Skip to main content

मदत पाहिजे - जीवनशाळांच्या रेकॉर्ड्सचे संगणकीकरण

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी गुरुवार, 29/12/2011 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जीवनशाळांच्या गेल्या वीस वर्षातील रेकॉर्ड्सचे संगणकीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. आज पर्यंत शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे रेकॉर्ड व्यवस्थितपणे पण लेखी चोपड्यांमधून जतन केले गेले आहे. हे सगळे आता संगणकावर घेतले जात आहे. यासाठी, आम्हाला, युनिकोड मराठी टंकन करणार्‍यांकडून काही मदत मिळाल्यास हवी आहे. प्रत्येकजण आपापल्या उपलब्धतेनुसार यात भाग घेऊ शकतो. मात्र सध्या फक्त पुणे अथवा मुंबईत राहणार्‍या लोकांनाच यात सहभागी करून घेता येईल. कामाचे स्वरूप साधारण असे असेल ...

जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... एल. आय. सी. चे घोषवाक्य कि निव्वळ फसवेगिरी..???

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 29/12/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
जिंदगी के बाद भी जिंदगी के साथ भी.... हे आहे एल. आय. सी. चे प्रसिद्ध घोषवाक्य..!!! .... खरेच एल. आय. सी. या घोषवाक्याप्रमाणे सर्वच बाबतीत प्रामाणिक आहे का..? की निव्वळ फसवेगिरी आहे..??? चला पाहू..! पण त्या आधी काही इतर खरी माहिती घेऊयात..!!!! जागतिक आरोग्य संघटना (वर्ल्ड हेल्थ ओर्गनायझेशन) ने सांगितल्यानुसार जगातील एकूण हृदयरुग्णांपैकी ६०% लोक हे भारतात आहेत..

विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी

लेखक सदानंद ठाकूर यांनी बुधवार, 28/12/2011 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
विमा प्रतिनीध म्हणून काम करण्याची एक वेगळी व नवीन संधी विमा प्रतिनीधी म्हणून अनेक व्यक्ती चांगले उत्पन्न मिळवत असतात हे सत्य आहे मात्र यात बरेच कष्ट करावे लागतात हि वस्तुस्थिती आहे. बहुतेक वेळा विमा पॉलीसी गळ्यात मारली जाते. तसेच विमा हे काही गुंतवणूकीसाठी फार चांगले उत्पादन मानले जात नाही. टर्म इंशुरन्स हे जीवन विम्याचे शुध्द उत्पादन आहे मात्र एवढे एकच उत्पादन विकणे हे विमा प्रतिनीधीला पुरेसे उत्पन्न मिळवून देण्यास असमर्थ ठरते कारण याचा हप्ता कमी असतो व दुसरे म्हणजे लोकांमध्ये याची जागरुकता फारच कमी आहे.

भ्रष्टाचारी उद्योगाविरुद्ध कारवाई व्हावी याकरिता दिलेल्या लढ्याचा वृत्तांत

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी बुधवार, 21/12/2011 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
अजय पॉली प्रायवेट लिमिटेड या खासगी उद्योगाकडून सरकारच्या विविध खात्यांची कशा प्रकारे फसवणूक होत आहे याबद्दल मी शासनास एक सविस्तर पत्र लिहीले.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/12/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स. हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.

मी ऑफिसमध्ये कामचुकार पणा का करतो..?

लेखक जमीर इब्राहीम 'आझाद' यांनी गुरुवार, 15/12/2011 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
दार वाजू लागले.. पण दिसत तर कुणीच नव्हते... दुकानदाराला वाटले भास झाला असावा.. दार पुन्हा वाजले .. मग त्याने खिडकीतून वाकून पाहिले तर एक धिप्पाड, मोठ्ठा, अल्सेशियन कुत्रा त्याच्या दुकानाचे दार ठोठावत होता.. त्याने त्याला लगेच हुसकून लावले....तरी पुन्हा तोच सीन.. कुत्रा त्याच्या दुकानाचे दार वाजवत होता.. मग त्याने नीट पहिले तर त्या कुत्र्याच्या तोंडात एक पिशवी होती..

एक मासा : सुदैवी की दुर्दैवी?

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 14/12/2011 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या औरंगाबाद-वेरूळची जी प्रवासवर्णन मालिका लिहितो आहे त्या प्रवासात एक क्वचित आढळणारी गोष्ट बघितली, अंध मासा. सकाळी लवकर पुण्याहून निघून दुपारी जेवायच्या वेळी औरंगाबादला पोहोचलो. कडकडून भूक लागली होती. शहरात शिरल्या-शिरल्या जे पहिले हॉटेल लागेल त्यात जेवून घेऊया असे ठरले. शहरात आल्यावर एक सुप्रिया नावाचे हॉटेल दिसले. ते कसे असेल ह्याची जरा चाचपणी करायला आत शिरलो माझ्या धाकट्याला घेऊन. आत भिंतींवर मोठे मोठे फिश टॅन्क्स होते, भिंतींवर म्हणजे भिंतींत कंसील्ड असलेले. माझ्या धाकट्या मुलाचा मासे हा वीक पॉंईंट आहे. लगेच त्याची ऑर्डर आली, 'इथेच जेवायचे' आणि तो एका टेबलावर जाऊन बसलाही.