फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :
यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो.
गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का?