चक्र पूजा
- डॉ. सुधीर रा. देवरे
चक्र म्हणजे युध्दाची व्युहरचना. देवीचं असुरांशी झालेलं युध्द म्हणजे चक्रपूजा. फक्त अहिराणी पट्ट्यातच म्हणजे जुन्या खानदेशी भागातच (बृहन्खा नदेशातच) चक्र पूजा मोठ्या प्रमाणात केली जाते. चक्रपूजा ही आपापल्या कुलदैवताची-देवीची पूजा असून ती नवरात्रांत केली जाते. नवरात्रींमध्ये रोज कुठेना कुठे अहिराणी भागात चक्र पूजा असते. त्यातही परंपरेने विशिष्ट माळेलाच चक्र भरण्याची वेगवेगळ्या घराण्यांची प्रथा असते. सप्तमी आणि अष्टमीला चक्र पूजेचे प्रमाण जास्त असते. प्रत्येकाची ठरावीक तिथी- विशिष्ट दिवस ठरलेला असतो.
मिसळपाव
चित्रसौजन्य - राजा राममोहन रॉय मेमोरियल, कोलकाता.
जुन्या कोलकात्यातील एक महालसदृश्य इमारत. जॉर्जियन वास्तुशास्त्राचा सुंदर नमुना असलेल्या शहरातील थोडक्याच इमारतींपैकी एक. फ्रान्सिस मेंडीस नामक श्रीमंत कलाप्रिय माणूस इमारतीचा मूळ मालक. १८१४ साली रंगपूरहून (सध्या बांग्लादेशात असलेले शहर) आलेल्या एका भारतीय व्यक्तीने १३००० रुपयांचा घसघशीत मोबदला देऊन फ्रान्सिसकडून हे घर विकत घेतले आणि तिथे कायमचे राहायला येण्याचे ठरवले.
हुगळी नदीचे पात्र, दक्षिणेश्वर, कोलकाता.