Skip to main content

एक जोरदार मिपाकट्टा करू या का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 25/12/2014 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एक मला मिपा का आवडते? ह्या विचारांवर धागा काढला होता. त्या लेखाला प्रतिसाद म्हणून "बिरुटे सरांचे" एक वाक्य होते. "मिपा" हे पण एक आभासी जग आहे. मला तर कधीच ते आभासी जग वाटले नाही.त्यामुळे वेळ मिळाला की मी सरळ मिपाकरांशी गाठभेट घ्यायचा प्रयत्न करतो. स्नेहांकिता ताईंचा प्रतिसाद आला, की "एक जोरदार मिपा कट्टा व्हायला पाहिजे." त्याला मितान आणि अजया ह्यांचे अनुमोदन पण मिळाले. तर मिपाकरांनो, एक जोरदार मिपाकट्टा करू या का? कट्ट्याला आम्ही कधीच नाही म्हणत नाही. कट्टा कुठेही असला आणि मला वेळ असेल तर, घरदार सोडून मी कट्ट्याला हजेरी लावतो. एक ठिकाण सुचवतो, कर्जत जवळ "कशेळी" म्हणून एक गांव आहे. बर्‍यापैकी झाडी आहे, छान पैकी ४०-५० माणसे बसू शकतील अशी जागा आहे.जवळच एक छोटे तळे आणि बाजूला लेणी-गुंफा पण आहेत.आधी ऑर्डर दिली तर तिथेच जेवणाची सोय पण होवू शकते. मी कंजूस ह्यांचा हात धरून गेलो होतो.त्यामुळे कुणी कुठून कसे यायचे ते माझ्या पेक्षा कंजूसच जास्त सांगू शकतील. एका दिवसात होणारी ट्रिप असल्याने, मुंबईत आणि पुण्यात , राहणार्‍या सर्व मिपाकरांना एकदम योग्य जागा.माणशी जास्तीत जास्त २०० ते २५० रुपये खर्च होतील आणि ते पण येण्या-जाण्याच्या खर्चासकट. हा धागा फक्त ठिकाण निश्र्चीती आणि दिनांक ठरवायलाच आहे. मला २८ फेब्रुवारी किंवा १ मार्च चालेल. धागा काथ्याकुटातला असल्याने भरपूर काथ्या कुटावा. इथे माझा सहभाग संपला. विषय आणि माझा प्रतिसाद मूळ धाग्यातच गुंफला आहे.ह्या चर्चेच्या गुर्‍हाळातून जे काही ठिकाण आणि दिनांक ठरवल्या जाईल, त्याला माझी मान्यता आहे. कशेळी बद्दलची जास्तीची माहिती कंजूस सांगतील.

वाचने 28849
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

शब्द दिल्याप्रमाणे धागा आला की ! कशेळी इथे बसने कसे जायचे व पुण्याहून किती वेळ लागतो ? आणि तारीखही ठरवा पटापट .

तारीख थोडी अलिकडे घेता येईल का? बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन. कशेळी वनविहार का? कर्जत मुरबाड रस्ता?कोंडाणे लेण्याजवळ?छान जागा अाहे.पण स्वतःचे वाहन असल्यास सोयीचे होईल असे वाटते.

In reply to by अजया

बोर्ड एक्झाम सुरु होतात ३ मार्च पासुन." नक्कीच घेता येईल. कारण मी माझी साधारण तारीख सांगीतली. इतर मिपाकर काय म्हणतात ते बघू.

अशा कट्ट्याची कल्पना मी मा. इस्पिक एक्का यांच्याकडे बोललो होतो. सोयिस्कर प्रवास , जवळचे ठिकाण व मर्यादित खर्च हे एकत्र आले तर अनेक मिपाकर हौशीने येतील.

In reply to by चौकटराजा

असे मिपाकट्टे वारंवार होवो व या विश्वे प्रेमभाव वाढो ही तो श्रींची इच्छा आहे... आम्ही केवळ ती परत सांगणारे आणि सहमत होणारे भारवाही हमाल, बस. :) अवांतर : "मा. इस्पिक एक्का" मधले ते "मा." काय आहे ??? त्या शब्दाने अनेक श्या सुरू होतात, म्हणून आम्हाला शिंपल "इस्पीकचा एक्का" किंवा अतिशिंपल "एक्का"च ज्यास्त आवडते याची माननियांनी दखल घ्यावी. ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हेच विचारणार होतो =)) ते "मा." पुढारीलोकांसाठीच असूदे ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ते टंकायला चुकलेले दिसतेय मागे अशा शब्द लिहिताना मा. असे आली आरे हां स्वारी बरं का !

In reply to by चौकटराजा

आता ही स्वारी कशाला ? तुमी स्वारी घोड्या-उंटावर करा, नायतर हत्तीवर. आमाला नको तुमची स्वारी. ;) पुढच्या कट्ट्याला लवकरच भेटू आणि मस्त गफ्फा मारू, वाटल्यास दोन दोन कालसर्पनिवारक फलरस पिऊ, काय म्हंताव ? :)

ठिकाण :वनविहार , ही एक फलोद्यान सहकारी(बागाईत शेतीचे प्लॉट) संस्था आहे. त्यात राहणे, जेवण इत्यादिची व्यवस्था एका प्लॉटमध्ये आहे. श्री शिवाजी ते करतात. काय आहे: लेणी(विहार), नदी, वन, मागे भिमाशंकर डोंगर, जवळ कोथळीगड (पेठचा किल्ला). प्रवेश फी :नाही. जेवण :नाश्ता, चहा, जेवण (वेज नॉनवेज). पार्किँग :भरपूर. राहणे :तीन खोल्या ४०० ते६००रु. संपर्क 9226093034 शिवाजी 0214683313 जावे कसे :नेरळ स्टे -१२किमी कशेळे जाणाऱ्या ६सिटर शेअररिक्षाने -कशेळे-१५रु+१२किमी जामरुघ जाणाऱ्या रिक्षाने १५रु -वनविहार. पुण्याच्या मिपाकरांना १२ ते ४ इतका कट्ट्यावर वेळ मिळेल. पुण्याकडून :सकाळची सह्याद्री थेट नेरळलाही थांबते. १०.००वाजता तिथून रिक्षा करून जागेवर ११.३०होतील. परत जाण्यासाठी कर्जतहून ६.००प्रगति/ डेक्कन क्वीन मिळेल. मुंबईकडून :नेरळसाठी खूप लोकल ट्रेनस आहेत. कोणीही अगोदर जाऊन खात्री करू शकता. राजमाचीवरून कोंडाणेला उतरल्यावरचे श्री अनिल/वसंत गोगटे यांचे वनविहार वेगळे आहे. तिथे आता त्यांनी एक अंबेजोगाईचे देउळ बांधले आहे. कर्जत-कशेळे-मरबाड या रस्त्याला नेरळ -कशेळे -जामरुघ रस्ता क्रॉस जातो. कशेळेहूनच आणखी एक रस्ता खांडस (भिमाशंकरसाठी)जातो.

In reply to by टवाळ कार्टा

ओके हा पण मुद्दा विचारात घेण्याजोगा आहे. पण तिथल्या खोल्या फार सुंदर नाही आहेत. त्यामुळे राहण्याची फार अपेक्षा करू नकोस. पण जेवण मस्त असते.

In reply to by मुक्त विहारि

मिपाकर असताना कोण खोल्यांची रंगसंगती बघतोय (वल्लीबुआंबद्दल माहित नाही ब्वॉ) पत्त्यांचे क्यॅट...चिकन...रंगीत पेय (हे असावेच असे काही नाही)...गप्पा...आणखी काय हवे रात्र जागवायला

In reply to by टवाळ कार्टा

मस्त झब्बु, चॅलेंज खेळत बसू... एखादी शेकोटी पेटवू... अजुन कुणी येणार असेल तर फारच उत्तम...

पुण्याचे दोन चारजण अगोदर येऊन पाहून गेलात तर कल्पना (=IDEA) येईल आणि कायमचं एक {गुप्त}कट्टयाला ठिकाण 'भेटेल'. धडपड्यांसाठी पेठचा किल्ला ,भिमाशंकर आहेच. फोटोग्राफीसाठी रानपक्षी(नंदन नाचण ,भृंगराज मोठा शेपटीवाला कोतवाल कांचन, टकाचोर सोनपाठी सुतार )आहेतच.

मुलांच्या परीक्षा कधी असतील माहित नाही. पण तसे काही नसेल तर नक्की येणार!

In reply to by विजुभाऊ

शनिवारला जोडुन फक्त रविवारच येतो असे किमान आमच्यातरी शाळेत शिकवले होते. रविवार सोडुन आणखी कुठला वार येऊ शकतो हे माहितच नव्हते! विजुभाऊ, कृ. ह. घ्या. :)

In reply to by भाते

शनिवारला जोडून शुक्रवार पण असतो असे आमच्या शाळेत आम्हाला शिकवले होते ;) :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बरोब्बर. दुसरी एक शक्यता म्हणजे एखादे दिवशी तिथी लय असेल तर,,,,,,,,,,,,WinkSmile

In reply to by टवाळ कार्टा

हॅहॅहॅ... व्यालेंटाइन डेला मिपाकरांबरोबर टीपी केला तर सासूबाईंना वाईट वाटेल.

In reply to by अनुप ढेरे

उलट तुमच्या गर्ल फ्रेंडला पण मिपाकर बनवा...(आम्ही पण आमच्या बायकोला मिपाकर करून घेतले आहे.मिपा ही तिची लाडकी सवत आहे.) आणि सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून तिथेच तुमचा प्रेमदिवस साजरा करा... मिपाकर कट्ट्यात दंग असल्याने तुमच्याकडे कुणाचे लक्ष जाणार नाही...

हे असे कट्ट्यांचे धागे काढतात, वर ते यशस्वी करुन दाखवतात आणि मग जळवणारे फोटु/वॄतांत येतात.....जल्ला ईनो चा पन काय ईफेक्ट होत नाहि. मुवि मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा....

In reply to by दिपक.कुवेत

"मी आल्यावर जर एखादा कट्टा केला नाहित तर याद राखा...." ह्यावेळी तुमच्याबरोबर उरण कट्टा करायचा बेत आहे.

रैवार पेक्षा शनिवार बरा पडेल. रैवारी दंगा करून दुसर्‍या दिवशी हापिसाला जायाला लै वंगाळ वाटतं

In reply to by विजुभाऊ

खरा दंगा शनिवारी रात्री करू... हाकानाका. तुम्ही बासरी घेवून या... (प्लॅनिंग डॅमेजर) मुवि

माझं ऐका दोन चार जण येऊन तिथे पाहून गेलात तर ठरवायला सोपे जाईल. शनिवारी काही जण आलात तर खासकरून पुणेकरांस भरपूर वेळ मिळेल. मुंबईचे रविवारी सकाळी ९ वाजता येऊ शकतात.

In reply to by कंजूस

कारण फक्त माझ्या आणि कंजूस ह्यांच्या अनुभवावर जावू नका. कारण आमच्या कडून पण काही चूक होवू शकते.

In reply to by मुक्त विहारि

जरा त्या टकाला विचारतो... (नाहीतरी उगाच टाइमपास करत बसलाय...लावु या कामाला)

नक्कीच. या रविवारी नको. छोटा ट्रेक कर्नाळा पक्का आहे. कोणाला यायचे असेल तर सांगा. भटक्या खेडवाला, हु एक्का येत आहेत.

In reply to by सूड

पंदराला बी बिजी ? का चौदाला यित्का बिजी की १५ ला येनं शक्य न्हाई ? १४ ला काय धा मईल चालनार हैस का "गड्या" ?

In reply to by टवाळ कार्टा

हायला, लिव की!! पर मंग म्या काय उत्तर दिलं तं त्ये बी चालवून घ्याचं, कसं?

कशेळ्यापासुन १३ किमी वर आंबिवली गाव आहे तिथेच पेठचा किल्ला आहे आणी जवळच बौद्ध कालीन स्तुप पण आहेत. कशेळ्यासाठी नेरळ किंवा मग कर्जतही व्यवस्थित राहिल. नेरळ-कळंब-सुगवे-कशेळे (२९ किमि)(शक्यतो टाळा) नेरळ-कोल्हिवली-वाकस-कशेळे (१३ किमि) (विक्रम असतात खुप) कर्जत-कडाव-कशेळे (१४ किमि)(कडाव ला गणपतीचे प्रशिद्ध मंदिर आहे एस्टी स्टँडच्या मागेच) कशेळ्या जवळच लालवाडी आहे जिथे वेतापासुन फर्निचर बनवले जाते इच्छुक असाल तर जावु शकता तिथेच नैसर्गिक पदार्थ जसे मध वगैरे आणी तत्सम वस्तुपण मिळतात

In reply to by इरसाल

ह्या फेब्रुवारीत थोडा व्यस्त आहे. पुढचा कट्टा बडोद्याला करायचा बेत आहे. (कट्टेकरी) मुवि

In reply to by चेतन677

मिपाकर शारिरीक वयाने जितके मोठे तितका जास्त दंगा करतात :)

In reply to by hitesh

माहित आहे...काहितरी नवीन सांगा की राव...म्हणजे हितेस हा अवतार येणार नाही का सगळेच अवतार येणार नाहीत ;)