Skip to main content

लेख

शिवप्रतापाची झुंज ( भाग ३)

लेखक दुर्गविहारी यांनी मंगळवार, 15/09/2020 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
या कथेचे आधीचे भाग ईथे वाचु शकता शिवप्रतापाची झुंज ( भाग १) शिवप्रतापाची झुंज ( भाग २) राजगडाच्या सदरेवर नेहमीप्रमाणेच कामकाज सुरु होते.बराच नवीन मुलुख स्वराज्याला जोडला गेला होता.त्याचे खलिते,महजर सदरेवर येत होते.कल्याणच्या बंदरात जहाजाची उभारणी सुरु होती.त्याच्या खर्चाची तजवीज लावायची होती.राजे स्वत उसंत न घेता या सार्‍या मसल्यात जातीने लक्ष घालत होते.ईतक्यात एक खलिता घेउन हेजीब विजापुरावरून आला आणि त्याने लखोटा थेट राजांच

लबरे़ज

लेखक ज्येष्ठागौरी यांनी शनिवार, 12/09/2020 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
लबरे़ज... आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम!

Once in a lifetime....!

लेखक डॉ श्रीहास यांनी शनिवार, 12/09/2020 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ? मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच. भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...

शिवप्रतापाची झुंज ( भाग २)

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 12/09/2020 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागाची लिंक शिवप्रतापाची झुंज ( भाग १) "बेगमसाहीबा, अंदर आनेकी ईजाजत है ?" अलीने महालाच्या दाराबाहेर उभा राहून प्रश्न केला. "हां, अंदर आवो! तशरीफ रखो" महालात करडा आवाज घुमला. बुरख्याच्या आडचे तिक्ष्ण बदामी डोळे अलीवर रोखले गेले. अली बैठकीवर बसला आणि महालातील ती करारी बाई ताडकन उठली आणि फेर्‍या मारु लागली. कोण होती हि राजस्त्री ? हि होती मरहुम महमद आदिलशहाची बीबी, बडी बेगम. वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते.

वेढा

लेखक rushikapse165 यांनी शनिवार, 12/09/2020 08:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंकिता. . . . . . .

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 10/09/2020 09:24 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित.

शिक्षक दिन

लेखक कवि मनाचा यांनी बुधवार, 09/09/2020 21:57 या दिवशी प्रकाशित केले.
५ सप्टेंबर... शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. छोट्या-छोट्या प्रसंगातून शिक्षक-विद्यार्थ्यातले संवाद व त्याद्वारे समजलेली शिक्षणमूल्ये लिहिण्याचा हा एक प्रयत्न... ------------------------------------- एक आई आपल्या लहानग्या मुलाला शिकवते की, जीवनात नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. चांगली संगत असेल तरच तुझी प्रगती होईल. वाईट संगत तुला वाईट मार्गावर नेईल. म्हणून देवाची तू प्रार्थना कर - "देवा, मला आयुष्यात नेहमी चांगल्या लोकांच्या सहवासात ठेव." वाचनाची आवड लागावी म्हणून आई त्या मुलाला गावातल्या सार्वजनिक वाचनालयात जाण्याची सवयही लावते. मुलगा वाचनालयात जाऊन डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. व्ही.

ज्याचे करावे भले..

लेखक आजी यांनी बुधवार, 09/09/2020 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात. माझ्या घरच्या प्रत्येक कामवालीचे मी बॅंकेत खाते काढून दिले. त्यांच्या पगाराची काही रक्कम त्यांच्या अनुमतीने त्यांच्या खात्यात जमा केली. बचतीची सवय व्हावी हा उद्देश. माझ्या एकुलत्या एक मुलाला सोबत म्हणून कायम एखादा गरजू मुलगा किंवा मुलगी घरी सांभाळली. तिला/त्याला शाळेत घातलं. कपडालत्ता, वह्या पुस्तकं, फी याची काळजी घेतली. मुलींच्या लग्नासाठी खर्चात मदत केली. भांडीकुंडी दिली. इतर कितीतरी मुलांचे क्लासेसचे पैसे भरले.

घात (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी मंगळवार, 08/09/2020 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
घात (कथा) एक चांगला माणूस बनणे, यापेक्षा जगात दुसरी कोणती मोठी गोष्ट असू शकते? मी तर म्हणेन चांगला माणूस बनणे हीच जगातील सर्वात कठीण गोष्ट असेल. तशी ती कठीण गोष्ट साध्य केल्याचा मला मोठा अभिमान आहे. आणि अभिमान असायलाही हवा. एकदम वाईट प्रवृत्तीचा माणूस जेव्हा, पूर्णपणे चांगला बनतो तेव्हा, त्याच्या त्या परिवर्तनाचा अभिमान वाटायलाच हवा. आणि मला तसा वाटतोही. मी गुरुदत्त. एक चांगला माणूस. आधी नव्हतो. पण आता आहे. पाच वर्षांपूर्वी, एकदम टोकाचा वाईट प्रवृत्तीचा माणूस, आज चांगला कसा झाला? याचे खुद्द मलाच आश्चर्य वाटते.