Skip to main content

लेख

अनटायटल टेल्स ५

लेखक मकरंद घोडके यांनी शुक्रवार, 20/11/2020 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
सुरवात अशी काही नाहीच मधेच हे रस्त्याच्या कडेला उगवलेलं आहे झाडासारखं! त्याला भिकारी पण म्हणता येत नाही कारण त्याचं ते स्वतंत्र पणे कमावून खात आहे. त्याला फ्रीजमध्ये ठेवलेले नंतर खाऊ म्हणून ठेवलेले शिळे पदार्थ ठाऊक नाहीत! आवडीने चवीने खाईल असा पदार्थ आहारात नाही की चार पैसे गाठीला बांधून ठेवावेत अशी मध्यमवर्गीय की काय असते ती बैठक त्याच्या विचारात नाही! मग का जगत सुटलंय हे खाजेसारखं? माहीत नाही! मग काय चाललंय काय हे! चैतन्यदायी रस्ते असले काय किंवा थुलथूलीत रोडवणारा मोठा महामार्ग असला काय?

दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी सोमवार, 16/11/2020 23:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी पाडवा ! पती-पत्नीच्या नात्याचा गौरव !! खरं तर समाजात आजकाल हे नातं, अनेकवेळा वेगळ्या कारणांमुळे चर्चेत येतयं. पूर्वीची चाकोरी सोडून, आपण नवे विचार(?) रुजवू पाहतोय. लग्नानंतर काही काळाने, काही ठिकाणी नवरा बायकोचं पटेनासं होतं. मानसिक, शारीरिक, बौद्धिक, तात्विक गरजांची गणितं चुकत आहेत, असं वाटू लागतं. अनेक पातळ्यांवर आपल्या जोडीदाराचं, अपूर्णत्व जाणवू लागतं. मग आपलंच मन, सखा/सखी शोधू लागतं. अनेकांना अशी व्यक्ती सापडतेही... मन मोकळं होऊन, आपण सुखाचा श्वास घेतोयं, अशी गोड जाणीव होते. ती अनेक प्रसंगातून पक्की होत जाते. नकळत हे नवीन नातं, दृढ होत राहतं...

शिकण्याचे मानसशास्त्र — वर्ड प्रॉब्लेमस्

लेखक राजा वळसंगकर यांनी बुधवार, 11/11/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
“The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.” एका अभ्यासलेखामधे हे वाक्य वाचले आणि थबकलो. मार्कांच्या रस्त्यावर झापड लावून धावणाऱ्यांचा मागे कळपवृत्तीमुळे धावताना आपण काहीतरी विसरलो आहोत हे जाणवत होते, काहीतरी मागे ओढत होत आणि थांब, प्लीज थांब म्हणत होत... हाच का तो विचार ... ? मागच्या अनेक FB पोस्ट मधून शिकण्याचे मानसशास्त्र आणि त्यातून डोकावणाऱ्या साहित्याच्या घटकांची "थिअरी" वर लिहिले, आता "प्रॅक्टिकल"! यासाठी वर्ड प्रॉब्लेम हा एक मोठा घटक आहे.

‘बेस्ट’ प्रवास ‘वर्स्ट’ स्वानुभव

लेखक लेखनवाला यांनी रविवार, 08/11/2020 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
0**0**0**0**0 ऑक्टोबर महिना सुरु झाला आणि मार्चपासून सुरु झालेलं वर्क फ्रॉम होमचं सत्र संपलं, यावर्षी छत्री ही हातात घ्यावी लागली नव्हती इतका कडक लॉकडाऊन आणि वर्क फ्रॉम होम झालं होतं.

प्रतिमा जपायची आहे

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 01/11/2020 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्यिक, कलावंत वा संवेदनाशील व्यक्‍तींना ‍जीवनात हटके अनुभव घ्यायला आवडतात. पण असे अनुभव घेतांना काही चटके बसणंही अपरिहार्य असतं. हे चटके सोसण्याची ताकद प्रत्येकात असतेच असं नाही. उलट परिणाम उद्‍भवले की व्यक्‍ती गांगरून भीतीने थरथरते. आपण ज्या सामाजिक चौकटीत वावरतो त्या जनमानसात आपल्या प्रतिमेला तडा जाऊ नये असं वाटणं स्वाभाविक आहे. आपल्या मूळ स्वरूपाहून केवळ आपली प्रतिमा उत्कट करण्याच्या अट्टहासामुळे, माणूस हटके अनुभव घेण्यासाठी आपणहून साहस करत नाही. पचेल, परवडेल, समाजात चुकीचा संदेश जाणार नाही असा मोजून मापून आपण अनुभव घेतो. परिणाम उलटा होताच हादरून जातो.

सत्यमेव जयते.

लेखक Jayant Naik यांनी रविवार, 01/11/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
सत्यमेव जयते. प्राध्यापक जगदीश कदमांना एकदम दचकून जाग आली . कोणी तरी त्यांचे पाय हलवत होते .. “ ओ ..साहेब .. जरा उठा ..आम्हाला जरा बसायला जागा द्या…” एक क्षण भर त्यांना आपण कुठे आहोत हेच आठवेना ..मग हळू हळू त्यांच्या मेंदूवरचा झोपेचा पडदा अलगद सरकला ,आणि त्यांना आठवले कि आपण कोल्हापूरला जाणाऱ्या एक्सप्रेस मध्ये आहोत आणि कुणी तरी आपल्याला अगदी माजोर पणे उठवत आहे. त्यांनी नीट डोळे उघडून पाहिले . मग उशाशी असलेला चष्मा आपल्या डोळ्यांना लावला. त्यांना आता नीट दिसले तीन चार जण ते झोपले होते त्या बर्थ पाशी उभे होते.

जीवन के सफर मे

लेखक नीलकंठ देशमुख यांनी बुधवार, 28/10/2020 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
जीवन के सफर मे राही जीवन के सफर मधे चालताना ,कुठे ना कुठे कुणी ना कुणीभेटतच असते।आपण विसरून ही जातो । बिल्लू बाल्मिकी ,असे नावधारण केलेला,उत्तराखंड मधील मसुरीच्या  रस्त्यावर दोनच मिनिटे भेटलेला माणूस आठवणीत राहाण्याचे काही कारण नाही। पण राहिला ।त्याची ही, म्हटलं तर ,गोष्ट। हिमालयाच्या कुशीतील सगळी ठिकाणं काय किंवा निसर्गाने निर्माण केलेली कुठलीही ठिकाणे  नुसती पाहाण्या पेक्षा, निवांतपणे अनुभवायची आहेत,हे अनुभवांती पटलंय। दोन वर्षांपूर्वी नोव्हेंबर च्या तिसऱ्या आठवड्यातअतिशय आल्हाददायक निवांत वातावरणात, रमणीय स्थळांमधे उत्तराखंडात । पण गावे निवांत नव्हती। कारण, स्थानिक स्वराज्य

स्मरण रंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी मंगळवार, 27/10/2020 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"आवाज के दुनिया का दोस्त " संगीत ,सर्व प्रकारचे संगीत,लोकप्रिय होण्यात ,त्याचा प्रसार ,प्रचार होण्यात रेडीओ चा फार मोलाचा वाटा । हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल किंवा घोडदौड तर मुख्यत्वेया माध्यमाच्या पाठीवरूनच झाली । आपला शेजारी देश,सिलोन(श्रीलंका )रेडीओ वर हिंदी सिनेगीतासाठी वेगळे केंद्रच (श्रीलंकाब्रॉडकॉस्टिंग कंपनीचे )आहे । बहुतेक आपणा सगळ्यांचे आवडते स्टेशन। तिथे ऐकलेल्या असंख्य गाण्यांनी वेड लावले । सर्व कार्यक्रमाचा सरताज म्हणजे "बिनाका गीतमाला""। बुधवार केव्हा येतो ,रात्रीचे आठ केव्हा वाजतात अन , #भाईयो और बहनो 'अशी साद घालत आवाज की दुनिया के दोस्तों को साद घालणारा एक सुपरिचित ,सुप्रस