Skip to main content

पुणे कट्टा- ४ ऑक्टोबर २०१५,

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 02/10/2015 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
दिव्यश्रींच्या धाग्यावर जरा जास्तचं मारामारी झाली. असो. कट्टा फायनालाईझ झालेला आहे. कट्टा खालीलप्रमाणे होईल. तारिख पे तारिखः ४ ऑक्टोबर २०१५ वेळः रविवारी पहाटे ११.०० वाजता स्थळः पुण्यनगरीमधली पाताळेश्वर ही पावन जागा कार्यक्रम: भेटणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे, खादाडी, गप्पा हाणणे, गप्पा हाणणे आणि टवाळक्या करणे फायनान्स डिटेल्सः टी.टी.एम.एम. कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. दुर्वांकुरला जायचं का? (संपादकांना विनंती-४ तारखेनंतर धाग्यास हेवनवासी करावे. धाग्याकर्त्याला नको) धन्यवाद.

३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा----वृत्तांत.......

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 16/09/2015 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : मला फोटो काढता येत नसल्याने मी फोटो काढत नाही. परवा ठरल्याप्रमाणे, कालचा "३८-बँकॉक-स्ट्रीट-घोडबंदर रोड ठाणे कट्टा" सुरळित पार पडला. मी आणि सौ.मुवि, कळव्याला, मि.ट्का, ह्याच्या कडे गेलो. टका आणि मोदक, मुंबईच्या वाहतूकीमुळे थोडे उशीराच आले. मग टकाच्या गाडीतून कट्ट्याच्या ठिकाणी रवाना झालो. कळवा ते घोडबंदर हा प्रवास मजल-दरमजल करत गाठला.सुदैवाने टकाच्या मातोश्रींनी वाटेत खायला म्हणून काजू दिले होते.आनच्या सौ.ने आणि मि.मोदक ह्यांनी काजू खात-खातच प्रवास पुर्ण केला. मी आणि टका मात्र गप्पा-गोष्टी करण्यात दंग होतो. मोदक नुकतेच पुण्याहून आले असल्याने, उगाच पुणे विरुद

मोसाद

लेखक महासंग्राम यांनी मंगळवार, 15/09/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
आपण बर्याचदा MI६ अथवा जेम्स बॉंड बद्दल बऱ्याचदा वाचतो, ऐकतो पण मोसाद विषयी माहिती काहीच माहिती नाही ऑपरेशन रेड फाल्कन अथवा मोसाद विषयी मराठीत काही माहिती आहे का ? अशी माहिती असल्यास वाचनास अधिक मजा येईल त्या अनुषंगाने हा धागा निर्माण केला आहे.

उद्या कट्टा आहे....बाकीची माहिती खाली देत आहे....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 14/09/2015 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच समजलेल्या बातमीनुसार, मिपाकर मोदक (हे लायन सो-सो, श्री-अमुक-तमुक. अशा चालीवर वाचले तरी चालेल.), सध्या मुंबई परीसरात असून ते कट्टा करायला तयार आहेत असे समजले. जास्त पाल्हाळ न लावता, कट्ट्या संर्दभात माहिती देत आहे. तारीख - १५-०९-२०१५ वेळ - रात्रीचे ८ ठिकाण - ३८, बँकॉक स्ट्रीट, ठाणे.

Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग २ - स्पायडरमॅन एक स्वप्न

लेखक मोग्याम्बो यांनी सोमवार, 14/09/2015 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
Marvel : उदय, अस्त आणि उदय -- भाग १ डीसी साठी जे सुपरमॅन आणि बॅटमॅन चे महत्व आहे तेच स्थान स्पायडरमॅनला मार्वल मध्ये आहे. डीसी कॉमिक्स साठ च्या दशकात वॉर्नर ब्रदर्स ने विकत घेतल्यामुळे त्यांना सुपरहिरो वर चित्रपट निर्माण करायला जास्त त्रास झाला नाही. त्यांनी ८०च्या दशकापर्यंत सुपरमॅन वर आधारीत तीन चित्रपटांची निर्मितीही केली आणि मार्वल कडून अजुन काहीच हालचाल होत नव्हती. तिसऱ्या सुपरमॅन चित्रपटास म्हणावे तसे यश मिळाले नाही.

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

लेखक दिव्यश्री यांनी बुधवार, 09/09/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

लोकमान्य टिळकांचे अग्रलेख विकीमध्ये टंकण्यात साहाय्य हवे

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 08/09/2015 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी विकिस्रोत प्रकल्पात टिळकांचे केसरीतील लेख भाग ४ संकीर्ण लेख संग्रह (सामाजिक धार्मिक वाङमय विषयक) ग्रंथ उपलब्ध केला आहे. या ग्रंथाची पाने वाचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.

(इच्छामटण)

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 08/09/2015 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
इच्छामटण ह्याचा अर्थ मनात इच्छा आली की "चांगले मटण" खायला मिळणे असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात आणि शेवट तांबड्या पांढर्‍या रस्स्याने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते , बायकोच्या हातात असते. ’इच्छामटण हवे’ असे तोंड खवळलेल्या व्यक्तीने सांगितले तरी श्रावणात घरातल्यांना ते पटत नाही. चातुर्मासात घरी गुपचुप मटण बनवुन खाणे अवघड असते. बायको समजुतदार असली तर त्यातल्या त्यात चांगले. परंतु बायको श्रध्दाळु असली आणि नातेवाई़क आसपास रहाणारे असतील तर मात्र अशा चवीने मटण खाणार्‍यांची अवस्था खुप दयनीय होते.

या पाच गोष्टी कायम कराव्यात

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 08/09/2015 14:12 या दिवशी प्रकाशित केले.
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.