Skip to main content

चित्रपट ओळख - लेटर्स फ्रॉम इवो जिमा

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शुक्रवार, 29/05/2009 05:20 या दिवशी प्रकाशित केले.
युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्‍या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते.

मिसळपाव प्रतिष्ठान..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 26/05/2009 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, संगीत, साहित्य, व कला आदींना वाहिलेली 'मिसळपाव प्रतिष्ठान' या विश्वस्त संस्थेची आम्ही नोंदणी केली आहे.

एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा (०२)

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 19/05/2009 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवा या लेखनमालेच्या पहिल्या भागात काही सदस्यांच्या प्रतिसादास मी सहमत आहे तसाच असहमतही आहे. तरीही मिळालेल्या प्रचम्ड प्रतिसादामुळे ( २६ प्रतिसाद ८६८ वाचने) मी पुढचा भाग लिहीत आहे. एका रात्रीत वजन दोन ते अडीच किलोने घटवण्याचे तुम्ही ठरवले असेल तर सर्वप्रथम तुमचे अभिनन्दन तुमच्या निश्चयाला आमचा सलाम.

फडफड फडफड फडकतो.....

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी मंगळवार, 19/05/2009 03:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी टीव्ही म्हणजे फक्त संध्याकाळीच आणि ते पण फक्त एकच वाहिनी... खरं म्हणजे तेव्हा वाहिनी / चॅनल वगैरे शब्दच माहित नव्हते. टीव्ही हा एकच शब्द. तर, अशा त्या टीव्हीवर कधीमधी समूहगान असा एक प्रकार असायचा (आणिबाणी नुकतीच संपली होती पण काही नवीन प्रकार देऊन गेली होती, त्यातलेच समूहगीत हे एक). त्या समूहगीतांमधे एक गाणे नेहमी ऐ़कू यायचे... "ध्वज विजयाचा उंच धरा रे..." त्यातले ते लांबवलेले हुंऽऽऽ चांगलेच आवडायचे. पण ध्वज / झेंडा वगैरे काही प्रकार असतो हे तेव्हाच लक्षात आले होते. थोडं मोठं झाल्यावर मी आणि माझी आई एक खेळ खेळायचो. नकाशात एखादं गाव शोधायचं किंवा देश शोधायचा.

मिहार

लेखक दवबिन्दु यांनी रविवार, 17/05/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
कोनतीबी सोसायटी म्हनली कि डोल्यापुढ आपसात भांडनारे सोसायटी मेंम्बर येतात. सगल्याना इगो आस्तो. पन कान्दीवली मधी चारकोपला येक मिहार नावाची हायफाय हौसिंग सोसायटी हाए तिथ कोन्त्याबी मेंबराकड लग्न, एन्गेजम्येंट आस कायबी आस्ल तर सोसाटीतले सगले लोक एकसाथ येतात. एकमेकाना लागल ति मदत करतात. नंतर लग्न, एन्गेजम्येंटच्या ४-५ दिवस आधि सर्वे मिळुन रातभर नाच गाणी म्हंतात. मी गेल्या वेळला तिथ गेलो व्हतो आमच्या पाव्हन्याकड लग्न होत तर सर्वे जमले आनि परत्येकान सारी रात जुन्या हिंदी पिक्चरामधली गानी म्हटली. सोबतीला ढोल्की होती आनी घुंगरु, पन्जाबी चिपल्या आस काय काय होत. जास्त करुन लताजीची गानी म्हटली.

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 16/05/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो. आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे.. 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे!

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..२

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे -- १ १) संगीत पुण्यप्रभाव व संगीत राक्षसी महत्वाकांक्षा या दोन नाटकांची १९५० सालातली कोकणातल्या गुहागरातील जाहिरात. नटवर्य नानासाहेब फाटक, मास्टर दामले (नूतन पेंढारकर), मा दत्ताराम अशी मातबर ष्टार कास्ट! जाहिरातींवरून गुहागरातले दामले नावाचे कुणी वकील नाटकाची तिकिटं विकण्याचे काम पाहात असत असं जाहिरातीतून कळतं!

माझ्या संग्रहातील काही प्रकाशचित्रे..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 14/05/2009 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आजपर्यंत गाण्याबजावण्याच्या दुनियेत खूप मुशाफिरी केली. ती करत असताना अनेक जुनी-दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, इतिहासाची साक्षिदार असलेली जुनी-दुर्मिळ प्रकाशचित्रे माझ्या संग्रही जमा होत गेली. त्यातली काही प्रकशचित्रे आज इथे देत आहे. ह्या प्रकाशचित्रांचे श्रेय त्या सर्व अज्ञात प्रकाशचित्रकारांना. परंतु त्यावरील शीर्षके-शब्दांकन-टिप्पणी अर्थातच तात्या अभ्यंकरांची..! १) ॐ भास्कराय नम: पं भास्करबुवा बखले. संगीताच्या दुनियेत खरोखरच ज्याला भास्कर म्हणावं असा गवई, उतम गुरू. आग्रा, ग्वाल्हेर आणि जयपूर या तीन घराण्यांवर हुकुमत.