"पोर"खेळ
आजकाल गावांची शहरे झाली, घरांच्या इमारती झाल्या, कौले जाऊन स्लॅब आला आणि जग कुठच्या कुठे गेले. पण, काहीही बदलो, चिमुलवाडा आणि त्यातली माणसं मात्र जशीच्या तशी उरलीयेत. दारातल्या गावठी कुत्र्याची चेन आता लॅब्राडोरच्या गळ्यात, तर माऊ, काळूच्या जागी पर्शियन मांजरांनी शहरात ठाण मांडले आहे. आता हे जुन्या गावचे सगळे मोती, टॉम वा माऊ, काळू चिमुलवाड्याचे आश्रित झालेत!
आजूबाजूचे गावकरी आता शहरवासी झाले असले, तरी आमच्या चिमुलवाड्यावर घरे आणि देवळे यांखेरीज आणखी कुठलीही वास्तू कोणास दृष्टी पडायची नाही. कोणा बिल्डर लोकांची अजून चिमुलवाड्यावर नजर पडली नाही ही त्या देवकीकृष्णाची मेहेरबानीच म्हणावी लागेल!
मिसळपाव