Skip to main content

कै. स गो बर्वे जन्मशताब्दी

लेखक खेडूत यांनी शुक्रवार, 24/04/2015 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
B माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्राचे माजी अर्थ आणि उद्योगमंत्री श्री स. गो. बर्वे (१९१४-१९६७) यांची १०० वी जयंती येत्या सोमवारी २७ एप्रिलला आहे. त्यानिमित्य त्यांचा छोटासा परिचय करून देणारा हा लेख : कॉलेजात असताना मॉडर्न कॅफेचा चौक ''कै. स. गो. बर्वे चौक'' आहे हे माहीत होते पण त्यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. मुंबईत त्यांच्या नावाचा मार्ग , बर्वेनगरची बस वगैरे दिसत दिसत असे.

पुराणासाठी वांगी

लेखक संदीप डांगे यांनी रविवार, 19/04/2015 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
जोशी सायेबांनी 'भरीता'ची आठवण करून दिली म्हणुन थोडे वांगे आणून देतो. करा काय करायचं ते, चीमायभईन... १. आपली चिंचोके, कवळ्या, काचेचे तुकडे, क्रिकेटरचे फटूवाले कूपन ठेवायची जागा अपोजिट पार्टीला सांगतो म्हणून रावणाने बिबिषणाला ल्हानपणीच पाण्यात बुडवून मारायचा प्रयत्न केला होता पण ऐनवेळी आई आल्याने तो वाचला आणि पुढे हा मेला. कुंबकरनाने लय बोर्नव्हीटा एकदम पेली. तर तो एकदम म्होटा झाला. एकदम लय भूक लागली, एकदम जेवला, एकदम लय झोप आली. येकदम झोपला का उटाचं नाव नाय म्हाराज्या. डायरेक दुपारच्या टायमाले भाऊ हिडो गेम खेलते बगून उटून बसला. अन मी बी खेल्तो म्हनून मांगं लागला.

अहल्या व शूर्पणखा खरेच अन्यायग्रस्त स्त्रीया ?

लेखक शरद यांनी शनिवार, 18/04/2015 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
अहल्या व शूर्पणखा अन्याय झाला कां ? "अहल्येची दुसरी गोष्ट" यावरील सर्वश्री स्पंदना, अवतार व पैसा यांच्या प्रतिसादांवरून जास्त माहिती देण्याची गरज वाटते. म्हणून नवीन धागा काढत आहे. दोघींवर अन्याय झाला असे बरेच जणांना वाटते. बर्‍याच वेळी मूळ गोष्टच माहीत नसते. ती वाचल्यानंतरही जर तुमचे मत निराळे असेल तर तसे मांडावयास हरकत नाही. पण एक नक्कीच लक्षात ठेवावयास हवे की वाल्मीकि-व्यास या उत्तुंग प्रतिभेच्या महान लेखकांनी त्यांच्या काळास अनुसरून लिहलेल्या लिखाणावर आपण आपल्या कुवतीप्रमाणे आजच्या काळास अनुसरून मत देत आहोत.

_सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र (बायकोचं प्रगतीपुस्तकं)

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 17/04/2015 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णास्त्रोतः सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र श्री. सौंदर्य ह्यांची माफी मागुन. (काही तासांपुर्वी 'सुखी वैवाहिक जीवनाचा गुरुमंत्र ' हा लेख वाचला होता. त्या धाग्याचं स्वैर विडंबन म्हणुन आणि बायकोला मार्क्स कसे मिळवावेत ह्याचं मार्गदर्शन म्हणुन हा विडंबनप्रसवप्रपंच) तुम्ही आयुष्यात खुष राहु इच्छिता? हा घ्या एक विडंबन मंत्र. आपापल्या नवर्‍यांना खुश कसे ठेवाल? अगदी सोप्पं आहे. नवर्‍याला खुश ठेवणं हे बटाट्याची सुकी भाजी करण्यापेक्षा सोप्पं आहे. कसं?????? सांगतो. १. नवर्‍याला आवडणार्‍या गोष्टी करा.

अहल्येची रामायणातील दुसरी कथा

लेखक शरद यांनी बुधवार, 08/04/2015 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. विवेक पटाईत यांचा अहल्येवरचा लेख वाचावयाला सुरवात केल्यावर सुखावलो होतो. श्री. विवेक मूळ रामायणावरून, तेथील संदर्भ देऊन, लिहत असल्याने "कादंबरीती"ल व्यक्तीचित्रे वाचतांना खटकणारे वाचावे लागणार नाही असे वाटत होते. पण पुढे पुढे गेलो तसे जाणवले की "अरे, हे तर आपण वाचलेल्या "रामायणा"तील नाही." आता रामायण व महाभारत यांचे खंड हाताशीच असतात. बालकांड, सर्ग ४८-४९ वाचावयास सुरवात केली आणि काहीच जुळेना. वैतागलोच. मिपा बंद असल्याने त्यांचा लेख समोर ठेवून तपासणेही शक्य नव्हते. पण शेवटी त्यांनीच आमच्या बंद कुलुपाची चावी दिली.

उचलता वजन हे - Lifting Technique

लेखक वेल्लाभट यांनी बुधवार, 25/03/2015 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या रोजच्या धावपळीचा कळत नकळत आपल्या शरीरावर परिणाम होत असतो. सद्ध्या एक वारंवार ऐकू येणारी तक्रार म्हणजे 'मला बॅकचा प्रॉब्लेम आहे रे' 'लोवर बॅकचा प्रॉब्लेम आहे'. आपल्या संपूर्ण शरीराला नियंत्रित करणारा हा अतिशय महत्वाचा अवयव अनेकदा आपल्याकडून दुर्लक्षित राहतो, आणि त्याचे परिणाम या अशा दुखण्यात दिसतात. पाठीवर किंवा कण्याला अपाय करणा-या अनेक गोष्टींपैकी एक नेहमी होणारी गोष्ट इथे नमूद करू इच्छितो. आपण रोजच्या व्यवहारात अनेकदा कमी अधिक वजन उचलतो. उचलून वर ठेवतो, वरून काढून खाली ठेवतो, सरकवतो, ढकलतो इत्यादी. या सगळ्या हालचाली करताना आपल्या पाठीची कमालीची इन्व्हॉल्व्हमेंट असते.

Veer Garjana | वीरगर्जना @ Gudhi Padwa 2015

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 23/03/2015 07:37 या दिवशी प्रकाशित केले.
वीरगर्जना ढोल ताशे आणि ध्वज पथक, ठाणे याचा एक सदस्य अशी ओळख सांगताना मला नेहमीच अभिमान वाटतो. जरी वैयक्तिक आणि कामाच्या जबाबदा-यांतून सरावाला वेळ मिळत नसला आणि त्यामुळे सध्या वादनात सहभाग घेता येत नसला, तरीही ती ओळख तशीच आहे असं मी मानतो. गुढीपाडव्याच्या आधी व्हॉट्सॅप्प वर फेसबुकवर नववर्ष स्वागत यात्रेतील वीरगर्जनेच्या वादनाचा संदेश फॉरवर्ड करताना मला खूप आनंद होत होता. आणि तो आनंद वीरगर्जना पथकाचं ढोल ताशे वादन ऐकताना कैक पटीने मोठा झाला. दिवसेंदिवस बहरत गेलेला हा तालाचा उत्सव ऐकताना कान, मन धुंद होतं.

मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 17/03/2015 20:45 या दिवशी प्रकाशित केले.
हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत.

सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 10/03/2015 01:06 या दिवशी प्रकाशित केले.
"सोलार इंपल्स" हा बर्ट्रांड पिकार्ड (मनोरोगतज्ज्ञ व अवकाशवीर) आणि आंद्रे बोर्षबेर्ग (व्यावसायिक) या स्विस जोडगोळीचा प्रकल्प आहे. "सोलार इंपल्स २" नावाचे केवळ सौरऊर्जेवर चालणारे (आणीबाणीकरताही इतर कोणत्याही प्रकारचे इंधन न वापरणारे; झिरो फ्युएल स्टेटस) विमान घेऊन ही जोडी पृथ्वीप्रदक्षिणा करायला निघाली आहे.