Skip to main content

...........काय बोलू.........

लेखक आशु जोग यांनी सोमवार, 21/07/2014 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
भाषा ही गोष्ट आपण वापरतो खूप पण भाषा या गोष्टीचा आपण विचार कितीसा करतो. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही. आता म्हणजे काय........ सगळं इंग्रजीच. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... ही वाक्ये आपण ऐकतो. जशीच्या तशी स्वीकारतो...पण इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे... हे वाक्य अर्धवट सांगितले जाते खरे वाक्य आहे इंग्रजी हे वाघिणीचे दूध असते तर सगळे इंग्रजी शिकलेले लोक(कारकून) असे शेळीसारखे बॅ बॅ करताना का दिसले असते. असो ! कोण काय म्हणाले याच्या पलिकडे जाऊया नाहीतर अडकायचो तिथेच... एखादी भाषा केवळ आपली मातृभाषा म्हणून ती ग्रेट असे नसते.

नोकरीबदलासंदर्भात मदत/माहिती हवी आहे

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 17/07/2014 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, एकाच ठिकाणी अनेक वर्षे काम केल्यानंतर जे जडत्व येते (त्याला 'कंफर्ट झोन' असे गोंडस नाव आहे इंग्रजीमध्ये) तशा प्रकारचे काहीसे अस्मादिकांचे झाले आहे किंवा होऊ घातले आहे असे सध्या प्रकर्षाने जाणवतेय. शिवाय, सध्याच्या ठिकाणी कामाच्या आणि एकंदरीत काम करण्याच्या पद्धतीच्या बाबतीत आता फारसे काही उत्साहवर्धक वातावरण राहिलेले नाही असे निदर्शनास आले आहे. काही बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत पण ते तितकेसे सोपे नाही हे लक्षात यायला वेळ लागला. :-) मिपा-मंडळी याबाबत काही मदत करू शकली किंवा माहिती पुरवू शकली तर खूप बरे होईल.

मदत हवी आहे. ग्रंथालय अमेरिके मध्ये

लेखक सिद्धार्थ ४ यांनी गुरुवार, 17/07/2014 00:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो. गेली २ वर्ष मी अमेरिके मध्ये राहतो आहे. वाचनाच्या माझा छःअन्द मला स्वस्थ बसू देत नाही आहे. कृपया कोणाला अमेरिके मध्ये कोणी मराठी पुस्तकांचे ग्रंथालय चालवत असेल तर इथे कळवावे. माझे हे मिपा वरील पहिले लिखाण आहे, आणि गेल्या ५ वर्षा पासून मी मिपा चा सभासात आहे. इथले कमेंट्स मला पूर्ण माहिती आहेत तरीही daring करत आहे. आपला लोभ असावा असे मी बिलकुल म्हणणार नाही कारण मला माहिती आहे के हे माझे लिखाण फाट्यावर मारले जाईल. तरीही प्लीज जमले तर मदत करा.

बिया हव्यात बिया, कोणी बिया देइल का?

लेखक आयुर्हित यांनी बुधवार, 02/07/2014 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
गुंडेगाव (ता. नगर) येथील राजाराम भापकर गुरूजी (वय ८४). सध्या जलसंधारणाच्या कामाने झपाटले आहेत. ब्रिटिशांच्या काळात नदी-नाल्यांच्या किनारी जांभळाची बने होती. त्यामुळे पाणी आणि माती धरून ठेवण्याचे काम होत असे, हा संदर्भ त्यांना सापडला. तेव्हापासून त्यांनी गावातील नदी-नाल्यांच्या काठी जांभळाची लागवड करण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी ते दररोज सकाळी आपल्या मोपेडवर गुंडेगावहून नगरला येतात. त्यांच्या दुचाकीला एक प्लास्टीकचा क्रेट बांधलेले असते. मार्केट यार्डमध्ये जाऊन ते जांभळे खरेदी करतात.

वातव्याधी सामान्य आहार :-

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 28/06/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
वातव्याधी सामान्य आहार १)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका. २),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ, राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त ३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी, ४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल ५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे. ६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन ७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे. ८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.स

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 26/06/2014 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
लहानांचे दंतोपचार : भाग दोन दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ... टूथपेस्ट आणि ब्रशिंग या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक. यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे. बर्‍याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल.

लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग एक

लेखक भडकमकर मास्तर यांनी सोमवार, 23/06/2014 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
[ खालील उत्तरे सर्वसाधारणपणे आढळणार्‍या दंतविकारांबद्दल आहेत. दंतविकार टाळण्यासाठी घेण्याच्या घरगुती काळजी ( Preventive Home Care) बद्दल पालकांमधले समज गैरसमज लक्षात घेऊन ही उत्तरे लिहिली आहेत. काही विशिष्ट असाधारण परिस्थितीत ( उदा. विशेष बालके, गंभीर आजारावर उपचार घेणारे रुग्ण इ.) तज्ञांचा सल्ला घेऊन पुढे उपाययोजना करावी. ] प्रश्न १ : दंतक्षय ( दातांची कीड) म्हणजे काय? Dental Caries (दातांची कीड) हा एक तोंडामधल्या जीवाणूंमुळे होणारा आजार आहे. ( अर्थातच दातांमध्ये कोणताही किडा किंवा अळी नसते. काही गावांत कानात औषध घालून तोंडातून दातांचा किडा बाहेर काढून दाखवणारे रस्त्याकडचे कलाकार असतात.

संवादिका - ३

लेखक प्रास यांनी रविवार, 22/06/2014 01:50 या दिवशी प्रकाशित केले.
"आहेस का रे?" "आहे ना गं, तुझ्यासाठी मी नेहमी इथेच आहे." "तुझी व्यवधानं सांभाळावी लागणारच नं मला?" "व्यवधानं का तुझ्यापेक्षा महत्त्वाची असतील?" "माहितेय माहितेय, दिवसभरात किती वेळा उपलब्ध असतोस ते चांगलं माहितेय मला." "असं काय करतेस, तुमने पुकारा और हम चले आये, कधीही, केव्हाही.... :-D" "नेहमी आम्हालाच पुकारावं लागतं, हेच दु:खं आहे नं..." "असं का म्हणतेस? पापी पेट के लिये नोकरी तो करनीच पडेंगी ना...?" "तुझ्या या बेदर्दी नोकरी पायी तुझी ही छोकरी तुझ्यासाठी किती झुरतेय हे कळतं नं तुला?" "काय झालं? अपसेट वाटतेयस. माझ्या छकुलीला कुणी 'वा' केलं का?" "चेष्टा नकोय रे!

अ‍ॅकलेशिया कार्डिया-३ - सुटका

लेखक तिमा यांनी शनिवार, 21/06/2014 13:16 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/27881 http://www.misalpav.com/node/27905 लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे.

कावळ्यांतला आईनस्टाईन !!!

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 12/06/2014 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर असलेली ही व्हिडिओ क्लिप मला एका नातेवाईकाने पाठवली. ती इतकी आश्चर्यकारक आहे की इथे टाकल्याशिवाय राहवले नाही. प्रत्यक्ष पाहूनच ठरवा शिर्षक बरोबर आहे की नाही !