Skip to main content

श्री. तुकोबारायांचे हस्ताक्षर

लेखक शरद यांनी बुधवार, 14/12/2011 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
श्री.तुकोबारायांचे हस्ताक्षर साठेक वर्षांपूर्वी श्री. परांजपे यांनी देहूच्या श्री. तुकारामांच्या वंशजांकडून " भिजलेल्या वहीचे अभंग " नावाचे सातएकशे अभंग मिळवून ते प्रसिद्ध केले होते. आज ते दुर्मीळ असल्याने " वरदा प्रकाशन " पुनर्मुद्रित करत आहे.

पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 12/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकूण पृष्ठसंख्या: ६४ किंमतः ६० रू. फक्त. नवता प्रकाशन मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे.

मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११

लेखक नितिन थत्ते यांनी रविवार, 11/12/2011 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले. मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते. कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते.