Skip to main content

यु. जी. कृष्णमूर्ती : एक नाकारण्यायोग्य 'तत्त्वज्ञ'

लेखक प्रास यांनी बुधवार, 16/11/2011 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखनाची प्रेरणा यु. जी. कृष्णमूर्तींच्या (युजी) विचारांवर आधारीत उपरोल्लेखित लेखासंदर्भात एकूणच यशवंतराव कुलकर्णींच्या माझ्याबरोबर आणि इतरत्र प्रतिसादप्रपंचादरम्यान झालेल्या वक्तव्यांचा विचार करता त्यांनी लेखात मांडलेल्या मुद्द्यांच्या संदर्भात काही लेखन आवश्यक वाटलं.

मन्वंतर: एक दृष्यकथा

लेखक मस्त कलंदर यांनी सोमवार, 14/11/2011 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
मन्वंतर ही ’जोशी की कांबळे’ हा चित्रपट ज्या कथेवरून घेतला आहे, तीची दृष्यकथा. कथानक तसं सरळसोट आहे. जातीव्यवस्थाग्रस्त भारतीय समाजात माणसाची आयडेंटिटी जातीमुळे कशी अधोरेखित केली जाते आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीस तीच ओळख कशी चुकीची आहे हे लक्षात येतं तेव्हा कोणत्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं, याचं चित्रण या पुस्तकात केलं आहे. जस्टीस जोशींचा मुलगा लहानपणी पळवला जातो आणि अपघाताने तो एका कांबळे कुटुंबात वाढतो. बारा/चौदा(यात लेखकाने घोळ घातलाय) वर्षांनी जोशींना आपला मुलगा कुठे आहे हे कळते आणि ते मुलाला घरी घेऊन येतात.

फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध :

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 05/11/2011 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
फ्रॅक्चरवरचे धनगराचे आयुर्वेदिक औषध : यावर्षीच्या २०११ मधील एप्रिलमधील गुढी पाडव्याला आमचा 'पाडवा' झाला. म्हणजे मला अ‍ॅक्सिडेंट झाला आणि पाय मोडला. :) डाव्या पायातील पटेला ( गुढग्याची वाटी) , टिबिया, फिब्युला, ( लेग बोन्स) आणि तळपायामधील एक लहान हाड एवढे सगळे मोडले. त्यानंतर ऑपरेशन झाले. प्लेट, मोळे, तारा.. काय काय बसवले. मग हळूहळू वॉकर, काठी घेऊन आणि आता तसेच चालायला लागलो. गेल्या आठवड्यात सहज नरसोबावाडीला गेलो. तिथे अन्नछत्रात प्रसादाला जात होतो. स्टँडवरुन उतरून अन्नछत्राकडे जात होतो. मी थोडा लंगडत जात होतो. अचानक एक माणूस माझ्याजवळ आला आणि म्हणाला, लंगडताय का? पाय फ्रॅक्चर झाला आहे का?

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता

लेखक gaikiakash यांनी शनिवार, 05/11/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी- १४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.

'दारु पिण्या'तला भ्रष्टाचार

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 02/11/2011 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
'सामना'च्या 2011 दिवाळी अंकात प्रकाशित झालेला लेख. अंकात जागेच्या उपलब्धतेनुसार काही मजकूर गाळला गेला आहे. येथे दिलेला लेख पूर्ण आहे. -------------------------------------------------------------------------------------------------------------------- नुकताच एका मित्राच्या आग्रहामुळे आपल्या सर्वांच्या लाडक्या, अण्णांच्या, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात भाग घ्यायला जे. एम. रोड वर गेलो होतो. नुसतंच घोषणाबाजी करायला बरं का, हे उपोषण वगैरे माझ्या कुपोषित तब्येतीला मानवत नाही. तर तिथे एक घोषणा ऐकली ‘एक दोन तीन चार, बंद करा हा भ्रष्टाचार’. ही घोषणा ऐकली आणि हसून हसून मुरकुंडी वळली.

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

लेखक प्रास यांनी बुधवार, 02/11/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.