Skip to main content

भारतरत्न बिग टी अन बिग बी ....

लेखक चौकटराजा यांनी शनिवार, 16/11/2013 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
अख्रेर सचिन रमेश तेंडुलकर याना " भारतरत्न" हा सर्वोच्च सन्मानाचा किताब जाहीर झाला आहे. हा सन्मान खरे तर क्रिडापटूना द्यावा का असा प्रथम प्रश्न होता. नंतर त्यात सांघिक खेळातील एखाद्याच खेळाडूला द्यावा की नाही असाही वाद होता. सचिन बरोबरच डॉ. राव यानाही ही हा सन्मान मिळत आहे. आपण दोघांचेही त्रिवार अभिनंदन करू या. बाकी सचिनच्या बाबतीत एक विशेष गोष्ट अशी की जे खेळ तो खेळत होता तो बारकाव्यांचा ( प्रिसिजनचा) खेळ आहे. १४० किमी ने येणार्‍या चेंडूला चार इंच रूंदीच्या बॅटने सुमारे ९ इंच रूंदीचा यष्टी पट सुरक्षित ठेवायचा.म्हणजे दरवेळी चार इंचाची वाट चेंडूला मिळण्याची शक्यता जवळ जवळ १०० टक्के.

डोंबिवली दिवाळी कट्टा.....दि. १७/११/२०१३

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/11/2013 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, ह्यावेळी दिवाळी कट्टा डोंबिवलीला करायचे नक्की झाले आहे. वेळ रात्री ८ वा. ठिकाण : नंदी पॅलेस रविवार असल्याने हॉटेल मध्ये गर्दी असणारच आहे.त्यामुळे ८ नंतर जागा मिळवायला खूप त्रास होतो.मी आणि प्रथम फडणीस जागा अडवून ठेवूच.जे येणार असतील त्यांनी व्य.नी. करावा.ह्यावेळी बिल ज्याचे,त्याने द्यायचे, असे ठरले आहे. साधारण दर माणशी ५००रु. खर्च येईल.

॥ मुलखेडचा खंडोबा ॥

लेखक अनिल तापकीर यांनी सोमवार, 11/11/2013 13:23 या दिवशी प्रकाशित केले.
॥ ॐ मार्तंड भैरवाय नम:॥ मुलखेड, मुळशी तालुक्यातील मुळा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले एक सुंदर खेडे. सगळीकडे हिरवीगार शेती, पाठीमागे आणि डाव्या बाजूला डोंगररांग डोंगरातील घनदाट झाडी, आणि उजव्या बाजूने गावाला वळसा घालून बारामहीने वाहणारी मुळा नदी नदीकाठी शंकराची दोन सुंदर प्राचीन मंदिरे , गावाच्या मध्यभागी विठ्ठल मंदिर आणि थोडे खालच्या बाजूला ग्रामदैवत भैरवनाथ तेही मंदिर पुरातन, आणि गावाचा पाठीराखा खंडोबा वरती डोंगरावर बसून गावाचे रक्षण करतोय. साधारणता बाराशे ते पंधराशे फुट उंचीचा खंडोबाचा डोंगर आहे.

समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग.

लेखक ज्ञानव यांनी सोमवार, 11/11/2013 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
विषय : समभागांचे (शेअर्सचे)ट्रेडिंग. डिस्क्लेमर : खाली दिलेली पद्धत हा एक दिशा दर्शक आहे. त्यातील जोखीम ज्याने त्याने आपापल्या कुवतीनुसार, अनुभवानुसार जोखावी. तसेच ह्या पद्धतीत काही बदल करून मग ट्रेड करणे आवश्यक आहे असे जाणवल्यास योग्य तो बदल नक्की करावा. प्रथम एक भाग शेअर्स हि गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्यांचे एक combinition आहे. मग गुंतवणूक आणि ट्रेडिंगचा रेशिओ किंवा प्रमाण कसे ठरवावे कसे? आपले जेवढे वय तेवढी गुंतवणूक आणि बाकी उरली ती ट्रेडिंगमध्ये टाकावी. उदा. वय ३० असेल तर ३०% गुंतवणूक आणि ७०% ट्रेडिंग. असो तर बरेच जण मला ट्रेडिंगबद्दल विचारतात.

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

लेखक राजु भारतीय यांनी बुधवार, 30/10/2013 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.

भाग २ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी सोमवार, 28/10/2013 07:25 या दिवशी प्रकाशित केले.
मागील अंकाचा दुवा:- http://www.misalpav.com/node/25982 तिथून पुढची कथा आता देतोय. हा भाग २ आहे नोटः- जवळपास निम्म्या जगात मुस्लिम धर्म असणारे सत्ताधारी मध्ययुगात कसे कसे पसरले ते माझ्या चश्म्यातून लिहितोय. (सध्याच्या भारतीय मुस्लिम नागरिकांबद्द्ल मला राग आहे असे कुणीही समजून घेउ नका प्लीझ. मी मध्य युगाबद्दल लिहितोय.) . इस ६५० पर्यंत आपण मागच्या वेळेस पाहिलं. त्यानंतर दीडेक्शे वर्षे हळूहळू अरबी सत्तेने आपली पकड सर्वत्र घट्ट करत नेली. जिथे तिथे अरबी संस्कृतीचा प्रसार प्रचार सुरु झाला.

भाग १ बाबक खुर्रामुद्दिन --पारशी लोकांचे शिवाजी महाराज किंवा राणा प्रताप

लेखक मन यांनी रविवार, 27/10/2013 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी जालावर शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय पब्लिकचं लक्ष वेधून घेणं सोपं नाही. सातव्या आठव्या शतकात तत्कालीन ज्ञात जगातील फार मोठ्या भागावर इस्लामी राज्य पसरत होते. त्यांना कुणी यशस्वी आव्हान देणे हे ही दिव्यच मानले जाई. खरेतर असे कुनी आव्हान दिले होते, हे सुद्धा अल्पपरिचित असल्याचे दिसते. तर अशा एका योद्ध्याचा हा संक्षिप्त परिचय. पारशी लोकांचं गेलेलं राज्य त्यानं काही काळापुरतं पुन्हा उभं केलं.

Gas Cylinder सुरक्षितता उपाय

लेखक प्रमोद देर्देकर यांनी मंगळवार, 15/10/2013 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो आपण सर्वांनी Gas Cylinder च्या बाबतीत जागरूक असले पाहिजे या दृष्टीने मी आज एक गोष्ट महित झालि आहे ती तुम्हाला सांगू इच्छितो. आपण स्वतः बरोबर इतरांनाहि जागरूक करावे. आपल्या रोजच्या वापरत येणारा Gas Cylinder हा कोणत्या दिवसा पर्यन्त कार्यक्षम राहाणार आहे हे कसे ओळखावे ते पहा. १) Cylender च्या volve च्या भोवती ज्या 3 पट्ट्या असतात त्यावर A B C D अशा खुणा असतात आणि ज्या वर्षी Cylender expire होणार त्याचे वर्ष छापलेले असते.
आकृती मध्ये पिवळ्या वर्तुळातील खुणा पहावी.
म्हणजे जसे कि A /१२, किंवा D/१५ यापैकी पहिले A B C D म्हणजे वर्षाचे चार भाग केलेले असतात.

ज्योतिषांकडे जावे का? का जावे? … आमचेही काही प्रयोग

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 09/10/2013 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
सांप्रतकाळी भारतवर्षात काय, किंवा विलायतेस काय, बरेच उच्चविद्याविभूषित जंटलमन आणि सुविद्य लेड्या ज्योतिषांची टर उडविताना दिसतात; कां की त्यांचे मते ज्योतिष हे एक थोतांड असून लबाड ज्योतिषी मडळींनी केवळ आपली तुंबडी भरण्यासाठी ते रचिलेले आहे, आणि ज्याअर्थी विश्वचूडामणि असलेल्या ‘आम्रविका’ खंडातील प्राख्यात ‘सायनस’या महासिकाची ज्योतिषविद्येस मान्यता नाही, त्याअर्थी हे थोतांड असल्याचे निर्विवादपणे सिद्धच होते, सबब समस्त लुच्च्ये ज्योतिषी हे खेटरे मारण्याच्या लायक होत.