Skip to main content

लेख

अलक चाहुल

लेखक नीळा यांनी मंगळवार, 02/02/2021 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
सारख जाणवत होत ती आसपास वावरतेय. रिकाम्या घरात बेडरूममध्ये मधुन कीचन तीथून हॉल. क्षणभर हार घातलेल्या तीच्या फोटो समोर स्थब्ध. सारा सारा वेळ मागे पाठीशी तीचीच चाहुल, तीचाच गंध,जीवघेणी हुरहूर.चुकुनच लावलेला तीचा शांपू!

अहिराणीचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/02/2021 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक ठिकाणी आधी बोलली जाते ती बोलीभाषा. बोलीभाषाच कालांतराने प्रमाणभाषा होत जातात. मात्र अनेक बोलींपैकी काही बोलीभाषा आज नामशेष झालेल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात. हा बदल आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच अस्तित्वात होती. परंतु आज तीच भाषा आपल्या राष्ट्रभाषेचा मान मिळवू पहातेय. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती आणि मराठी ह्या भाषासुद्धा प्राथमिक अवस्थेत केवळ बोलीभाषाच होत्या.

पतंग....!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 29/01/2021 22:40 या दिवशी प्रकाशित केले.
पतंग...!! नऊ वाजले तसं भिकूशेठनं दुकान उघडलं. त्या छोट्याशा जागेत, एकदम प्रकाश पसरला. अरेच्च्या, सकाळ झाली वाटतं.. पण आळोखेपिळोखे द्यायची इथे सोयच नाही. खालच्या वरच्यांच्या हातापायांचे धक्के खात नुसतं दाटीवाटीनं महिनोन् महिने बसून रहायचं.... काय हे आपलं जीवन...!! तेवढ्यात कोणातरी गि-हाइकाची चाहूल लागली. "शेठ पतंग आहे का हो तुमच्याकडे...?" माझे कान टवकारले. मनात गुदगुल्या झाल्या. चला जागा तरी बदलेल आज माझी... भिकूशेठ रॅकपाशी आले आणि पतंगाचा गठ्ठा टेबलावर गेला. थोडं पाहून झाल्यावर मुलाचे बाबा म्हणाले, "गोलू, तुला कोणता पतंग आवडला..?" अं..अं.. बाबा, मला लाल पतंग हवाय.. "लाल"....??

लंगडा (गूढकथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शुक्रवार, 29/01/2021 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
लंगडा (गूढकथा) त्याने पुन्हा एकदा आवाज दिल्यावर मात्र, माझा नाईलाज झाला. मी जागेवर थांबलो. तो दुडक्या चालीत माझ्याकडे येत होता. तो डाव्या पायाने लंगडा असावा. आपला डावा हात गुढग्याच्या थोडा वर टेकवून, तो माझ्या दिशेने येऊ लागला. मला नवल वाटले. कोण पाठीमागून आवाज देतोय, म्हणून मी वैतागलो होतो. पण आता ही त्याची लंगडी स्थिती पाहून, मला उगीच थोडासा खेद वाटून गेला. याच्याशी नारमाईने वागायला हवे, असे उगीचच वाटून गेले. आमच्यातले ते वीस पंचवीस मीटरचे अंतर कापायलही, त्याला बराच वेळ लागला. तो माझ्याजवळ आला. माझ्याकडे बघून त्याच्या चेहऱ्यावर काहीसे समाधान उमटून गेले.

गँग ऑफ बदलापुर -

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी बुधवार, 20/01/2021 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
"एस पी साहेब, एक विधायक को सरेआम थानेमें थप्पड मारनेके लिये कितना दिन जेल में जाना पडता है?" काल गॅबावर ४५ ओव्हर्समध्ये १ बाद १०७ अशी परिस्थिती असताना ६ फूट ५ इंच उंचीच्या मिचेल स्टार्कला ३ चेंडूंत १४ धावा चोपतानाचा शुभमन गिलचा उर्मटपणा "गँग्स ऑफ वासेपुर" च्या सरदार खानपेक्षा काही कमी नव्हता.

शनिपीठ दर्शन

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 18/01/2021 10:22 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या महाराष्ट्रात देवींची साडेतीन शक्तीपीठं आहेत. तशीच भारतात शनि देवाची पण साडेसात शक्तीपीठं आहेत. त्यातील साडेतीन शक्तीपीठं स्वतः प्रभु रामचंद्रांनी स्थापन केलेली आहेत. एक मध्यप्रदेशातलं उज्जैन सोडलं तर बाकी अडीच नाशिक व बीड जिल्ह्यात. आम्ही तीघी मैत्रिणींनी हि अडीच पीठं तरी जाऊन येऊ असं ठरवलं. तसंही लाॅकडाऊन पासून म्हणजे मार्च 2020 नंतर भटकंती बंदच होती. आताशा सगळं नाॅर्मल होतय हळुहळू तर आपण योग्य काळजी घेऊन जाऊन येऊ असं म्हणून निघालो. जानेवारी महिना असूनही जास्त थंडी नव्हती. सकाळी सहाला च मोकळ्या रस्त्यांवर आमच्या चक्रधरांनी गाडी सुसाट सोडली.

लागा चुनरी मे दाग..

लेखक चिनार यांनी शनिवार, 16/01/2021 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
लागा चुनरी में दाग.. अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद रफी, लतादीदी, आशाताई, मेहंदी हसन, गुलाम अली ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्यात. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'चांगलं' काय असतं ह्याची उमज येऊ लागली. कॅसेट्च्या त्याच संचात रुपकुमार राठोड ह्यांच्या गझल प्रोग्रॅमची एक कॅसेट होती. ती कॅसेट बाबा वारंवार लावायचे. वो रस्मे तोड के घर मेरे आने वाले है...

उंदराचा डोह (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 14/01/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
उंदरांचा डोह.. शाळा सुटल्या सुटल्या मी नदीकडे निघालो. हा माझा नित्य नेम होता. मी सहसा तो चुकवत नसे. सलग सात आठ तास शाळेत शिकवण्यामुळे, जो शीण अंगभर पसरलेला असतो, तो नदीवर जाऊन निवांतपणे व्यक्त करता येतो. नदीच्या वरच्या अंगाला एक ठिकाण होते. सहसा त्या ठिकाणी कोणी फिरकत नसे. का फिरकत नसे? हा विषय गौण आहे. कारण प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात. आता काही जणांचे म्हणणे होते की, ते ठिकाण चांगले नाही. तेथे अजब घडामोडी घडतात. तिथे कधी काहीही घडू शकते. प्रत्यक्षात तसा कोणाला काही अनुभव आला नव्हता. पण एखादा म्हणाला ती जागा चांगली नाही, की दुसराही तेच म्हणतो. मग तिसराही.