Skip to main content

लेख

चौकटींतील रत्ने (उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी गुरुवार, 19/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध इथे : https://misalpav.com/node/45825 ******************************************************** या लेखाच्या पूर्वार्धात लिहिल्याप्रमाणे मराठी कोड्यांवर हुकुमत यायला माझे एक दशक खर्ची पडले होते. आता एक धाडस म्हणून इंग्लीश कोड्यांकडे वळणार होतो. आतापर्यंत इंग्लीश पेपर चाळताना चौकटीयुक्त कोडे दिसले तरी त्याकडे ढुंकून पाहिले नव्हते. याला कारण माझी इंग्लीशबाबतची भाषिक पार्श्वभूमी. इयत्ता पाचवीपासून शालेय विषय, आठवीपासून विज्ञान व गणित इंग्लिशमधून आणि पुढे व्यावसायिक शिक्षण इंग्लिशमधून झाले. सामान्य व्यवहारातील बोलणे हे मराठीतूनच.

लघुकथा – नजर

लेखक bhagwatblog यांनी मंगळवार, 17/12/2019 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
उमा आज आपल्या मैत्रिणीच्या घरी(पद्मिनी) कामानिमित्त कडे आली होती. पद्मिनीची आई शांता काकू उमाच्या सख्या नसल्या तरी जुन्या भावकीतील नातेवाईक होत्या. पद्मिनी वर्ग मैत्रिण असल्यामुळे उमेचे तिच्या घरी जाणे येणे होत असे. पद्मिनी सोबत तिच्या खोलीत बोलत असताना सहजच निरागस पणे सांगीतले की, तिला स्थळ बघायला घरच्यांनी सुरुवात केली आहे. पुढील आठवड्यात तिला बघायला पाहुणे येणार आहेत असे सुद्धा सांगीतले. चहा-पाणी केल्यानंतर उमा घरी गेली. उमाला पाहुणे बघायला येण्याचा दिवस जसा जवळ येत होता तसा उमेच्या मनात उत्सुकता, भीती आणि डोळ्यात नवीन संसाराची स्वप्न तरळत होती.

अहिराणीनी बात

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 16/12/2019 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रमा मराठीन्या तशे पाह्य त्ये पासष्ट बोलीभाशा दखातीस. त्या बठ्ठास्मा अहिराणी भाशाना पट्टा आडवा उभा भयान मोठा त्ये शेच, पन ह्या पट्टामजारला आथा तथा कामसकरता जायेल लोक महाराष्ट्रभर आनि महाराष्ट्रना बाहेरबी आपली भाशा इमाने इतबारे बोली र्‍हायनात- समाळी र्‍हायनात. नाशिक सिडको, औरंगाबाद, पुना, मुंबई, सुरत आशा काही शहरस्माबी आज अहिराणी भाशा हात पाय पसरी र्‍हायनी. (आज अहिराणी बोलनारा लोक येक कोटीना आसपास दखातंस.) शिकेल सवरेल लोकसतीन अडानी लोकस्ले अहिराणीवाचू दुसरी भाशा येत नही म्हनीसन का व्हयेना त्या नाइलाजे आपापला घरमा- गावमा अहिराणीमा यव्हहार करतंस.

"ती" काळरात्र !

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शनिवार, 14/12/2019 23:30 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या चिमुलवाड्यावरील बाळा हा तसा गडी माणूस. आजकाल वेगवेगळ्या घरांत वेगवेगळ्या "कामवाल्या" असतात ती सिस्टिम आमच्या वाड्यावर अजूनही आलेली नाही. धुणी-भांडी करायला शांताबाई आणि बाकीची जी म्हणून काही कामे असतील ती करायला हा बाळ्या. एकंदरीत स्वयंपाकघरात बाळ्याचे काही काम नसे व उरलेल्या घरात शांताबाईचे ! तर एवढ्या घरची एवढी कामे करून बाळ्या बाकड्यावर बसून विड्या फुकत असे. बाकी आम्ही लहान असताना गोविंद मामा आम्हाला कानातून आणि नाकातून विडीचा धूर काढून दाखवायचे ! "डोळ्यातल्यानूय काडटा हा पय !" असेही ते आम्हाला सांगायचे पण कित्तीतरी वेळा बारकाईने पाहून सुद्धा डोळ्यातला धूर काही आम्हाला दिसला नाही.

दुसऱ्या लग्नाची गोष्ट

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 14/12/2019 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
दुसऱ्या लग्नाची गोष्ट ---------------------------------------------------------------------------------------------------------------- सकाळची वेळ होती . थंडीचे दिवस . गावातल्या मुख्य चौकात, वडाच्या पाराच्या पलीकडे वैष्णवी वडापाव सेंटर होतं. त्याच्या पुढे टेबल खुर्च्या मांडलेल्या. तिथेच शंकरराव बसलेले होते. उन्हात बसायला छान वाटत होतं . बरोबर आणखी चार-पाच जण . सारेच वयस्कर. सगळ्यांचे कपडे पांढरे, टोपी पांढरी आणि डोक्यावरचे केसही पांढरेच . गावातली मंडळी . चार पावसाळे जास्त पाहिलेली . शंकरराव अजून हट्टेकट्टे होते . धारदार नाकाचे . अन पांढऱ्या भरघोस मिशा असलेले . शंकररावांना गावात मान होता.

आरे जंगलातली हिरकणी

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 13/12/2019 17:30 या दिवशी प्रकाशित केले.
परवा प्रसाद ओक चा हिरकणी या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. प्रत्येकाच्या कामाची छोटीशी झलक पाहून चित्रपट चांगलाच असेल अस वाटल. हिरकणी हे नाव आपल्या कानावर पडत तेव्हा पटकन समोर एका लुगडं नेसलेल्या कपाळावर चंद्रकोर असणाऱ्या रणरागिणी आईच चित्र समोर उभा राहत जी आपल्या बाळासाठी सह्याद्रीचा कातळ कडा उतरून बाळाला दूध पाजण्यासाठी गेली होती.

थुंकणार्‍याची मानसिकता

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शुक्रवार, 13/12/2019 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक व्यापारी संकुल, सरकारी कार्यालये या सारख्या इमारतींमधे आपण जिन्याच्या कोपर्‍यात,लॉबीच्या कोपर्‍यात, लिफ्ट मधे कोपर्‍यात अशा ठिकाणी लोक थुंकलेले दिसतात.अगदी सुसंस्कृत गृहसंकुलात देखील ही दृष्य कधी कधी दिसतात. पानटपरीच्या आसपास तर विहंगम दृश्य असते. ’रांगोळ्यांनी सडे सजविले रस्त्या रस्त्यातून’ हे कवीला अशी दृष्ये पाहूनच सुचले असावे. पान गुटका तंबाखू वगैरे खाउन किंवा न खाताही थुंकणार्‍या लोकांचे प्रमाण भारतात खूप मोठे आहे. परदेशातून आलेल्या पाहुणे हे जेव्हा पहातात त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या देशाची प्रतिमा अत्यंत मागासलेला देश अशी होते.

गावाकडची मजा-बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 12/12/2019 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडची मजा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- मी गावाला चाललो होतो. एसटीमधून. डुलक्या घेत. पण माझ्या मनाला त्या अर्धवट झोपेतही बरं वाटत नव्हतं . तुम्ही म्हणाल,गावाला जायचं म्हणजे मजाच की ! मी गावाला चाललो होतो, ते सहल म्हणून नाही. मजा म्हणून नाही. तर कायमचा ! मी पुण्यासारख्या शहरात राहत होतो . माझी शाळा , माझे शाळेतले मित्र, माझे वाड्यातले मित्र या सगळ्याला मी आता मुकणार होतो. अन गावाकडे ?... काय माहिती ! मी गावाला पहिल्यांदाच चाललो होतो.

Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 12/12/2019 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
Use Dipper at Night: हाय बीम लो बीम, अप्पर- डिप्पर बीम बाबत चर्चा मिसळपाव.कॉम म्हणा किंवा शेजारचे मराठी सोशल फोरम म्हणा, त्यात महत्वाचे चर्चेचे विषय लिहीले जातात की जे समाजाला उपयोगी पडू शकतात. मागे वाहनांसंदर्भात हेल्मेटचा विषय आला असता, त्यातील विचार बरेच इतर ठिकाणी कॉपी केले होते. इतर ठिकाणी ज्यांनी वाचले ते त्यांच्या उपयोगी आले असेल तर आपल्या या सोशलीझमचा फायदाच म्हणायचा.

आठवणीतील घरं -- नानी का घर -- भाग ३

लेखक अहम्_लिखामि यांनी गुरुवार, 12/12/2019 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले भाग प्रकाशित केलेले आहे भाग ३ या अश्या गोकुळात ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही ८ भावंडं जमायचो. दुपारी बदाम सात चा कार्यक्रम ठरलेला असायचा, हरेल त्याने ४ वाजता येणारी कुल्फी खाऊ घालायची. खाऊ घालायची म्हणजे काय तर स्वतः सगळ्यात शेवटी खायची सगळ्यांना आणून दिल्या नंतर कारण पैसे तर आजोबाच द्यायचे. या बदाम साथ च्या खेळात माझ्या सारख्या प्रामाणिक खेळाडूंना जिंकायचा काहीही मार्ग नव्हता हे मला कळले जेंव्हा मोठ्या मामीच्या चटई खालून २ राजे अचानक बाहेर आले. तो पर्यंत राजा आला कि सगळ्यांना कळेल कि अश्या पद्धीतींनी मोठ्यांनी आवाज काढायचा असाच वाटायचं.