसेंबर च्या मध्यरात्री अटलांटीक महासागरात प्रलय होईल आणि संपुर्ण जग त्यात बुडुन जाईल, अवघा रशिया तर एक समुद्र होऊन जाईल इ.