Skip to main content

लेख

पंखा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/01/2020 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
।। पंखा ।। एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती! अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला.

बालकथा -लाडकं पाखरू

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 30/12/2019 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा -लाडकं पाखरू ----------------------------------------------------------------------------------------------------------------------- दिवस चांगला वर आला होता . दिन्या आळोखे - पिळोखे देत उठला . उठल्याबरोबर त्याने उशापासली गलोल चाचपली . दिन्याची आई चुलीपाशी बसली होती . उन्हाळ्याचे दिवस होते . गरम होत होतं अन चुलीपाशी तर जास्तच .तिने दिन्याला पाहिलं व ती म्हणाली , “ दिनू , लवकर आवर बाळा . मला शेतात जायाचं .बा गेलाय ना फुडं .” दिन्या तोंड धुवून आला .

भारतीयांचे अपमानास्पद पराभव:- प्रकरण -१ खडकीची लढाई :-

लेखक kvponkshe यांनी सोमवार, 30/12/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ नाकर्त्याचे कर्तेपण -पेशव्याची युद्धपूर्व तयारी :- रावबाजी हा नाकर्ता , करंटा,पळपुटा म्हणून कुप्रसिद्धच आहे . तर अशा या पेशव्याने युद्धाची तयारी तरी काय केली होती तेही जरा पाहू . १. नागपूरचा इंग्रजी एजंट जेनकिन्स याने गव्हर्नर जनरल यास लिहिलेल्या पत्रात ( फेब्रुवारी १८१४) पेशवे आणि भोसले यांच्यात इंग्रजांविरुद्ध सुरु असणाऱ्या खलबतांचा उल्लेख केलाय . यात पेशव्याच्या नेतृत्वाखाली संभाव्य इंग्रजविरोधी युतीचा उल्लेख आहे . २. फेब्रुवारी १८१५ मध्ये रणजित सिंग यांच्या दरबारात संपूर्ण भारतात इंग्रज विरोधी युती करण्याच्या संबंधी बोलणी करण्यासाठी रावबाजीचा माणूस असल्याचा उल्लेख आहे . ३.

"माळ्याच्या मळ्या मध्ये कोण ग उभी "

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 29/12/2019 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
फुकटची प्रसिद्धी हि कुणाला आवडणार नाही . दूरदर्शनवर दिसणारे कलाकार यांचा मला उगीचच हेवा वाटतो . अर्थात आमच्या लहान पणी टीव्ही हा प्रकार नव्हता ,रेडीओ असायचा.

भारतीयांचे अपमानास्पद पराभव !! प्रकरण -१ खडकीची लढाई

लेखक kvponkshe यांनी शनिवार, 28/12/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
भाग -१ भारताला वर्षानुवर्षांचा युद्धेतिहास आहे. या लढायांची यादी अगदी मागे खेचत नेली तर पुराणात वर्णिलेल्या देव दैत्य संग्रामापासून सुरु होईल आणि राम रावण युद्ध , भारतीय महायुद्ध , झेलम चे युद्ध वगैरे प्रवास करत करत १९९९ साली झालेल्या कारगिल युध्दपाशी येऊन थांबेल .यातील काही लढाया अंतर्गत आहेत तर अनेक परकीय शत्रूं विरुद्ध लढलेल्या आहेत .काही लढायातील विजय अभिमानाने मान उंचावणारे आहेत तर अनेक लढयातील पराभव हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहेत. या लेख मालेद्वारे आपण भारतीयांना अशा शरमेने मान खाली घालणाऱ्या लढायांची चर्चा कारणार आहोत .

अल्याड पल्याडच्या वेणा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 24/12/2019 22:00 या दिवशी प्रकाशित केले.
अल्याड पल्याडच्या वेणा ---------------------------------------------------------------------------------------------------------------------------- अपूर्वा कळवळून किंचाळली ... तिच्या पोटात भयंकर कळ आली होती. अगदी असह्य ! ती कळवळली. ती आता लेबर रूममध्ये होती. तिला मधूनच कळा येत होत्या. कमी होत होत्या. अशा कळा की जगात त्यावाचून दुसरं काहीच नाहीये ! बाळंतपणाच्या कळा ! सगळ्यात असह्य. एखादा बॉम्ब फुटून त्याचे धातूचे तुकडे प्रचंड वेगाने शरीरात शिरल्यानंतर जेवढ्या वेदना होतात, त्याही पेक्षा जास्त. तरीही प्रत्येक स्त्रीला हव्याहव्याशा वाटणाऱ्या वेणा ! पण कळांमध्ये सातत्य नव्हतं.

बोइंग ७३७ मॅक्स - अपघात की मनुष्यवध?

लेखक स्वीट टॉकर यांनी मंगळवार, 24/12/2019 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
अडीच वर्षांपूर्वी म्हणजे मे २०१७ मध्ये बोईंग ७३७-मॅक्स वापरात आलं. दीडच वर्षांत म्हणजे ऑक्टोबर २०१८ साली पहिला अपघात झाला आणि पाच महिन्यात म्हणजे मार्च २०१९ मध्ये दुसरा कॉपीकॅट अपघात झाला! साडेतीनशे जीव मृत्युमुखी पडले! जगातली सर्व ७३७ मॅक्स विमानं स्थानबद्ध केली गेली. सुदैवानी विमान अपघात क्वचित होतात. यात 'सुदैवानी' हा शब्दप्रयोग तितकासा योग्य नाही. विमान बांधणीत, त्यांचा मेंटेनन्स करण्यात, रनवे बांधण्यात आणि विमानं उडवण्याच्या वगैरे सर्व कामात दैवावर विसंबून राहता येत नाही.

असीम आणि मीरा

लेखक लाल गेंडा यांनी मंगळवार, 24/12/2019 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न लागलं आणि असीम उठला. त्याला आधीपासूनच लग्नाला यायचं नव्हतं पण ज्याचं लग्न होत तो त्याचा जेष्ठ सहकारी होता. असीमचा मुख्य उद्देश पुढे घोडसाळला जाणे होता. अनासायासे लग्न गुरुवारी होतं, म्हणून मग त्याने सुट्टीच टाकली होती. जेवायला जाताना त्याला मीरा दिसली. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. तिनेसुद्धा असिमसारखा वेष घातला होता, जीन्स आणि त्याला साजेसं काहीतरी. असिमला थोडं ते अजीब वाटलं पण त्याने फार विचार नाही केला. त्याला हे सगळं सम्पवून पुढे जायचं होतं. त्याच्या बरोबरच्या लोकांसोबत असीम जेवला, जेवण काही फार फाडु नव्हतं पण पोट भरलं.

सखी शेजारिणी तू खात राहा..

लेखक आजी यांनी सोमवार, 23/12/2019 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक शेजारीण होती. म्हणजे ती आहे अजून,पण माझ्या शेजारी ती आता नाही. माझी शेजारीण जेव्हा माझ्या शेजारी राहायची तेव्हा माझ्या घरी सारखी यायची. गप्पा मारायला. येताना घरातलं काम घेऊन यायची. भाजी निवडणे, बिरड्या सोलणे, कपड्यांची दुरुस्ती असं काहीतरी. प्रचंड बडबडी, मन लावून टीव्ही पाहणारी. लक्ष्मीकांत बेर्डे किंवा दादा कोंडके केळ्याच्या सालीवरुन पाय घसरुन पडला किंवा अर्धी चड्डी घालून आला तरी डोळ्यांत पाणी येईपर्यंत खळखळून हसणारी. आत्ताही एका टीव्ही शोमधे, शो बघायला आलेले सेलिब्रिटी प्रेक्षक इतके हसतात, इतके हसतात की खुर्चीवरुन खाली पडतात.

खोळ

लेखक ए ए वाघमारे यांनी रविवार, 22/12/2019 07:42 या दिवशी प्रकाशित केले.
‘एकाच जागी ठोंब्यासारखं बसून राहणं म्हणजे काय, हे आपल्याशिवाय अधिक चांगलं कोण सांगणार?’, रोजसारखा आजही भुकोबाच्या मनात हाच विचार आला. उन्हं कलली. सायंकाळ झाली. पण भुकोबाच्या घरात सांजवात लावायला अजून कोणी आलं नव्हतं. वारा सुटला तसं भुकोबा ज्या कडुनिंबाच्या खाली बसला होता, त्याची पानं सळसळली. काही गळून तरंगत खाली आली. डोक्यावरच्या छोट्याश्या कळसावर त्यातली एक दोन पानं पडल्याचा आवाज खसखसला. ‘पानगळ अजून सुरूच आहे. अशा किती पानगळी झाल्या आतापर्यंत? कुणी मोजल्या? या एवढ्याश्या घरात हा इतकुसा झरोका. यातनं काय कळणार?