Skip to main content

मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ - निकाल

लेखक संपादक मंडळ यांनी शुक्रवार, 04/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर मित्रांनो, या वर्षी आपण मिपा - घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा २०१३ ही आपल्या घरच्या बाप्पाच्या भोवतीच्या सजावटीची स्पर्धा घेतली होती. मध्यंतरीच्या काळात सर्व्हर प्रॉब्लेम्समुळे निकाल तयार करायला उशीर झाला. पण आता सगळी विघ्ने दूर झाली आहेत आणि या स्पर्धेचा निकाल घोषित करताना परीक्षक आणि संपादक मंडळाला अत्यंत आनंद होत आहे. स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. मिपा मधे मधे बंद पडत असूनही एकूण ३२ लोकांकडून घरच्या गणेश सजावटीची छायाचित्रे आली. सगळीच अतिशय उत्तम होती.

सिरीया (contains some disturbing images)

लेखक मालोजीराव यांनी शुक्रवार, 13/09/2013 18:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या जगभर गाजत असलेल्या सिरियन यादवी युद्धाची काही छायाचित्रे देत आहे. सूचना :खालील काही छायाचित्रे डिस्टर्बिंग आहेत, जे भीषण चित्र आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे सिरियन सिव्हिल वॉर ची सद्यस्थिती map असद समर्थक - दमास्कस मध्ये map अमेरिकाविरोधी घोषणा द

गुडबाय मि. चिप्स

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/09/2013 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच जेम्स हिल्टनचे गुडबाय मि. चिप्स वाचुन संपवले. जेम्स हिल्टनचे वगैरे फक्त म्हणायला. भारदस्त इंग्लिश नावे फेकली की "आम्ही ब्वॉ इंग्रजी अभिजात साहित्य वाचतो" असे म्हणायला आपण मो़कळे. प्रत्यक्षात मी आपला योगेश काण्यांनी त्याचा केलेला अनुवाद वाचला. पण खरे सांगायचे तर कुठल्याही भाषेतुन वाचले तरी आपल्याच मातीतल्या वाटणार्या काही दुर्मिळ साहित्यकृतीत गुडबाय मि. चिप्सची गणना करता येइल. छोट्या आकारातली शे - सव्वाशे पाने वाचायला असा कितीसा वेळ लागणार. एका बैठकीतच संपवले. इतका मंत्रमुग्ध झालो की लगोलग दुसर्यांदा वाचले आणि मग जाणवले की कथानायकाचे नावच संपुर्ण पुस्तकात नाही. गुडबाय मि.

भारताची अर्थव्यवस्था: च्यायला, नक्की झालंय तरी काय?

लेखक चाणक्य यांनी रविवार, 08/09/2013 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही महिने आपण रोज ढासळणारा रूपया, निर्देशांकात होणारी घट, कमकुवत होत चाललेली भारतीय अर्थव्यवस्था याबद्द्लच्या बातम्या ऐकतो, पाहतो, वाचतो आहोत. त्यातच पंतप्रधानांनी येणारा काळ आपल्या अर्थव्यवस्थेसाठी कठीण असेल असे स्पष्टपणे राज्यसभेत सांगितले. अगदी काल परवा पर्यंत 'भारत उद्याची महासत्ता आहे' , 'भारताचे भविष्य कसे उज्वल आहे', 'भारत गुंतवणूकीसाठी कसा योग्य देश आहे' हे जो तो सांगत होता. (अर्थात, देशांतर्गत घडामोडींवर नजर ठेवून असणा-यांना यातला फोलपणा लक्षात आला होता म्हणा) पण मग अचानक आपली अर्थव्यवस्था ईतकी आजारी कशी पडली? बरं याची कारणंही रोज वेगवेगळी ऐकायला येतायत.

आईना - ए -गजल लेखक डॉक्टर विनय वाईकर/ डॉक्टर जरीना सानी

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी रविवार, 08/09/2013 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
गजल ऐकताना काहीवेळा एखादा उर्दू शब्द कानी पडतो, त्याचा अर्थ न समजल्यामुळे तो शेर मनाला भिडत नाही. "डॉक्टर जरीना सानी आणि डॉक्टर विनय वाईकर" यांनी लिहिलेले "आईना -ए -गजल" हे पुस्तक हाताशी असेल तर हा रसभंग टाळता येतो. या पुस्तकात ८५०० पेक्षा जास्त शब्द आणि ५५०० पेक्षा जास्त शेर अर्थासह दिले आहेत. अर्थ मराठी आणि इंग्रजी भाषेत दिले आहेत. शेर निवडताना लेखक द्वयींनी अभ्यास पूर्ण निवड केली आहे. गजल ऐकताना आपल्याला जो शब्द समजत नाही तो शब्द शोधताना त्या शब्दा खाली नेमका आपण ऐकत असलेला शेर सापडतो असे बरच वेळा घडते. उदा.

झगमगाटात हरवलेले . . . . .

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 07/09/2013 13:29 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षीच्या गणपती आधी लिहिलेला लेख.. इतरत्र प्रकाशित.. आजही लागू आहेच म्हणून इथेही टाकत आहे. ....................................................................................... परवा श्रावणातला शेवटचा सोमवार होता. बायकोने शिवमंदीरात जाण्याचा आणि मलाही नेण्याचा बेत माझ्याही नकळत दुपारीच बनवला. फोनवरच मला तसे कळवण्यात आले. त्याच दिवशी नेमके ऑफिसमध्ये काम जरा जादा असल्याने संध्याकाळी एक्स्ट्रा थांबावे लागणार होते.. त्यानंतर पुन्हा मंदीर.. वैताग नुसता डोक्याला.. पण नकार देण्याचा पर्यायच नव्हता..

कहे कबीरा (१)

लेखक शरद यांनी बुधवार, 04/09/2013 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
कहे कबीरा (१) संत कबीरावर तीन लेख लिहण्याचा विचार आहे. पहिल्या लेखात कबीराचे चरित्र, दुसर्‍यात त्याचे विचार व तिसर्‍यात काही भजने/दोहे यांचा परिचय पहिला भाग लिहणे फार सोपे आहे. अगदी सोपे. मी काहीही लिहले तरी बिघडत नाही कार॒ण आज आपल्याला कबीराबद्दल काहीही विश्वसनीय माहिती नाही !

ज्ञानदीप उजळू दे..

लेखक यशोधरा यांनी गुरुवार, 29/08/2013 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा? नूतन समर्थ विद्यालय, विजय मारुती चौक, सिटी पोस्टाजवळ, बुधवार पेठ, पुणे २. विद्यार्थीवर्ग? आजूबाजूच्या वेश्यावस्तीतील आणि इतर कामकरी वर्गातील मुले. दुसर्‍या एका संस्थळातर्फे चालवल्या जाणार्‍या काही चांगल्या उपक्रमांमध्ये मला सहभागी व्हायची संधी मिळाली आहे, त्यापैकी हा एक उपक्रम. ह्या उपक्रमातून गेली काही वर्षे ह्या छोट्यांना शिक्षणासाठी मदत करत आहोत आणि सातत्य राखण्याचाही प्रयत्न करत आहोत.सावली सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ही मदत केली जाते.