Skip to main content

कालव्यवस्थापन (Time Management) : एक अपसंज्ञा (चुकीचे नाव, misnomer)

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी गुरुवार, 05/03/2015 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी संज्ञा (term, name) पकडून तिचे व्यापारीकरण करणे हे काही नवीन किंवा विरळ नक्कीच नाही. एखाद्या संज्ञेची पद्धतशीरपणे प्रसिद्धी करून मोठा उद्योग निर्माण होऊ शकतो असे लक्षात आले की मग त्या संज्ञेभोवती जाणीवपूर्वक इतके मोठे वलय निर्माण केले जाते की, त्या संज्ञेचा अर्थ समजला जातो तसाच आहे की ती अपसंज्ञा आहे, इकडे लक्ष न देता तिचा उदो उदो केला जातो. अश्या परिस्थितीला "पूर्वग्रहदोष (cognitive bias)" असे म्हटले जाते आणि शब्दाच्या आशयाशी प्रामाणिक नसलेल्या संज्ञेला "अपसंज्ञा (misnomer)" असे म्हणतात. कालव्यवस्थापन ही अशीच अनेक दशलक्ष डॉलर उद्योगाला जन्म देणारी अपसंज्ञा आहे.

थैमान

लेखक जयंत माळी यांनी बुधवार, 04/03/2015 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाइन फ्लूने सध्या सर्वत्र थैमान घातले आहे. सध्या महाराष्ट्रात स्वाइन फ्लू झालेल्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. कसा आहे हा जीवघेणा व्हायरस. ? काय आहेत स्वाईन फ्ल्यू होण्यामागची कारणे जाणून ? घ्या लेखातून. स्वाइन फ्लू हा इन्फ्लूएन्झा रोगाचा प्रकार असून जो सर्वसाधारणपणे डुक्कर या प्राण्यात आढळणार्या विषाणूंमुळे होतो. सतत डुक्कर या प्राण्याच्या संपर्कात राहणार्या माणसांना या रोगाची लागण होऊ शकते. मात्र डुकराचे मांस खाण्याचा या आजाराशी काहीही संबंध नाही.

लावणी – एक मराठमोळी निशाणी (मराठी भाषेतील सौंदर्यस्थळे)

लेखक सस्नेह यांनी सोमवार, 02/03/2015 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
‘टांग टांग टांग धडांग टांग टिक टिक..’ असा ढोलकी-हलगीचा आवाज कानावर पडला की सजग होऊन कान टवकारणार नाही तो मराठी माणूसच नव्हे ! तमाशा आणि खास करून लावणी ही खास ‘मऱ्हाटी’पणाची ओळख. मराठी भाषा लोकप्रिय आणि समृद्ध करण्यामध्ये मोलाचा वाटा आहे, तमाशा आणि त्यातही लावणी या नृत्य-प्रकाराचा. तमाशा ही गेल्या दोन शतकांपासून ग्रामीण मराठी माणसाची सर्वात लोकप्रिय लोक-कला आहे. सुरुवातीला मनोरंजनार्थ सुरु झालेल्या या कलेचा पाहता पाहता विकास होऊन ती सामान्य जन-मानसाच्या मुखात, बोलात सहज रुळून गेली.

२०१५ बृहन्महाराष्ट्र मंडळ १७वे अधिवेशन- कार्यक्रमांची माहिती

लेखक बीएमएम२०१५ यांनी गुरुवार, 26/02/2015 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
बृहन्महाराष्ट्र मंडळाचे १७वे अधिवेशन या वर्षी ३ ते ५ जुलैच्या दरम्यान लॉस एंजलिस जवळच्या अॅनाहाईममध्ये भरणार आहे. बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनाचे एक महत्वाचे विशेष म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये उत्तर अमेरिकेतील कलाकारांना आपली कला लोकांपुढे सादर करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते. अधिवेशन समितीने आलेल्या प्रवेशिकातून अनेक दर्जेदार कार्यक्रम निवडले आहेत. नाट्य रसिकांसाठी यावेळी विशेष मेजवानी आहे. ’मी आणि माझा ओझे (Jose)’ हे विनोदी नाटक न्यू जर्सीच्या कलाकारांकडून यावेळी सादर होणार आहे. ह्युस्टनचे कलाकार यावेळी ‘दुर्गा झाली गौरी’ हे सुप्रसिद्ध नाटक सादर करणार आहेत.

प्रिंटरवर छापलेल्या विमानातून प्रवास करायला तयार व्हा !

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी रविवार, 15/02/2015 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
डोळे चोळू नका. तुमचे डोळे ठीक आहेत... आणि इथे टंकनचूकही झालेली नाही ! तंत्रज्ञांनी विमानाचे इंजिन "छापण्याचे" तंत्र विकसित केले आहे आणि जवळच्या भविष्यात तुम्ही त्या तंत्राने बनवलेले इंजिन आणि इतर भाग वापरून बनवलेल्या विमानातून प्रवास करू शकाल ! .

त्रिमिती छपाई (3D printing) अथवा संयोगी वस्तुनिर्माण (Additive Manufacturing, AM)

तसे बघितले तर 3D छपाई ही काही नवीनं गोष्ट नाही. हे तंत्र १९८० मध्ये नागोया मुनिसिपल इंडस्ट्रियल रिसर्च इंस्टिट्यूट (जपान) मधील हिदेओ कोदामा या तंत्रज्ञाने विकसित केले.

वैदिक काळातील वीरांगना

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 09/02/2015 19:43 या दिवशी प्रकाशित केले.
ऋग्वेद वाचीत असताना, एका अनाम वीरांगनेने गाजवलेल्या पराक्रमाची गाथा सापडली. या अनाम वीरांगनाचे नाव कुणाला ही ठाऊक नाही. तिची ओळख तिच्या पतीच्या नावानेच. वैदिक काळात गायी हेच धन. गौ धन पळविण्या साठी शत्रू किंवा दस्यू नेहमीच आक्रमण करायचे. आर्य आणि अनार्य दस्युनीं मिळून गौ धन चोरण्यासाठी आक्रमण केले. गौ धन पुन्हा मिळविण्यासाठी सेनापती मुद्‌गल याने शत्रूवर आक्रमण कण्याचा निश्चय केला. त्याची पत्नी मुद्गलानी ही त्याच्या सोबत शत्रूचा सामना करण्यासाठी रणांगणावर अवतरली. तिने एका पुष्ट बैलाला रथाच्या जुव्याला बांधले. जोरदार आरोळी ठोकत तिने तुफान वेगाने रथ हाकला.

नरहरी सोनार हरीचा दास

लेखक देवदत्त परुळेकर यांनी शनिवार, 07/02/2015 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आज संत नरहरी सोनार महाराज यांची पुण्यतिथी (माघ वद्य तृतिया). त्यांना भावपूर्ण आदरांजली. वारकरी संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. विविध व्यवसाय करणारेही संत आहेत. बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. गोरा कुंभार, सावता माळी, सेना न्हावी यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. वाड्‌.मयेतिहासात त्यांचा ’नरहरी सोनार’ असा उल्लेख केला जातो. यादवकालात शिवाचे उपासक ’शैव’ आणि विष्णूचे उपासक ’वैष्णव’ या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता.

कथाश्री २०१४

लेखक नाखु यांनी बुधवार, 04/02/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
कथाश्री २०१४ हा दिवाळी अंक गरज या विषयाला वाहिलेला आहे. या विषयाला अनुसरून उचित लेख आहेतच्,शिवाय मंगला खाडीलकरांनी घेतलेल्या तीन मुलाखती वाचनीय आहेत.
  • कुमार सप्तर्षी यांची मुलाखत त्यांची राजकीय जडण घडण , सामाजीक भान आणि वैचारीक स्पष्टता अगदी तपशीलवार उलगडली जाते. आजच्या राजकीय प्रगल्भतेच्या (दिवाळखोरीच्या) पार्श्वभूमीवर त्यांची पक्षविरहीत मते नक्कीच विचारात पाडतात
  • दुसरी मुलाखत ही विनय सहस्त्रबुद्धे यांची "रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी" च्या वाटचालीबद्दल आणि योगदानाबद्दल आहे.

अगा जे घडलेची नाही...अर्थात न उडालेले वैदीक विमान !

लेखक स्वप्नांची राणी यांनी शनिवार, 31/01/2015 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवातीला एक चेंडू घरंगळत येतो आणि एका कश्यातरी बांधलेल्या पट्टीवरून धडपडत जाऊन दुसर्‍या चेंडूवर आपटतो..की तो दुसरा चेंडू वरुन खाली टूणकन उडी मारतो आणि एक चाक गरागरा फिरायला लागते. मग त्यामुळे पुढे बरेचसे चेंडू पळापळ करून चाके फिरवतात आणि शेवटी अचानक एक म्हातारा दोरांसकट एका बोटीच्या नाळेवर हवेत उचलला जातो. आपली रोझ आणि जॅक जसे टायटॅनिकवर उडण्याची अ‍ॅक्शन करतात ना तसं, फक्त हा जरा जास्त हवेत दाखवलाय. हा सीन पुढे पिक्चरमधे किमान चारवेळा येतो आणि उत्तरोत्तर तो तितकाच अनकन्विन्सिंग होत जातो....सीनही आणि साहजिकच सिनेमाही! आपल्या मिकी माऊसचे सायन्सचे प्रयोग यापेक्षा कितीतरी जास्त पटणेबल वाटतात.

इराकची खातून

लेखक विशाखा पाटील यांनी गुरुवार, 29/01/2015 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेने इराकवर हल्ला केला आणि इराकची वाताहत सुरू झाली. २००३ मध्ये अमेरिकेने हा हल्ला केला तेव्हा अमेरिकेच्या सैन्याने सर्वात आधी तेलमंत्रालयावर कब्जा केला. जवळच बगदादच समृद्ध वस्तुसंग्रहालय होतं. तिथे फक्त दोन सैनिक एका रणगाड्यावर उभे होते. त्यांना न जुमानता लोकांनी हजारो वर्षांचा ठेवा लुटून नेला. सुमेरिअन, बेबिलोनिअन, अकडीअन, ऑटोमन संस्कृतीचा वारसा सांगणारा हा अनमोल खजिना लोकांनी दिवसाढवळ्या लुटला. हा ऐवज जगभर विकला गेला. या वास्तूसंग्रहालयाची संस्थापक होती गरट्रुड बेल ही ब्रिटीश स्त्री. खरं तर, ही इराक या देशाची शिल्पकार. या देशाचा नकाशा घडवणारी एक चतुर स्त्री.