Skip to main content

मला आवडलेले ऋतुरंग २०१४

लेखक नाखु यांनी शनिवार, 03/01/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
हे दिवाळी अंकाचे समीक्षण नाही किंवा जाहीरातही नाही. मला या अंकात भावलेले लिखाणाचा आकलन लेखा-जोखा म्हणा (फारतर) आहे. विषय घेतला आहे स्थलांतर =========================================== अनेक नावाजलेल्या लेखकांचे लेखन सशक्त अनुवादित आहे. १.गुलजार =रावीपार (विजय पाडळकर) फाळणीच्या पार्श्वभूमीवर अतिशय चटका लावणारी कथा २.

१५ फेब्रुवारी, मिपा संमेलन...कशेळी, कर्जत

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 01/01/2015 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकरांनो, प्रथमतः नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आधीचा धागा (http://www.misalpav.com/node/29818) ठरल्यापरमाणे मिपा संमेलन कशेळी, कर्जत जवळ होणार आहे. पुण्याहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.इस्पिक एक्का आणि वल्ली, ह्यांच्या संपर्क साधावा. मुंबईहून येणार्‍या मिपाकरांनी श्री.कंजूस, श्री. नूलकर किंवा अजया ज्यांच्याशी संपर्क साधावा. ह्या संमेलनाचे एक खास वैशिष्ट म्हणजे, श्री. नुलकर आपल्याला "ओरीगामी"ची ओळख आणि काही प्रात्यक्षिके पण दाखवणार आहेत. मी आणि आम्ही काही मिपाकर १४ता.

मवाली भट नी पै

लेखक विअर्ड विक्स यांनी रविवार, 28/12/2014 10:37 या दिवशी प्रकाशित केले.
शीर्षक वाचून धागा उघडल्याबद्दल स्वताची पाठ थोपटून घेतो. स्वतःच्या लेखनाचा दर्जा ओळखून असल्याने अशी रोचक शीर्षके देऊन वाचक मिळवण्याचा क्षीण प्रयत्न.... असो आता मुद्द्याकडे वळूया. तसा आमचा प्रांत भटकंती या सदरातला , परंतु गेले २-३ महिने बंगळुरुला वास्तव्य असल्याने दुर्ग भ्रमंती होत नव्हती. त्यामुळे लेखन होत नव्हते, परंतु बंगुळूरुतील अनुभवांवर लेख लिहायचा विचार होता. तसे आम्ही पडलो अभियंता वर्गातले त्यामुळे ते अनुभव सर्वांस रुचातातच असे नव्हे. त्यामुळे आपल्या खाद्य्भ्रमंतीवर लेख लिहिण्याचा एक प्रयत्न!

“पडणे” एक कला

लेखक दशानन यांनी सोमवार, 15/12/2014 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
दुसरा कोणी पडला तर त्याच्याकडे पाहून फिदीफिदी हसण्याची आपल्याकडे वाईट सवय आहे. पण त्यांना पाडणाऱ्या व्यक्तीने घेतलेले कष्ट दिसत नसतात असे माझे स्पष्ट मत आहे म्हणून मी “पडणे” एक कला हा लेख लिहितो आहे. सतत पडण्याची माझी दीर्घकालीन वाटचाल आहे, मी रस्तावर पडलो आहे, पाण्यात पडलो आहे, डोंगरावर पडलो, स्कूटर, बाईक, कार मधून देखील पडलो आहे, तसेच अनेक वेळा खड्यात देखील पडलो आहे, तसेच एकदा हवेतून देखील पडलो आहे.

अचानक जमून आलेला पाताळेश्वर कट्टा

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 06/12/2014 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. पुण्याला येण्याचा अचानक योग जुळून आला, आणी त्यातच एक अचानक कट्टापण जमून गेला. वल्लीने सुचवलेलं 'पाताळेश्वर' हे ठिकाण एकदम अद्भुत. प्रशांत वगळता अन्य मिपाकरांशी भेट होण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग. चौकटराजा, इस्पिकएक्का, वल्ली, समीर, सूड, धन्या, यसवायजी, प्रशांत .... सर्वांनी उदंड उत्साहानं गप्पा-गोष्टी केल्या.

डेबिट कार्ड मदत पाहिजे

लेखक देशपांडे विनायक यांनी रविवार, 30/11/2014 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा चे सदस्य मला मदत करतील आणि माझा परदेश प्रवास सुखाचा करतील अशी अपेक्षा आहे माझ्याकडे VISA चे DEBIT कार्ड आहे . एका COOPERATIVE बँकेतून घेतलेले मी परदेशी जाणार असल्याने ते कार्ड INTERNATIONAL करून घेण्यास बँकेत गेलो . बँकेने माझ्याकडून एका FORM वर सही मागितली . त्यात पुढील शब्द होते DECLARATION I have read,understood & agreed to all terms & conditions of debit- cum-ATM card including its international usage,interpretation of rules,risk,limits,charges,etc.

इंटरस्टेलारच्या निमित्ताने...

लेखक सतिश गावडे यांनी मंगळवार, 11/11/2014 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
इंटरस्टेलार हा मी भारतातील थियेटरला पाहिलेला पहिला इंग्रजी चित्रपट. एका हॉलीवूड चित्रपटवेडया मिपाकर मित्राच्या आग्रहास्तव त्याच्या सोबत हा चित्रपट पाहायला गेलो. इंग्रजी चित्रपटातील उच्चार कळत नसल्यामुळे चित्रपट कितपत समजेल याबद्दल साशंक होतो. मात्र चित्रपट सुरु होताच पडद्याच्या खालच्या बाजूला इंग्रजी सब टायटल्स दिसू लागली आणि मी निश्चिंत झालो. चित्रपट अतिशय सुंदर असल्यामुळे नजर पडद्यावर खिळली होती. काही प्रसंग अक्षरशः श्वास रोखून धरायला लावत होते. आता पृथ्वीचा विनाश जवळ आला आहे.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. ३) अँड्र्यू कार्नेगी

लेखक अमित खोजे यांनी बुधवार, 05/11/2014 03:03 या दिवशी प्रकाशित केले.
जॉन डी रॉकफेलर आता अमेरिकेतील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता. त्याची एकूण संपत्ती १५० मिलिअन डॉलर्स (२२५ बिलिअन डॉलर्स आज) होती. स्टँडर्ड ऑईल ९८% रॉकेल ची एकटी मालक होती. परंतु जगातील सर्व मोठ्या भांडवलदारांना स्पर्धक हे असतातच. आणि भविष्यातील सर्वात मोठ्या स्पर्धकाला रॉकफेलरने स्वतःच जन्माला घातले होते. अँड्र्यू कार्नेगी! ज्याचा हात धरून अँड्र्यूने धंद्यातील धडे गिरवले त्या टॉम स्कॉटची वाताहत केल्याबद्दल अँड्र्यू जॉनला बिलकुल क्षमा करणार नव्हता. पुढे चालू ..

डोंबिवली कट्टा पंचनामा

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 23/10/2014 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी, माम्लेदारचा पंखा, राहणार ठाणे असे नमूद करतो की दि. १८ ऑक्टोबर २०१४ रोजी नंदी पलेस डोंबिवली येथे संध्याकाळी ७. ३० च्या दरम्यान काही व्यक्ती कट्ट्यासंदर्भात एक गुप्त बैठक करणार आहेत अशी खबर मिळाल्यामुळे मी तिथे साध्या वेशात उपस्थित राहायचे ठरवले.

आणि यांनी घडविली अमेरिका! .. २) जॉन डी रॉकफेलर

लेखक अमित खोजे यांनी गुरुवार, 09/10/2014 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
या पूर्वी . . . आणि यांनी घडविली अमेरिका! .. १) कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट कोर्नेलिअस व्हँडरबिल्ट हा जगातील सर्वात मोठ्या रेलरोड कंपनीचा मालक होता. अन त्याला याची कल्पना होती कि रेलरोड आता अमेरिकेत सगळीकडे झालेले आहेत. आता पैसा रेलरोड बांधून नाही तर त्यावर मालाची आणि उतारूंची वाहतूक करून येणार. त्यासाठी तो एका चांगल्या मालाच्या शोधात होता ज्याची वाहतूक संपूर्ण देशभर करून तो पैसा कमवू शकेल आणि असा माल आणि अशा कंपनीचा मालक त्याला लवकरच मिळाला. जॉन डी. रॉकफ़ेलर आणि त्याचे केरोसीन (रॉकेल)! पुढे चालू . . .