Skip to main content

माहिती

मनश्री

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 07/04/2009 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
अरुण शेवतेंचं 'हाती ज्यांच्या शून्य होते' वाचलं तेव्हाच 'मनश्री'शी ओळख झाली आणि तिला अधिकाधिक जाणून घ्यायची इच्छाही.. कारण तिच्या हातात फक्त शून्यच नाही तर अंधारभरलं शून्य होतं पण त्या अंधारालाही उजळायला लावेल अशी तिची जिद्दकथा.. तिची,तिच्या आईची आणि सार्‍या कुटुंबाची! मनश्री जन्मली तिच मुळी डोळ्यात अंधार घेऊन,तिला जन्मत: बुब्बुळच नव्हती आणि त्यात भर म्हणून की काय फाटक्या ओठाची भर, मेंदूची वाढ,मणक्यांची क्षमता, मुकेबहिरेपणा .. अजून कायकाय तिच्यापुढे वाढून ठेवलं होतं ते समजलं नव्हतं. उदय आणि अनिता सोमण ह्या मध्यमवर्गीय दांपत्याचे हे लेकरु देवाचं उलट दान घेऊन जन्मलं.

आरोग्य आणि स्वस्थता

लेखक नरेंद्र गोळे यांनी सोमवार, 06/04/2009 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
आरोग्य आणि स्वस्थता
आरोग्य म्हणजे मनुष्याची निरोगी, अविकृत, प्राकृत अवस्था. प्रकृती. कुपोषण, अतिसेवन, अजीर्ण, जंतूसंसर्ग, विकार, रोग, अपघात ह्यांमुळे आरोग्य धोक्यात येते. हीच विकृत अवस्था. विकृती. प्रकृती सुदृढ असेल तर स्वस्थता आपसुकच येते. सुदृढ मनुष्य स्वस्थतेच्या निरनिराळ्या स्तरांवर राहू शकतो. निकोप जीवन जगू शकतो. मात्र असामान्य संकटास सामोरे जाण्याची त्याची प्रतिबंधात्मक आणि निवारणात्मक शक्ती स्वस्थतेवर ठरते.

दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 03/04/2009 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले. हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे.

जगन्नाथाची रथजात्रा

लेखक आळश्यांचा राजा यांनी शुक्रवार, 27/03/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
जगन्नाथस्वामी नयनपथगामी भवतु मे ।
- जयदेव, गीतगोविंद
उद्यम कमी असला तरी उत्सव साजरे करण्याच्या बाबतीत ओडिया लोकांइतके उत्साही देशात (पर्यायाने जगात) सापडणार नाहीत. ‘बारो मास तेरो पोर्ब’ अशी म्हणच आहे. पोर्ब म्हणजे पर्व – सण/ उत्सवांना इथे पर्व – पर्वणी म्हणतात. वर्षभरात इथे किती सण होतात त्याची यादीच करतोय. प्रत्येक महिन्यात सरासरी तीन-चार तरी असतातच. रथजात्रा हा इथल्या उत्सवांचा राजा. मागे सांगितल्याप्रमाणे इथे ‘य’ म्हणता येत असले तरी बऱ्याच ठिकाणी ‘ज’ वापरला जातो.

गजल का सफर. -

लेखक मॅन्ड्रेक यांनी बुधवार, 25/03/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर' कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा.

जननि कर्मभूमिश्च....

लेखक सुनील यांनी मंगळवार, 17/03/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
आई आणि मातृभुमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशा अर्थाचे सुवचन आपल्याला ठाऊक आहेच. पण मनात एक विचार येतो, जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल. हरगोविंद खुरानांपासून ते स्वाती दांडेकरांपर्यंत आणि मनमोहन सिंग-अडवाणींपासून ते मुशर्रफ यांच्यापर्यंत अनेक नावे डोळ्यापुढे तरळून गेली. अशी भारंभार नावे जमा होऊ लागली तेव्हा काही चाळण्या लावून नावे गाळून घ्यायची, असे ठरवले. एकूण तीन निकष लावले - १) सदर व्यक्तीने आपल्या कर्मभुमीसाठी काही तरी भरीव, ठाशीव असे योगदान दिलेले असावे.

गाण्याचे ट्रॅ़क्स हवे आहेत..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 16/03/2009 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मडळी, कोणाकडे खालील मराठी गाण्यांचे करौके साऊंडट्रॅक्स आहेत का? १. विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी २. वारा गाई गाणे.. ३. गडद जांभळं.. भरलं आभाळ.. एम पी ३ असेल तर उत्तम. जितक्या लवकर मिळतील तितक्या लवकर हवी आहेत. मला माझ्या जीमेल ला पाठवावी ही विनंती. - प्राजु

श्यामची आई

लेखक आनंद घारे यांनी रविवार, 15/03/2009 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌। छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।। छम्‌ छम्‌ छम्‌ ..... छम्‌ छम्‌ छम्‌ हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या.

ह्रदय-ज्योत परिवार - ओळख

लेखक अडाणि यांनी गुरुवार, 12/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर, आपणास 'ह्रदय-ज्योत परिवार' ह्या न्यासाची (ट्रस्ट) ओळख करून देवू इच्छितो. ह्रदय्-ज्योत परिवार हा गेली ५ वर्षे जन्मजात असलेल्या ह्रदयदोषासंबंधी काम करतो. आपल्याकडे बर्‍याचवेळा योग्य माहिती अभावी वेळेवर उपचार होत नाहित. दोषाचे निदान झाले तर उपचारांचा खर्च परवडत नसतो किंव्वा पैसे कसे जमा करवेत ह्याची माहिती नसते. अजूनही बर्‍याच लोकांना ह्रदयरोग आणि ह्रदयदोष ह्यातील फरक माहिती नसतो. ह्या सर्व बाबींच्या अनुशंगाने न्यास काम करतो.

तिच्या नजरेतून...

लेखक श्रावण मोडक यांनी रविवार, 08/03/2009 23:40 या दिवशी प्रकाशित केले.
(तीन महिन्यांनी हा संवाद पुढे आणतो आहे. मधल्या काळात तो (माझ्याचलेखी) अनेक रास्त आणि वाजवी कारणांसाठी मांडलेला नव्हता.)
---
थेट काश्मिरातून प्रा. अस्मा जहांगीर (अर्थातच, वास्तव नाव वेगळे) पुण्यात आल्या होत्या, एका अभ्यासासाठी. स्त्रीविषयक मुद्दे हा विषय अभ्यासाचा. स्त्री (आणि पुरूष) ही केवळ जीवशास्त्रीय घटना आहे की, सामाजिक संकल्पना (सोशल कन्स्ट्रक्ट) आहे असा पहिलाच प्रश्न विचारून ही तरुणी अनेकांची दांडी उडवत असावी.