एक वर्तुळ पूर्ण झालं
नाशिकजवळ सिन्नरच्या कुशीत बिलगलेलं डुबेरे नावाचं गाव आहे. अगदी छोटसं गाव. हे दोन गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. एक इथं भोपळ्याचा वेल आहे म्हणून आणि मराठी साम्राज्याचा उत्तर दिग्विजय घडवून आणणारा महापराक्रमी पहिला बाजीराव पेशवा इथे
जन्माला आला म्हणून.
या गावातच साठेंचं घर आहे. एके दिवशी गाडी काढली आणि बायकोला मागे टाकून थेट डुबेरे गाठलं. साठेंचं घर शोधून काढलं
आणि 'त्या' खोलीत प्रवेश केला. जिथे मराठी साम्राज्याचा पराक्रमी सूर्य जन्माला आला होता. अगदी थरारून गेलो होतो आम्ही.
या छोट्याशा खोलीत बाजीरावाचा फोटो होता. एक तलवार होती. फार काही नव्हतं.
मिसळपाव