Skip to main content

ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी मंगळवार, 11/02/2014 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला लेख: Autism.. स्वमग्नता.. http://www.misalpav.com/node/26984 ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?

Autism.. स्वमग्नता..

लेखक स्वमग्नता एकलकोंडेकर यांनी सोमवार, 10/02/2014 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात  व अचानक तुम्हाला एका बर्‍यापैकी मोठ्या दिसणार्‍या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून  हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या  मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..

जीवनगाणे - २

लेखक सुधीर कांदळकर यांनी शुक्रवार, 07/02/2014 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
जीवनगाणे - १ ******** डोरोथी क्रोफूट हॉजकिन: DOROTHY CROWFOOT HODGKIN. प्रोटीन क्रिस्टलोग्राफीची (Protein Crystallography) जननी. जन्म: कैरो, इजिप्त येथे १२ मे, १९१०. मृत्यू शिप्स्टन ऑन स्टूर, इंग्लंड इथे २९ जुलै १९९४ रोजी. सामान्यतः शास्त्रीय चरित्रकारांना उत्तम चारित्र्य आणि सखोल विज्ञान यात फारसा परस्परसंबंध आढळत नाही. अर्थात यालाही काही अपवाद आहेतच.

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 05/02/2014 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

पंडित भगवानलाल इंद्रजी

लेखक राही यांनी मंगळवार, 04/02/2014 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
The Asiatic Society of Bombay च्या Gallery of Excellence या नावाच्या एका प्रकाशनामध्ये पण्डित भगवानलाल इंद्रजी यांच्या विषयी एक चरित्रात्मक लेख आहे. हे लिखाण प्रताधिकाराखाली असल्याने थेट भाषांतर देता येणार नाही, पण कदाचित गोषवारा देता येईल. पंडित भगवानलाल यांचा जन्म ७-११-१८३९ रोजी सौराष्ट्रातील जुनागढ येथे झाला. तिथे त्या काळी इंग्रजी शिक्षणाची सोय नव्हती. पण संस्कृत भाषा आणि आयुर्वेदउपचारपद्धतीचे शिक्षण मात्र त्यांना मिळाले. गिरनारच्या वाटेवरील पाषाणलेखाने लहानपणीच त्यांना या विषयी कुतूहल निर्माण झाले आणि पुढे पुराभिलेख आणि नाणकशास्त्राचा अभ्यास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय बनले.

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत....!!!

लेखक विनोद१८ यांनी सोमवार, 03/02/2014 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, श्रीमान मुक्त विहारि यांच्या वनंतीने मी या कट्ट्याचा व्रूत्तांत लिहीत आहे, मिपावर लिहीण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. (काही चूक झाल्यास माफ करावे, ही विनंती.) ठरल्याप्रमाणे हाही कट्टा अगदी व्यवस्थित पार पडला, सगळे म्हणजे श्री. व सौ. हेमांगीके, अजया, मुक्त विहारि, सुबोध खरे, रामदास काका, सूड, भटक्या खेडवाला, भाते इ.

डोंबिवली कट्टा.... हेमांगी के... ह्यांच्या समवेत...

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 28/01/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा वरील एक आदरणीय व्यक्तीमत्व (हेमांगी के) सध्या भारतात आल्या असून, एक,दोन फेब्रूवारीच्या सुमारास त्या डोंबिवलीला आहेत. नक्की वेळ,तारीख आणि ठिकाण (अर्थात डोंबिवली मधीलच) त्यांना विचारून ३१ ता.च्या सुमारास ठरेल. पुरुष मंडळींपैकी ज्यांना यायचे असेल, त्यांनी मला व्य.नि. करावा, ही विनंती. भगिनींनी, अजया ताईंना व्य.नि. करावा. पुढील रंगतदार कट्यांची घोषणा लवकरच.

अवकाशाचा वेध १ : सप्तर्षी व कृष्ण विवर

लेखक आयुर्हित यांनी सोमवार, 27/01/2014 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीच्या वेळी आकाशात दिसणारे सप्तर्षी उर्फ Big Dipper म्हणजे हे वेद व पुराणात उल्लेखलेले सात प्रमुख ऋषी. आकाशात जे सप्तर्षी नावाचे सात तारे दिसतात त्यांची नावे :
  1. अंगिरस (Epsilon of Ursa Major)
  2. अत्रि (Delta Ursae Majoris)
  3. क्रतु (Dubhe; Alpha of Ursae Majoris)
  4. पुलस्त्य (Gamma Ursae Majoris)
  5. पुलह (Merak; Beta Ursae Mejoris)
  6. मरीचि (Alkaid; Benetnasch; Eta Ursae Majoris)
  7. वसिष्ठ (Mizar; Zeta Ursae Majoris).

काय..? कुठे..? कधी..? (मुंबई व उपनगरे)

लेखक मोदक यांनी शुक्रवार, 24/01/2014 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनेकदा आपल्या शहरात आयोजीत झालेले विविध कार्यक्रम, प्रदर्शने, ऑटो एक्पो, इंडस्ट्रीयल एक्पो, फूड फेस्टीवल्स, म्युझीकल फेस्टीवल्स; आपल्याला "अरे तो कार्यक्रम काल / परवा / मागच्या आठवड्यात झाला!!" अशा स्वरूपात कळतात. (आणि सांगणारेही "खूप भारी कार्यक्रम झाला!" असा पावशेर ठेवून "इनोविच्छाप्रदर्शक" जळजळ घडवतात) तर.. मुंबई व उपनगरांमध्ये होणार्‍या अशा कार्यक्रमांची माहिती या धाग्यावर एकत्र होवूद्या.

औषध

लेखक मोक्षदा यांनी शुक्रवार, 24/01/2014 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
हल्लीच महाराष्ट्र राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्तांनी लिहिलेला एक लेख वाचनात आला. त्यातील काही महत्त्वाचा भाग सर्वांच्या माहितीसाठी इथे देत आहे. औषधांचा वापर, विक्री, आणि रुग्णाचे हित आणि औषध प्रशासनाची जबाबदारी याबद्दल यात खूप चांगल्या तर्‍हेने उहापोह केलेला आहे. ------------------------------- औषधांच्या वापरामुळे मानवी जीवन सुखकर होत चालले असताना औषधांच्या चुकीच्या वापरामुळे उद्भवणारे भयानक परीणाम सुद्धा वाढीस लागले हि बाब सामाजिक स्वस्थ्याकरिता अत्यंत हानिकारक आहे.