Skip to main content

लेख

pmpml प्रवासाचा सुखदायक अनुभव !!!

लेखक स्मिता दत्ता यांनी सोमवार, 18/11/2019 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
परवा हडपसरला काही कामानिमीत्त जायचे होते. इतक्या लांब कसे ज्याचे ते पाहत होतो आम्ही, तेव्हा मनपा वरून बस असते असे कळले. म्हणून मग मनपा ला गेलो तिथून १११ नंबरची बस असते म्हणून एकाने सांगितले. तसे त्या बस स्टॉप ला गेलो. तिकडे १११ लागलेलीच होती. मस्त एसी गाडी अर्थात इलेकट्रीक बस होती ती. पहिल्यांदाच त्या बस मध्ये बसायला मिळाले. थोड्याच वेळात ड्राईव्हर कंडक्टर आले आणि बस सुरु झाली. अतिशय आरामदायक आणि कसलेही धक्के न बसता प्रवास चालू झाला. बस फिरत फिरत दांडेकर पूल स्वारगेट असे करत कॅम्प मधून हडपसर रोड ला लागली. बाहेर बघत प्रवास चालू होता.

अहिराणीचा सामाजिक अनुबंध

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/11/2019 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अगोदर माणूस, माणसानंतर समाज आणि मग भाषा. भाषा आणि बोली हा फरक आता यापुढे करायचा नाही. जी बोली आपण बोलतो ती भाषा. मग ही भाषा आक्ख्या जगाची असो नाहीतर एखाद्या गाव-पाड्यापुरती मर्यादीत असो. बोली म्हणजे भाषाच असते. लोक एकमेकांसोबत देवाणघेवाण करताना जे काही बोलतात ती भाषा. कोणत्याच भाषेत कोणताच घटक अशुध्द नसतो. भाषा गावंढळ वा ग्राम्य नसते आणि देढगुजरी सुध्दा नसते. याचा व्यत्यास करायचा झाला तर कोणतीच भाषा शंभर टक्के शुध्दही नसते, असं म्हणता येईल.

प्रेम 2

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 15/11/2019 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम 1 त्याला जाग आली तेव्हा त्याच्या गावात पोचलापण होता. बर्याच वर्षांनी तो घरी परतला होता. तस त्याच कोणाशी भांडण वगैरे झालं नव्हतं, परंतु त्याला दूर दूर फिरायची, नवं नवी आकाश धुंडाळायची इच्छा होती. बाबांनी त्याला कधीच थांबवलं नाही, उलट त्याला मदतच केली. एवढं मोठं कुटुंब बाबा कस सांभाळतात तेच जाणे. हा विचार संपतो आहे तोच समोरून त्याच्या मोठ्या भावांपैकी एक येताना दिसला. आज त्याला एकदम बाबांनाच भेटायची इच्छा होती, त्याने त्या भावाला हात केला आणि नंतर भेटतो म्हणून सांगितलं. गावात आल्यावर असे सगळे भेटणार, त्याला अंदाज होताच.

२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज )

लेखक हस्तर यांनी मंगळवार, 12/11/2019 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
२०१९ राज ठाकरे झाले मुख्य मंत्री ,इंजिनाला ला लागले ४ हि पक्षांचे डबे ९ (फेकींग न्यूज ) आमच्या वार्ताहराकडून हाती लागल्या बातमी नुसार राष्ट्रवादी ने सरकार बनविण्यास असमर्थता दाखवली आहे व अजित यावर छातीत सुकून (दुखून) लीलावती मध्ये ऍडमिट झाले आहेत ,भाजप चे पण विखे,राणे ह्यांच्या छातीत दुखत आहे पण हॉस्पिटल बंद करायची इच्छा नसल्याने त्यांना दाखल केले गेले नाही शेवटी राज्यपालांनी काँग्रेस ला बोलावले पण मॅडम दिल्ली हुन येणे अवघड असल्याने राज्यपाल स्वतः १० जनपथ येथे गेले व सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहे अशी चिट्ठी घेऊन आले ( गुप्त सूत्रणानुसार ह्या दररोज च्या वैताग वाडी पेक्षा मला

दिवाळी अंक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 10/11/2019 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात किंमत १० रु यास एक काल १० अंकविकत आणले आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन २०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खर म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो

फ्युएल, सिग्नेचर आणि नरकासुराचा वध

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 08/11/2019 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
(सत्य घटनेवर आधारित) तारीख : 2 नोव्हेंबर माणसं : एकूण आठ अवस्था : प्रचंड दमलेली व्यवस्था : एक क्वार्टर फ्युएल, दोन बाटल्या सिग्नेचर तयारी : वेफर्स, शेंगदाणे, थोडसं चिकन, थोडे मासे, (गरीब शाकाहारी माणसांसाठी) थोडंस पनीर, चार ग्लास, कोल्ड्रिंक्स वेळ : रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे अंक 1 : सुरुवात एका ओळीत ठेवलेले चार ग्लास एकात 10 मिली आणि दुसर्यात 30 मिली फ्युएल तिसर्यात आणि चौथ्यात 30 मिली सिग्नेचर प्रत्येकी कोल्ड्रिंक्स स्वादानुसार "" चांगभलं "" चर्चा : दमलेल्या आई बापाची कहाणी अंक 2 : दुसरं वळण ( सेकंड राउंड) 20 मिली फ्युएल बाकी आणि सिग्नेचर अर्धा खंबा डाऊन चर्चा पुढे चालू .......

या जन्मावर या जगण्यावर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी गुरुवार, 07/11/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
बाळकृष्ण वारजे आणि सुमती वारजे हे दांपत्य आज जीवन हॉस्पिटलमध्ये आले होते. आज सुमती वारजे यांच्या चेकअपचा रिपोर्ट येणार होता. नर्सने बोलावलं तेव्हा ते दोघं डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले. "नमस्कार. बसा." डॉक्टरांनी त्यांना बसावयास सांगितले. "डॉक्टर रिपोर्टस् चं काय झालं??" बाळकृष्ण यांनी विचारलं "थोडं मन घट्ट करा सर." डॉक्टर म्हणाले. "काही प्रॉब्लेम आहे का??" सुमती वारजे म्हणाल्या. "तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. त्यामुळेच तुम्हाला सारखी चक्कर येते. हे बघा एक्सरेमध्ये पण गाठ दाखवत आहे." डॉक्टरांनी एक्सरे दाखवला. त्यात एक गाठ दिसत होती. "टेन्शन नका घेऊ आपण ऑपरेशन करून ती काढून टाकू.

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 06/11/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ -

"आप्पा कुलकर्णी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या सोसायटीत रहातो तिथे "आप्पा कुलकर्णी" नावाचा एक सदस्य रहातो..आमचे ३५-४० वर्षाचे संबंध आहेत आप्पा व त्याचे मित्र गेली अनेक वर्षे एक उपक्रम दिवाळीत राबवतात.. तो म्हणजे स्मशानात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याना "दिवाळी फराळ" वाटप मृत्यु काळ वेळ दिवाळी दसरा पहात नाहि.. कर्मचा-याना ना दिवाळी ना दसरा... आप्पा व मित्र हे काम वर्षानु वर्षे करत आहेत.. ना गवगवा ना चमकेगीरी... सलाम