Skip to main content

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

अमराठी मुलखात अस्सल मराठी बालनाट्य

लेखक विसुनाना यांनी मंगळवार, 10/06/2008 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
हैदराबाद: येथील 'रंगधारा' या नाट्यसंस्थेच्या वतीने दि. १२ मे २००८ पासून बालनाट्य प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यात भाग घेणारी सर्व मुले अमराठी शाळेत शिकतात. त्यांना मराठी नीटसे बोलताही येत नाही. कारण घराबाहेर (क्वचित घरातही) असलेले अमराठी वातावरण. (मराठी वाचण्याची तर बातच सोडा. ) परंतु तरीही ती ८ ते १३ वर्षे वयाची मुले एक अस्सल मराठी बालनाट्य सादर करणार आहेत. ते आहे -"राजकन्येची बाहुली".

अनभिषिक्त जगज्जेता!

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 06/06/2008 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
"काकांनी जिंकण्याची संधी गमावली!" लहानग्या पॉलच्या उद्गारासरशी बुद्धीबळाचा डाव मांडून बसलेल्या काका आणि वडिलांनी त्याच्याकडे चमकून बघितले! त्यांना हे माहीत नव्हते की ते एका भावी जगज्जेत्याचे बोलणे ऐकत आहेत.

आमच्या घरातून दिसणारा सिंहगड... छायाचित्रे...

लेखक भडकमकर मास्तर यांनी शुक्रवार, 06/06/2008 01:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी सिंहगडापासून सुमारे ३५ किलोमीटर अंतरावर राहतो... नेहमीच दिसत नाही सिंहगड घरातून.... ती मागची डोंगराची रांग बर्‍याचदा ढगाच्या पडद्या आड असते... पण कधीतरी दिसतो....

जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 29/05/2008 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्‍या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्‍या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे व न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली. २९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे.

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/05/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

साडेतीन शहाणे

लेखक llपुण्याचे पेशवेll यांनी गुरुवार, 22/05/2008 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे? माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना. १. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास २. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी ३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर ४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.