Skip to main content

लेख

विजयादशमी..!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 25/10/2020 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
विजयादशमी...!! मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला.. पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली.

ती वाचली असती (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शनिवार, 24/10/2020 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
बैलगाडी संथगतीने गावाच्या दिशेने जात होती. सूर्य मावळतीला जात होता. मावळतीची शांतता, सूर्याचा तांबूस प्रकाश आजूबाजूला पसरला होता. सगळे अवतीभोवतीचे वातावरण  एका लयीत शांत शांत भासत होते. परतीचे पाखरे अधून मधून नजरेस पडत होते. बैलगाडीचा तो खडs खडss आवाज, या अशा वातावरणात मजेशीर वाटत होता. ते तिघेजण गाडीत शांतपणे बसून, त्या आजूबाजूच्या वातावरणाची शांतता कायम ठेवत होते. गाव साधारणता अजून, सहा मैल बाकी असेल. खरंतर त्यांनी गावात पोहोचायला घाई करायला हवी होती. कारण रात्र लवकर सुरू होणार होती. रात्रीचा तो काळाकुट्ट अंधार, आजूबाजूला पसरणार होता. पण त्यांची ती संथ चाल आहेत तशीच कायम होती.

सीमोल्लंघन...!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शनिवार, 24/10/2020 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
सीमोल्लंघन..!! नुकताच एम.बी.बी.एस. चा रिझल्ट लागला होता, आणि शशी खूप आनंदात होती... पण ह्या इंटर्नशिपच्या काळात प्रयत्न केले तर, लग्न लवकर ठरेल. या आई-बाबांच्या निश्चयापुढे ती हतबल ठरली. वर्षभरातच तिचं दिवाकर बरोबर लग्न झालं आणि मध्यमवर्गीय मातापित्यांनी कृतार्थ होऊन सुखाचा श्वास घेतला... शशी आणि दिवाकर एकुलते एक असल्याने, तिला कुटुंब पद्धतीत फार बदल जाणवला नाहीच. तिघांचं छोटेखानी, पण उच्च मध्यमवर्गीय कुटुंब.. दिनकर थोडा अबोल होता आणि नावाप्रमाणे वैशाखाच्या सूर्यासारखा थोडा तापट होता.

प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 24/10/2020 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनास्थळे बंद असण्याबाबत साहित्यीकांची अन मान्यवरांची दुटप्पी भुमिका आजच्या ऑनलाईन वर्तमानपत्रांत "नेमाडे-पठारेंसह 2 हजार मान्यवरांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले समर्थनाचे पत्र, (मंदीरे उघडण्याबाबतीत) श्रद्धांशी खेळणाऱ्या राजकारणावर घेतला आक्षेप" अशा अर्थाच्या बातम्या आलेल्या आहेत.

स्मरण रंजन ४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शनिवार, 24/10/2020 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन रेडिओ( ४) कोई लौटा दे मेरे...    ज्या फिलीप्स रेडिओ चा ऊल्लेख केला  तो  कालौघात कुठे गेला लक्षात नाही. गावतल्या घरी त्याची जागा ट्रांझिस्टर ने  घेतली. त्याचा  वेगळा रुबाब. सेलवर चालणारा. कातडी वेष्टण. स्टीलच्या काड्याचे खालीवर करता येणारे एरिअल. कुठेही घेऊन जा. शेतात पण. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.' एके संध्याकाळी शेतात पं.भीमसेनजी आणि बालमुरली कृष्णन यांची जुगलबंदी ऐकल्याचे आठवते.      त्या काळी लग्नात  हुंडा म्हणून ' रेडू ' ,'घडी, 'सायकल 'इ.मागायची  प्रथा.

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/10/2020 10:21 या दिवशी प्रकाशित केले.
                          स्मरण रंजन. रेडिओ (३)      'पगला कहीं का !' लंका. लंकेची ओळख अगदी लहानपणापासून. रामाच्या गोष्टीतून. रावणाची लंका. त्याने सीतेला पळवल्यावर जिथे ठेवले ती लंका. हनुमंताने जाळली ती लंका. रामाने समुद्रावर सेतू बांधला ती लंका. रावणवधानंतर बिभिषणाकडे सोपविली ती लंका.    पूढे पं.भीमसेनजींच्या गाण्यात तिचे भारी कौतुक ऐकले.

स्मरणरंजन २

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 22/10/2020 08:25 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन रेडिओ (२)   गुजरा हुआ जमाना.. अकराव्या वर्षी बीडला शिक्षणासाठी. काकांकडे. तिथे मोठा रेडिओ 'मर्फी'. रेडिओ पेक्षा त्याची गोड बाळाची जाहिरात जास्त प्रसिद्ध. रात्री उशीरा, 'आपली आवड'. सर्वांचीच. सुमारे वर्षभर ' देहाची तिजोरी', 'मला हे दत्त गुरू दिसले,' 'मी डोलकर' ,' वादळ वारं सुटलं रं' , इ.गाण्यांनी धुमाकूळ घातला होता. बहुधा शनिवारी सकाळी भावसरगम. नवनवीन भावगीते. महान संगीतकार कै.श्रीनिवास खळे यांनी अनेक उत्तमोत्तम गाणी  याच कार्यक्रमात दिली. शुक्रतारा मंदवारा... आकाशवाणी च्या राष्ट्रीय प्रसारणात  आठवड्यातून एकदारात्री  शास्त्रीय संगीता चा कार्यक्रम.

प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी बुधवार, 21/10/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकाश बाबुराव सरवदे..... तळेगावचे अथांग तळे २२.०६.२०१९ . काही व्यक्तिमत्व खूपच प्रभावी असतात, प्रथम भेटीतच भारावून टाकतात. मुंबई ते पंढरपूर सायकल सफरीत अशाच एका व्यक्तिमत्वाची भेट झाली.

स्मरणरंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 21/10/2020 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरणरंजन रेडिओ (१) बचपन के दिन. माझा जन्म खेड्यातला .आडगाव. जि.बीड. वयाच्या दहा/अकरा वर्षापर्यंत तिथेच वाढलो. कळायला लागल्यापासून घरी रेडिओ. आजोबांच्या बैठकीत एका कोनाड्यात.फिलीप्स कंपनीचा  सुबक. बॉक्स आकाराचे एवरेडी बॅटरी वर चालणारा. ईंग्रजी नाईन चे आकड्यातून उडी मारणारी मांजर. बॅटरी वर्षभर चालायची. मग तालुक्याचे गावाहून (माजलगाव)दुसरी आणायची.  जुनी बॅटरी अंगणात  फोडणे हा माझा  कार्यक्रम. त्यात, पितळी पट्ट्याचे चौकटीत , कोळशासारख्या पदार्थाच्या टोस्ट च्या आकाराच्या वड्या . त्या फोडल्या वर पाणी निघे. पितळी पट्टया सोनार घेउन जाई. फुकट.

पाणिनी ह्यांचे संस्कृत

लेखक साहना यांनी बुधवार, 21/10/2020 10:46 या दिवशी प्रकाशित केले.
“We can now assert, with the power of hindsight, that Indian linguists in the fifth century B.C. knew and understood more than Western linguists in the nineteenth century A.D. Can one not extend this conclusion and claim that it is probable that Indian linguists are still ahead of their Western colleagues and may continue to be so in the next century? Quite possible; all we can say is that it is difficult to detect something that we have not already discovered ourselves.” - फ्रिट्स स्टाल ( UC बर्केली चे प्राध्यापक) दोन विद्यार्थी पाठशाळेंत व्याकरण शिकत होते.