Skip to main content

मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन (अ‍ॅप)

लेखक नीलकांत यांनी बुधवार, 01/02/2012 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सर्व मिपाकरांना कळवण्यात अत्यंत आनंद होतो आहे की मिसळपाव.कॉम हे आता अ‍ॅन्ड्रॉईड फोनवरून सहज वाचता यावं यासाठी मिसळपावचे अ‍ॅन्ड्रॉईड अप्लिकेशन बनवण्यात आले आहे. यामुळे मिपाचे पान उतरवून घेण्याचा वेग सामान्य ब्राऊजरच्या तुलनेत अधिक आहे. सध्या तरी मिपा वाचता यावं हा मुख्य भर आहे. सर्व अ‍ॅन्ड्रॉईड धारकांना विनंती आहे की हे अ‍ॅप वापरून बघा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा. म्हणजे यापुढील आवृत्तीमध्ये हवे ते बदल करता येतील. मिपा अ‍ॅप हे अ‍ॅन्ड्रॉईड मार्केट मध्ये मिसळपाव (misalpav) असे शोधल्यास सहज सापडेल.

२०१२... अजून काय???

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 25/01/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स. म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते.

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : फूटबॉल क्लब मॅनेजर्स

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 23/01/2012 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
भारताचा राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीवर काढलेला 'चक दे' पिक्चर तुम्ही पाहिला आहे का ? त्यात शाहरुख खानचा १ डायलॉक आहे ' हर एक टीम में बस एक ही गुंडा हो सकता है, और इस टीम का गुंडा मै हुं'. पाहिला असेल तर लक्षात ठेवा, पाहिला नसेल तर पाहुन घ्या आणि मग लक्षात ठेवा, कशासाठी ते आपण पुढे कुठेतरी नक्की पाहुयात. चवीने खाणे कुणाला आवडत नाही ? पण एखादा पदार्थ 'चांगला' होण्यासाठी आणि त्याचा आस्वाद घेतल्यानंतर जो काही 'तृप्ती'ची अनुभुती होते ती साधण्यासाठी नक्की काय काय लागते हो ? 'बेस्ट इन क्लास' उपकरणे असलेले अद्ययावत स्वयंपाकघर ?

पाहुणे येती मुंबईला

लेखक सुधांशुनूलकर यांनी शनिवार, 21/01/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीची धामधूम संपली, डिसेंबर महिना सुरु होऊन मुंबईत हळूहळू थंडी जाणवायला लागली, की मुंबईतल्या पक्षीप्रेमींची एकमेकांकडे चौकशी सुरु होते : आले का रे ? अजून का नाही आले ? केव्हा येणार ? आले, की मला नक्की सांग... BNHSमधे फोन करून बघूया... शेवटी ते येतात. हजारोंच्या संख्येने. एखाद्या दैनिकात बातमीसह त्यांचं छायाचित्र (लोकासत्ता, बुधवार, दि.

We The People of India....१

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 18/01/2012 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, येथे मिपावरती भारतीय राज्यघटनेवर काही माहितीपर लेखांची एक मालिका लिहायची असे बरेच दिवस आमच्या मनात जे होते त्याची आज आम्ही हा छोटेखानी प्रास्ताविक-लेख लिहून मुहुर्तमेढ करत आहोत. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली १९४७ साली जी समिती स्थापन झाली होती त्या समितीने जवळजवळ अडीच ते तीन महिने अथक परिश्रम घेऊन भारतीय राज्यघटना तयार केली, जी आपण स्विकारली आणि अंगीकारली. ही भारतीय राज्यघटना म्हणजे केवळ एक कायद्याचे जाडजूड निर्जीव पुस्तक नव्हे, तर गीता, बायबल, कुराण यांच्या तोडीची आणि

आय. एन.एस कुकरी

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 17/01/2012 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, हा लेख ९ डिसेंबरलाच लिहिला होता आणि त्या दिवशी टाकायचा विसरलो, तो आत्ता टाकत आहे.. बरोबर याच दिवशी १९७१ साली...... समुद्रात सभोवताल मृत्यूचे तांडव चालले होते. जहाज बुडताना पाण्यात ज्या मोठ्या लाटा व भोवरे उठतात त्यात माणसे गंटागळ्या खात होती. अनेक वस्तू पाण्यात भरकटत होत्या, बुडून वर येत होत्या.

कडेगावची भानामती आणि अंनिसची बुवाबाजी विज्ञान आणि अंधश्रद्धा निर्मूलन प्रकरण 1. ---

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 17/01/2012 01:40 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो, नुकताच ज्ञान तपस्वी प्रा. अद्वयानंद गळतगे यांचा ब्लॉग तयार झाला. त्यातील काही मजकूर मिपाकरांनी वाचावा.विचार करावा. खालील अभिप्राय बोलका आहे. ...श्रद्धेचे अस्तित्व मानवी जीवनात अपरिहार्य आहे. हे प्रमेय विज्ञानाच्या आधारेच सिद्ध करण्यासाठी अद्वयानंद यांनी पाश्चात्य शास्त्रज्ञ संशोधकांचा आधार घेऊन केलेला युक्तिवाद खरोखरच स्तिमित करणारा आहे. बुद्धिवादाचा तसेच विज्ञाननिष्ठेचा मक्ता आपल्याकडेच आहे असे मानणाऱ्यांनी या पुस्तकातील युक्तिवाद आपल्या भूमिकेकडे नव्यादृष्टीने पहाण्याची निकड जाणवून देईल.

विनोबा भावे-अती दूर पाहणे आणि मुळीच न पाहणे हे ठेच लागण्याचे दोन उत्तम उपाय आहेत अध्यात्मातील वन लायनर्

लेखक कापूसकोन्ड्या यांनी सोमवार, 16/01/2012 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, या आठवड्याच्या सुट्टीत इंटरेनेटवर लक्ष्मीबाई टिळक आणि प्रभाकर माचवे यांचे काही लिखाण शोधत असताना, अचानक हाती घबाड सापडले. ओस्मानिया विद्यापीठ च्या साईटवर बरीच मराठी पुस्तके डिजिटल स्वरूपात ठेवली आहेत. त्यात माझ्या आवडीच्या लेखकांपैकी विनोबा भावे यांचा १९४६ सालात प्रसिद्ध झालेला विचारपोथी नावाचा एक ग्रंथ सापडला. पुस्तक प्रथम अधाशासारखे उतरवून घेतले. स्कॅन करून पिडिएफ केलेले असल्यामुळे समोर ठेवून स्वत: टंकलेखन केलेले आहे.