Skip to main content

उत्तर शोधायचे आहे!

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.

उकडीचे मोदक

लेखक शेखर यांनी शुक्रवार, 28/03/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी उकडीचे मोदक खायचे आहेत का? चला तर मग ते कसे बनवतात ते पाहु. साहित्य ४ वाट्या किसलेला ओला नारळ २ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ १/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड ३ वाट्या तांदुळाचे पीठ ३ कप पाणी ३ चमचे लोणी १/२ चमचा मीठ कृती एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्‍यापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा. हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्‍या बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा.

मिपाचे धोरण..

लेखक सरपंच यांनी शनिवार, 22/03/2008 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, मिसळपाव ह्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत आहे! :) आपल्याला कोणतीही अडचण आल्यास ती कृपया या पत्त्यावर लिहून कळवावी. अडचण कळवण्यापूर्वी कृपया हे एकदा वाचून पाहावे. येथे लेखन करण्यापूर्वी मिसळपावचे (मिपाचे) खालील धोरण ध्यानात घ्यावे व सहकार्य करावे, ही नम्र विनंती..
  1. लिहिणार्‍या प्रत्येक माणसाबद्दल व त्याच्या लेखनाबद्दल मिपाला अत्यंत आदर आहे परंतु मिपा सभासदांव्यतिरिक्त इतर कुणाचेही लेखन, तसेच पुढे ढकललेली इपत्रे इत्यादी लेखन मिपावर प्रसिद्ध करण्यास बंदी आहे.

गमभन ०८.०२.२० आवृत्ती प्रकाशित..

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 24/02/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.

राम राम मंडळी,

आपल्याला सर्वांना कळविण्यास अत्यंत आनंद होतो की मिसळपाव डॉट कॉमच्या अक्षर-सामर्थ्यदात्याने, म्हणजेच गमभन ने आता कात टाकली असून त्याची पुढील आवृत्ती 'गमभन ०८.०२.२०' ही आता प्रकाशित झाली आहे आणि मिसळपावला जोडली गेली आहे!

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 24/02/2008 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.

मेतकुट भात

लेखक शेखर यांनी शुक्रवार, 22/02/2008 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
मेतकुट भात न आवडणारे फारच कमी लोक भेटतील. मेतकुट भात हा माझा वीक पॉइंट... मी जरा वेगळ्या प्रकारे करुन खातो. एका माणसाचा गरम व ताजा भात खोलगट भांड्यात घ्यावा. त्यात ३ ते ४ चमचे मेतकुट व ३ चमचे तुप घालावे. भांडे मंद आचेवर ठेवावे. त्यात अर्धा कप पाणी घालावे. हे सगळे मिश्रण नीट एकत्र करावे. भात गरम व चांगला गुरगुटा होऊन द्यावा. असा गरम गरम भात खाण्यास खुप चांगला लागतो. सोबत ताक असल्यास उत्तम.. शेखर.

शिळा सप्तमी

लेखक सृष्टीलावण्या यांनी बुधवार, 20/02/2008 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्‍या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला. शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात. कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.

संततीसंबंधी समस्या -- बीज क्षेत्र विचार

लेखक धोंडोपंत यांनी गुरुवार, 14/02/2008 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, संतती न होण्याचे समाजातील प्रमाण मोठे आहे. आणि गेल्या काही वर्षात विविध कारणांनी ते वाढले आहे. याचे एक कारण म्हणजे प्रेमविवाहाचे वाढते प्रमाण. प्रेमविवाहात जोडिदारांच्या पत्रिका जुळत आहेत की नाही हा मुद्दा पूर्णपणे दुर्लक्षित होतो. आणि त्यानंतर त्याचे दुष्परिणाम संतती न होणे, संतती होऊन जाणे, वारंवार गर्भपात होणे, त्यातून येणारे नैराश्य, जोडीदारांचे एकमेकांशी न पटणे, "तुझ्यामुळे माझे आयुष्य बरबाद झाले" अशा स्वरूपाचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप, आणि त्याची परिणती म्हणजे घटस्फोट आणि विभक्तता. त्याचप्रमाणे काहीजणांच्या कुंडलीत मुळातचं संततीसौख्य नसतं.