पुस्तक परिचयः संगणकावर मराठीत कसे लिहाल? लेखक प्रसाद ताम्हनकर
लेखकमस्त कलंदरयांनी सोमवार, 12/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
एकूण पृष्ठसंख्या: ६४
किंमतः ६० रू. फक्त.
नवता प्रकाशन
मिपावर येण्यापूर्वी मराठीत काही लिहायचं तर मला फक्त iLeap हे एकच सॉफ्टवेअर माहित होतं. पण त्यात सगळी अक्षरं ऑनस्क्रीन कीबोर्डावर लिहायची असल्यानं टंकाळा यायचा. मराठी आंतरजालाशी ओळख झाली तरी मी वाचनमात्रच होते. एकदा कधीतरी एक चार ओळींचा प्रतिसाद लिहिला, त्यानेही चांगली पंधरा-वीस मिनिटे खाल्ली. मद्रासच्या सफरीचा पहिला भाग लिहिताना जी दमछाक झाली ती तर अजूनही लक्षात आहे. अशा वेळेस दणादण लेख, प्रतिसाद आणि मेगाबायटी खरडी टाकणार्यांसमोर कित्येकदा लोटंगण घालायची इच्छा व्हायची. (तेव्हा व्हायची, आता नाहीय. नाहीतर ढीगभर पायांचे फोटो यायचे व्यनि-खरडींमधून.)
आजकाल मला इतक्या सहजपणे मराठी लिहिताना पाहून इतरांच्या चेहर्यावरचा आदरभाव दिसतो. त्यांनाही मी "हे खूप सोपं आहे, तुम्हालाही सहज जमेल" असं सांगते. उदाहरण दाखवलं, की त्यांनाही पटतं, पण स्वत:ला जमेल की नाही याचा अंदाज येत नाही. अशांसाठी सन्माननीय* श्री. प्रसाद ताम्हनकर यांचे 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' हे सहज-सोपं-छोटेखानी पुस्तक उपयोगी पडेल.
आपण सगळेच मराठीत लिहितो. त्यामुळे पुस्तकात नक्की काय वेगळे असेल ही उत्सुकता सर्वांनाच आहे म्हणून हा लेखनप्रपंच.
पुस्तकाची अनुक्रमणिका
१. संगणकावर मराठी भाषा कशी वापरावी?
२. टंकलेखन तक्ता
३. गमभन
४. गमभन टूलकिट
५. 'गमभन'चे फायरफॉक्स एक्सटेंशन
६. बरहा
७. गूगल transliterate
८. गूगल transliterate online
९. quillpad
१०. समारोप
अनुक्रमणिकेवरून पुस्तकात काय असेल अशी साधारण कल्पना येते. सर्वात आधी युनिकोड ची तोंडओळख आणि त्यामुळे मराठी लेखन कसे सोपं झालेय याची थोडक्यात माहिती दिली आहे. त्यानंतर पायरीपायरीने सुस्पष्ट स्क्रीनशॉट्स तसेच कमीत कमी आणि समर्पक वाक्यांत गमभन ऑफलाईन कसे इन्स्टॉल करावे, तसेच ते ऑनलाईन कसे वापरावे हे सोदाहरण दाखवलेय. तीच गोष्ट फायरफॉक्स एक्स्टेंशन आणि बरहा, गूगल transliterate आणि क्विलपॅडची. उदाहरणादाखल काही वाक्येही इंग्रजी टाईपात आणि ती मराठीत कशी दिसतील हेही दाखवून दिले आहे. इन्स्क्रिप्ट बहुधा मुद्दामच वगळलं असावं कारण त्याचा कळफलक खास लक्षात ठेवावा लागतो. हा सगळा माहितीचा खजिना अवघ्या सत्तावन्न पानांच्या पुस्तकात अगदी व्यवस्थित बसवला आहे.
थोडक्यात सांगायचं तर अतिमाहितीचा मारा नाही, आणि आवश्यक असं काही वगळलं नाही** असा या पुस्तकाचा सारांश म्हणता येईल.
*- प्रकशन सोहळ्यात कुणाच्या नावापुढे सन्माननीय हा शब्द लावला नाही तर बहुधा त्या निवेदिकेला मंचावरून हाकलून देण्यात येईल अशी धमकी मिळाली होती. त्यामुळे हा शब्द अजून छळतोय
**- बरहामध्ये काही शब्द टंकताना साधारण युनिकोड्/गमभनपेक्षा वेगळे लिहावे लागतात. उदा: क्ष, र्य, ज्ञ, अॅ,ऑ इ.इ. याच ही माहिती देण्यास सन्माननीय लेखक विसरलेले दिसतात. (हा उगाच आमचा छिद्रान्वेषीपणा)
हेच म्हणतो.
यथावकाश खुद्द पर्याच हे पुस्तक ऑनलाईन अव्हेलेबल असल्याचा फोन करेल ह्याची खात्री आहे ;)
जोक्स अपार्ट, पुस्तकाची थोडक्यात ओळख आवडली.
नव्यानेच मराठी भाषा संगणकावर लिहायला शिकुन आंतरजालावर दाखल होऊ इच्छिणार्यांना ही एक मोलाची मदत ठरेल असा विश्वास आहे.
- छोटा डॉन
Oh nice thread man!
I can read Marathi but I also love to write in Marathi Language.
(Actually, my fiance is from Marathi culture and I want to impress her. :-) )
What is the cost of this book and from where I will get it? Can I order Online?
Thanks in advance.
माननीय परा यांच्या पुस्त्काचा माननीया मक यानी करून दिलेला परिचय आवडला. मी मराठीत कसं लिहिते याबद्दल बर्याच नातेवाईकाना, मित्रमंडळींना कुतुहल वाटतं. विंडोज एक्सपीमधे युनिकोड कसं अॅक्टिव्हेट करावं हे त्याना अनेकदा सांगून लक्षात येत नाही. मला सांगता नसावं बहुतेक. अशांना आता हे पुस्तक भेट म्हणून देण्यात येईल. पुस्तक कुठे कुठे उपलब्ध आहे हे माननीय लेखकांनी सांगाव. फ्लिपकार्टवर असेल तर फारच छान!
मकीने "बाल की खाल" काढली आहे तर पुढच्या आवृत्तीत माननीय परा यांनी ते सुधारून घ्यावं.
(मेल्या पर्या तुला ३ वेळा आणि मकीला १ वेळा माननीय म्हटलं आहे हे लक्षात असू दे!)
श्री परीकथेतील राजकुमारांच्या 'संगणकावर मराठीत कसे लिहावे?' ह्या पुस्तकाची थोडक्यात पण बहुमोल माहिती शेवटी मिपावर आली.
कांहीसा पुस्तक परीचय झाला आहे. आता प्रत्यक्ष वाचनाची ओढ आहे.
धन्यवाद मस्त कलंदर.
मनोगत चे शुद्धलेखन चिकित्सा टुल चा उल्लेख करावयास हवा होता...
खुप उपयोगी टुल आहे...
असो..दुसरी अव्रुत्ति निघाली कि त्यात उल्लेख करावा ...
परा नी आता ..तिरके ..मराठी कसे लिहावे यावर पण एक पुस्तक काढावे..
पुस्तकाची ओळख अधिक तपशिलवारपणे यायला हवी होती असे वाटले. कदाचित सदरील पुस्तक विकत घेऊन वाचावे असा हेतु परिक्षण करणा-या लेखिकेचा दिसतो (अंदाज हं ) . खरं तर अशी पुस्तके कोणी तरी 'सर्वार्थाने' पुढाकार घेऊन खेड्यापाड्यातील शाळेत जिथे नेट-बिट आहे. आणि संगणकावर लिहिण्याची ज्यांची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांना सदरील पुस्तक मोफत दिले पाहिजे असे माझे वैयक्तिक मत आहे.
शिक्षकांना तरी एक भेट प्रत दिली पाहिजे. ;)
मनातल्या मनात : सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही.
-दिलीप बिरुटे
>>>>सालं आपल्याला कसं या सोप्या विषयावर पुस्तक लिहायचं सुचलं नाही.
तुम्ही, 'संगणकावर मराठीत कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.
'संगणकावर मराठी कसे लिहू नये' ह्या विषयावर पुस्तक लिहावे असे सुचवितो. अशा पुस्तकाचीही कित्येक लेखकांना गरज आहे.
आपण मला वरील पुस्तकासंबंधी काही प्रकरणे कशी असावीत त्याची काही माहिती दिली तर थोडं थोडं करुन वरील विषयावर (संयुक्त विद्यमाने) पुस्तक लिहिता येईल. :)
-दिलीप बिरुटे
थोडा तपास केल्यास 'काही प्रकरणे' मिपावरच सापडतील.
बाकी वेगळ्याने काही तपास करण्याची आपणांस गरज नाही. आपल्या नजरेत मिपावर असे 'साहित्य'(?) अनेकदा आले असेलच.
अरे वाह. ६० रुपयात ६४ पण म्हण्जे साराभाई आधल्या मोनिशाच्या भाषेत पैसा वसूल!
पुस्तकात काय काय आहे हे अस सांगितल्यावर कोण मिपाकर पुस्तक घेईल? कारण सगळे ह्या अनुभवातून गेलेत आणि सन्माननीय पराकाकांनीच त्यांना मराठीत कसे टाकावे यावर मार्गदर्शन केले आहे.
पण तरी एका ज्येष्ठ मिपाकाराने हे पुस्तक काढले आहे.तेव्हा विकत घेतलेच पाहिजे.(मी नाही सगळ्यांनी)
सन्माननीय पराकाका कुठे मिळेल हे पुस्तक?
आता लग्नात हेच देणार आहेर म्हणून! (पेला रद्द!) ;)
धन्यवाद " मस्त कलंदर," " परिकथेतील राजकुमार " यांच्याशी संपर्क साधून लवकरच हे पुस्तक विकत घेत आहे. '' आपले " " परा " यांचे व " मिपा " चे आभार..!!!!!!!!
प्रतिक्रिया
थोडक्यात पंचनामा परिक्षण
पंचनामापरिक्षण आवडलं. ह्या पुस्तकाची ऑनलाईन* आवृत्ती कुठे मिळेल रे परा. ;) *हॅ हॅ हॅ पाराला कळलं असेलच. तुम्ही फुटा.+१
In reply to थोडक्यात पंचनामा परिक्षण by गणपा
Oh nice thread man!I can
मस्त परिचय
नुसतंच माननीय नाही हो तै,
In reply to मस्त परिचय by पैसा
पैसातईचा प्रतिसाद मननिय आहे!
In reply to मस्त परिचय by पैसा
तीन विरुद्ध एक
In reply to मस्त परिचय by पैसा
पुस्तकापेक्षा बहु-मोल ण्यान
छान..
ते
धन्यवाद..
मकीताईने विस्तृत परिचय करुन
मनोगत चे शुद्धलेखन चिकित्सा
वा वा.. मकीनं छान परिचय करून
छान
चांगला परिचय
पुस्तकाची ओळख अधिक
नम्र विनंती...
In reply to पुस्तकाची ओळख अधिक by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहा :)
In reply to नम्र विनंती... by प्रभाकर पेठकर
मिपावरच..
In reply to हाहा :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत. मराठी वर्डस् कसे
In reply to मिपावरच.. by प्रभाकर पेठकर
पुपे
In reply to सहमत. मराठी वर्डस् कसे by llपुण्याचे पेशवेll
आमालां ल्यायचं असेल तर आमाला
In reply to पुपे by कुंदन
अरे वाह. ६० रुपयात ६४ पण
आता लग्नात हेच देणार आहेर
In reply to अरे वाह. ६० रुपयात ६४ पण by किचेन
पेला
अभिनंदन -
""संगणकावर मराठी कसे लिहावे ""
इथेच..
In reply to ""संगणकावर मराठी कसे लिहावे "" by देविदस्खोत
धन्यवाद " मस्त कलंदर,"
"आपणही" "हा" "धागा" "वाचला" व
In reply to धन्यवाद " मस्त कलंदर," by देविदस्खोत