Skip to main content

फ्युएल, सिग्नेचर आणि नरकासुराचा वध

फ्युएल, सिग्नेचर आणि नरकासुराचा वध

Published on शुक्रवार, 08/11/2019 प्रकाशित मुखपृष्ठ
(सत्य घटनेवर आधारित) तारीख : 2 नोव्हेंबर माणसं : एकूण आठ अवस्था : प्रचंड दमलेली व्यवस्था : एक क्वार्टर फ्युएल, दोन बाटल्या सिग्नेचर तयारी : वेफर्स, शेंगदाणे, थोडसं चिकन, थोडे मासे, (गरीब शाकाहारी माणसांसाठी) थोडंस पनीर, चार ग्लास, कोल्ड्रिंक्स वेळ : रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे अंक 1 : सुरुवात एका ओळीत ठेवलेले चार ग्लास एकात 10 मिली आणि दुसर्यात 30 मिली फ्युएल तिसर्यात आणि चौथ्यात 30 मिली सिग्नेचर प्रत्येकी कोल्ड्रिंक्स स्वादानुसार "" चांगभलं "" चर्चा : दमलेल्या आई बापाची कहाणी अंक 2 : दुसरं वळण ( सेकंड राउंड) 20 मिली फ्युएल बाकी आणि सिग्नेचर अर्धा खंबा डाऊन चर्चा पुढे चालू ....... अंक 3: गुगली गहन चर्चेत आमच्या कन्यारत्नाची उडी " आई मला आत्ताच्या आत्ता नरकासुराचा वध ही गोष्ट सांग " आई, मावश्या, काका आणि बाबा तोंडावर पहिल्या बॉलवर पाचही जण आउट झाल्याचे भाव घेऊन.. " आई मला आत्ताच ऐकायची आहे, सांग " फर्मान पुढे .. गडबडलेली आई .. " बरं सांगते, पण शांतपणे ऐकायचं,मध्ये बोलायचं नाही " (स्वतःला विचार करू द्यायला सबब) " एक नरकासुर होता " " त्याच नाव होतं का ते? " " नाही, तो नरकात गेला म्हणून त्याच नाव नरकासुर पडलं " " मग आधी काय नाव होतं त्याच? " शंकासुराचा प्रश्न आई लेग बाय विकेट .. शक्य असेल तर भयाण आणि इच्छूक शांतता, सगळ्यांचे लक्ष आईकडे ( डोळे नाहीत, काय हिंमत अश्या खिंडीत गाठलेल्या वाघिणीला डीवचायची कुणाची) .. " मला आठवत नाही पण पुढे ऐक " कन्यकेच्या चेहर्यावर नाराजीचे भाव, पण पुढे ऐकायला तयार .. " कृष्णबाप्पा लहान असताना एक असुर ...... म्हणजे राक्षस " कन्यकेच्या चेहर्यावर प्रश्नार्थक भाव उमटल्यावर आईचे उत्तर .. " कृष्णबाप्पा लहान असताना एक असुर त्यांना खूप त्रास द्यायचा. तो असुर खूप घाण राहायचा. तो आंघोळ नाही करायचा. दात नाही घासायचा. बाहेरून आल्यावर पाय नाही धुवायचा. डोक्याला तेल नाही लावायचा. " (पोरगी जे जे करायला त्रास देते, ते सगळं घुसडवायचा आईचा प्रयत्न) (पोरीच्या चेहर्यावर ढिम्म) " मग काय केलं कृष्णबाप्पाने " बाळबोध चेहर्याने मी आधीच काही ऐकलचं नाही अश्या अविर्भावात पुढचा प्रश्न " मग त्याने त्या असुराला शाप दिला " " आई, शाप म्हणजे? " ( दारू म्हणजे काय रे भौ, या धर्तीवरच निरागस प्रश्न) " म्हणजे त्यांनी असुराला शिक्षा दिली नरकात ढकलून. म्हणून तो नरकासुर " "आई, नरक म्हणजे? आणि ते कुठे असतं? " पुढची गुगली .. " ती जागा खूप धाण धाण असते. आंघोळ न करणारी, दात न घासणारी मुलं तिकडे पाठवली जातात " (आईचा पॉवर प्ले करायचा प्रयत्न) " म्हणून आपण दिवाळीच्या पाहिल्या दिवशी लौकर उठतो, अभ्यंगस्नान करतो आणि देवबाप्पाला भेटायला मंदिरात जातो " कन्या विचारमग्न .. परत इच्छूक, भयाण शांतता .. कन्या आईकडे बघते, मान डोलवते आणि काकांकडे वेफर्स मागते निशब्द आणि निर्ध्वनी सुस्कार ( सगळ्यांकडून) चतुर बाबा विषय बदलतो ... समाप्त !
लेखनप्रकार

याद्या 3604
प्रतिक्रिया 7

हे चांगलच आहे....... पण ते मावळ्यांच्या पुढचा भाग आणा कि.....

In reply to by संजय पाटिल

मावळ्यांचा पुढचा भाग आकार घेतो आहे. त्याच थोडं जॉर्ज मार्टिन सारखं झालं आहे.

आईचा पॉवर प्ले करायचा प्रयत्न-> +१

मस्त लिहलंय !