उकडीचे मोदक
लेखनप्रकार
मंडळी उकडीचे मोदक खायचे आहेत का? चला तर मग ते कसे बनवतात ते पाहु.
साहित्य
४ वाट्या किसलेला ओला नारळ
२ वाट्या कुटलेला अथवा किसलेला गुळ
१/२ चमचा वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड
३ वाट्या तांदुळाचे पीठ
३ कप पाणी
३ चमचे लोणी
१/२ चमचा मीठ
कृती
एका भांड्यात खोवलेला ओला नारळ, गुळ, वेलदोडे पुड अथवा जायफळ पुड एकत्र करा व ते मिश्रण बर्यापैकी कोरडे व मोकळे होई पर्यंत गरम करा व नंतर बाजुला ठेवा.
हे मिश्रण गरम होई पर्यंत , दुसर्या बाजुला एका भांड्यात पाणी गरम करा. त्या पाण्यात चिमुटभर मीठ आणी थोडेसे लोणी टाका. हळुहळू त्या पाण्यात तांदुळाचे पीठ सोडा व ढवळत रहा. पीठ सोडत असताना पीठाच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. दहा मिनीटे भांड्यावर झाकण ठेऊन मंद आचेवर गरम होऊ द्या.
ही उकड गरम असतानाच चांगली मळुन घ्या. मळताना हाताला थोडेसे तेल लावा म्हणजे उकड हाताला चिकटणार नाही.
उकड मळुन झाल्यावर लिंबा एवढे गोळे करा व गोळे पुरीच्या आकारात लाटा किंवा हातावर सपाट करा. नारळ आणी गुळाचे मिश्रण उकडीत भरा. उकड भरुन झाल्यावर सर्व बाजुने बंद करा व मोदक टोकदार करा.
मोदक तयार झाल्यावर एका भांड्यात पाणी ते भांडे गॅस वर ठेवा. त्या भांड्यावर चाळणी अथवा पातळ सुती कापड ठेवा. त्या चाळणीत अथवा कापडावर मोदक ठेऊन चाळणी अथवा कापड झाका. २० मिनीटे मोदक वाफेवर उकडुन घ्या. ही क्रिया तुम्ही ईडली पात्रात सुध्दा करू शकता.
आता मोदक खाण्यास तयार झाले.
गरम गरम मोदक ताटात घ्या आणी त्यावर भरपुर तुप घाला. तुपाशिवाय मोदक खाणे म्हणजे मोदकाचा अपमान ....
शेखर
(जगण्या साठी खाऊ नका... खाण्यासाठी जगा)
टीप : तात्या ह्यातील फोटो खादाडी वर टाकले तरी चालतील.
टीप : तात्या ह्यातील फोटो खादाडी वर टाकले तरी चालतील.
वाचने
10247
वाचनखूण
प्रतिक्रिया
21
आहाहा भूक
वा वा वा वा वा वा
अरे देवा तु कधी येणार घरी?
In reply to अरे देवा तु कधी येणार घरी? by स्नेहश्री
स्नेहश्री
मस्त
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
व्वा..
In reply to व्वा.. by स्वाती दिनेश
+१
(विषय दिलेला नाही)
भूक
वा!
भूक...भूक...भूक.....
"गणपती बाप्पा मोरया"
मोदक
सुन्दर पाककृती.
केवळ छळ!
मस्तच.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!
का ? त्रास का द्यावा?
खुप भुक लागली ..
In reply to खुप भुक लागली .. by स्वप्निल..
नाही हो...
व्वा,,मोदक्