Skip to main content

बँक ठेवीना फायदेशीर पर्याय - एफएमपी

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 23/11/2011 21:06 या दिवशी प्रकाशित केले.
फिक्सड् मँच्युरिटी प्लान - एफएमपी
फिक्सड् मँच्युरिटी प्लान्स हे निश्र्चित कालावधी डेब्ट योजना (Close Ended Income Schemes) या प्रकारच्या योजनेत गणल्या जातात यांच्या मुदतपुर्तीचा कालावधी अगोदरच जाहिर केला जातो, सर्वसाधारणपणे या योजना स्टॉक मार्केटवर नोंदवल्या जातात.

हरिपूर जत्रेचे टिपलेले क्षण

लेखक अन्या दातार यांनी बुधवार, 23/11/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मागे हरिपूरला जाऊन आल्यावर हा लेख लिहिला होता. लेखाचा सूर थोडासा नाराजीचा असल्याने फोटो टाकायचे टाळले होते. आज सहज कॅमेरा मेमरी कार्ड स्कॅन करता करता तिथले फोटो सापडले.

बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा!

लेखक चित्रा यांनी रविवार, 20/11/2011 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेषक: राधा गुर्जर, बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या (बीएमएम) २०१३ मधील अधिवेशनाच्या मार्केटिंग कमिटीसाठी. बृहन्महाराष्ट्र मंडळाचे (बीएमएम) अधिवेशन म्हटले की अमेरिकेतील मराठी माणसांचा उत्साह अगदी अवर्णनीय असतो. १९७३ पासून दर दोन वर्षांनी बीएमएमचे अधिवेशन ही आता एक परंपराच झाली आहे. यावेळचे हे २०१३ चे अधिवेशन बॉस्टनमध्ये म्हणजे अमेरिकेतील विद्येच्या माहेरघरी भरणार आहे. त्यानिमित्ताने जवळजवळ चार ते पाच हजार मराठी मंडळी अमेरिकेच्या कानाकोपर्‍यांतून बॉस्टनला येणार असा अंदाज आहे.

ऊर्ध्वरेता

लेखक शरद यांनी शनिवार, 19/11/2011 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
ऊर्ध्वरेता एकदा श्रीकृष्णाला भेटावयाला दुर्वास ऋषी आपल्या शिष्यगणासकट आले. यमुनेच्या पलिकडे वनांत त्यांनी मुक्काम ठोकला. श्रीकृष्णाची शिवाचे अंश असलेल्या दुर्वास ऋषींवर अनन्य भक्ती होती. तेव्हा दुर्वासांच्या भोजनाकरिता श्रीकृष्णाच्या सर्व स्त्रीया भोजना़ची ताटे घेऊन निघाल्या. नदीपाशी येतात तो त्यांनी पाहिले की यमुना दुथडी भरून वहात आहे. आता काय करावयाचे? पलीकडे कसे जावयाचे ? त्या परत कृष्णाकडे आल्या व त्यांनी आपली अडचण त्याला सांगितली. तो म्हणाला " जा, यमुनेला सांगा की श्रीकृष्ण ब्रह्मचारी असेल तर आम्हाला वाट दे ". स्त्रीया नदीपाशी आल्या व त्यांनी श्रीकृष्णाचा निरोप सांगितला.

सफर-ए-चेरापुंजी :: लिव्हींग रुट्स ब्रीज..

लेखक चिगो यांनी शुक्रवार, 18/11/2011 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
राम-राम मंडळी.. लै दिवसांनी बोर्डावर येणं झालंय... तर सांगायचं म्हणाल तर असं, की सध्या मी मेघालयात आहे, आणि मेघालय सरकारनी मला आमपाटी नावाच्या एका पहील्या नजरेत "अहाहा ! निसर्गरम्य.." आणि लवकरच पकायला लावणार्‍या सब-डिव्हीजनला आणून बसवलाय.. तर ऑफीसात बसून-बसून फायलींच्या संगतीत पकल्यावर आणि थोडाफार फिल्डमध्ये लोकांच्या तक्रारी, शिव्याशाप आणि इतर बरंच काही ऐकून झाल्यावर, एका विकांताला आम्ही जरा शिलाँग-चेरापुंजीला भटकून यायचे ठरवले.. (तसाही शिलाँगला माझा "मुंह दिखाई" चा कार्यक्रम व्हायचा होता..) शिलाँगपासून चेरापुंजी ( लोकली "सोहरा") जवळपास दोन तासांच्या अंतरावर आहे.