Skip to main content

लेख

गुलमोहर सोसायटी, हत्ती आणि 'शेर'

लेखक कुमार जावडेकर यांनी रविवार, 10/01/2021 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
"या वर्ष-अखेरीच्या पार्टीसाठी एक नवीन कल्पना सुचली आहे, " परुळेकर मामा बाल्कनीत येत मला म्हणाले, "नाही तरी 'व्हर्च्युअल गेट-टुगेदर' आहे, तर फक्त गप्पा मारुया. प्रत्येकानं २०२० मध्ये घडलेली एक तरी सकारात्मक किंवा आनंददायी घटना सांगायची." "विचार करून सांगतो, " मी म्हणालो. वास्तविक, गप्प बसून राहणे, गप्पा मारत बसणे किंवा अगदी गप्पी मासे पाळणे या 'गप्प' च्या बाराखडीत येणाऱ्या कुठल्याही क्रियेला माझा कधीच विरोध नसतो. मामांनाही हे माहिती आहे. आम्ही आपापल्या बाल्कन्यांमधून अशी चर्चा गेली वीस-बावीस वर्षं करत आलो आहोत.

बालकथा - वेदिका शहाणी झाली.

लेखक nanaba यांनी शुक्रवार, 08/01/2021 20:23 या दिवशी प्रकाशित केले.
श्रुतिका आणि वेदिका दोघी छान मैत्रिणी होत्या. बागेत रोज भेटायच्या, मजा करायच्या. श्रुतिकाला वेदिका फार आवडायची. तिचे नीटनेटके कपडे, गळ्यातल्या छान छान माळा,गोड गाणी म्हणणं, गोड बोलणं. वेदिका होतीही मोठी हुशार आणि दिसायची पण कित्ती छान! श्रुतिकाला फार वाटायचं की आपल्याला पण वेदिका सारखं सगळं छान जमलं असतं तर! सुट्टीत श्रुतिका वेदिकाकडे रहायला गेली. दोघी पहिल्यांदाच एकत्र रहात असल्याने दोघीही जाम खूष होत्या. वेदिका च्या आईन श्रुतिका येणार म्हणून तिची आवडती इडली केली होती. दोघी खायला बसल्या. श्रुतिकाने सगळं छान संपवलं , पण वेदिका मात्र अखंड बडबड करत बसलेली.

शिक्षणाचे मानसशास्त्र: परीक्षार्थी शिक्षण - जमेची बाजू

लेखक राजा वळसंगकर यांनी बुधवार, 06/01/2021 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या लेखात Teaching to the test किंवा परीक्षार्थी शिक्षणाचे दोष बघण्याचा प्रयत्न केला. पण शास्रोक्त (scientific) आणि न्याय (logical) विचार करून निर्णयाकडे यायला हवे आणि त्या निर्णयाला सारासार (practical and pragmatic) विवेक बुद्धीची जोड हवी. शिक्षणाचा हाच तर अंतस्थ हेतू आहे ना? (Critical thinking). परीक्षा पद्धतीवर जास्त लिहिले आहे, पण परीक्षार्थी शिक्षणावर माझे विचार कुठून येतात हे सांगण्याचा प्रयत्न आहे.

सार्वजनिक परीक्षा पद्धतीची सुरुवात

परीक्षार्थी शिक्षण पद्धत ही सार्वजनिक निवड/पात्रता परीक्षेच्या अनन्यसाधारण महत्वामुळे अस्तित्वात आली हे सांगायला नको, पण सुरुवात इथून होते.

नालायक .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 04/01/2021 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नालायक . प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता. आज सकाळी सुद्धा ते सकाळी आपला नेहमीचा पाळायचा व्यायाम करून घरात आले तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता. ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीने दिवाणखान्यातील फोन जवळ गेले. “किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक ? घरी काय माणसे नाहीत की काय ?” असे म्हणत त्यांनी फोन उचलला. “ मी रमेश जाधव बोलतोय ..” फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात रमेश यावर जास्त जोर देत म्हणाले.

बालम केतकर : अ-भंग

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 02/01/2021 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे बालम केतकर गेले. 26 डिसेंबर 2020 ला बातमी येऊन धडकली. ही बातमी आत प्रचंड कासावीस करणारी आहे. विश्वास बसत नव्हता. म्हणून त्यांच्याच नंबरवर तात्काळ फोन केला. त्यांच्या पुतण्याने उचलला. बातमी खरी होती. ह्‍दय विकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं होतं. 23 डिसेंबरला त्यांनी मला लिहिलेलं सविस्तर पत्र 26 डिसेंबरला मिळालं, जे मी त्यांच्या निधनानंतर वाचत होतो. (प्रत्येक चार दिवसांनी वा आठवड्याने त्यांचा फोन येत होता. आणि सोबत पत्रंही.) 24 डिसेंबरला सकाळी आठ वाजता त्यांचा शेवटचा फोन आलेला. म्हणजे फक्त तीन दिवस आधी. म्हणाले, ‘कूपर हॉस्पिटलमधून काल फोन आला.

आरंभशूर..

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी शुक्रवार, 01/01/2021 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
आरंभशूर.... चहासाठी आधण ठेवणार, इतक्यात फोन वाजला. कोणाचा असेल, म्हणून न बघताच घेतला. डॅनी, काय करतेस गं..? लवकर तयार हो आणि सीसीडी मध्ये काळे चौकात भेट.... अगं, हो हो.. मी हसत हसत हेमाला म्हणाले. पण आज तुझा गाण्याचा क्लास नाहीये का...? "ते सोड गं.. डॅनी, तू उगाच प्लॅनला फाटे फोडू नकोस. आपण साडेचारला भेटतोय. बाय".... घड्याळात ३.५५ झाले होते तरी, अर्धा कप चहा घ्यायचा ठरवून तयारीला लागले. तर.. ही हेमा देव, माझी मैत्रिण..! खरंतर लहान आहे माझ्यापेक्षा, बारा-तेरा वर्षांनी.. पण एक अजब रसायन आहे ते..!! पाच एक वर्षापूर्वी मी मुंबईहून डेक्कनक्वीनने परत येत होते.

कलापंढरी फ्लॉरेन्स

लेखक Rahul Hande यांनी शनिवार, 26/12/2020 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
७ फेब्रुवारी १४९७ चा दिवस इटलीतील एका शहरात एक अनोखी होळी रचण्यात आली. सॅव्हानारोला नावच्या धर्मगुरूने या शहरावर आपली धार्मिक दहशत कायम केली होती. त्याच्या आदेशानुसार त्याचे धार्मिक शिपाई 'ख्रिस्त अमर रहे','मेरी अमर रहे' च्या जयघोषात शहरातील प्राचीन पुस्तकं,हस्तलिखितं,शेकडो चित्रं,रेखाटनं,ऑईल पेंटिंग्ज,शिल्प,हस्तिदंती कोरीव काम केलेल्या वस्तू या होळीत टाकत होते. एका कलासंपन्न शहराचे वैभंव धगधगत्या अग्नीज्वाळांमध्ये बेचिराख होत होतं. शहरवासीयांची अलोट गर्दी या होळीच्या दर्शनासाठी जमलेली होती.या गर्दीत एक सतरा-अठरा वर्षाचा तरुण ही होता.

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 22/12/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं.

"रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" - पुस्तक परिचय

लेखक MipaPremiYogesh यांनी शनिवार, 19/12/2020 22:16 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९९८, पेपर मध्ये सगळी कडे बातमी आली होती कि "रानपिंगळा" हा पक्षी ११३ वर्षांनी सापडला आणि त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण माझ्या मूळ गावाच्या प्रदेशात म्हणजेच खान्देशात सापडला होता. ह्याचा पुनर्शोध अमेरिकन स्त्री पक्षी संशोधक पामेला रासमुसेन ह्यानी लावला होता. कट २ - अचानक काही दिवसापूर्वी "रानपिंगळा - अज्ञातवास व पुनर्शोध" ह्या डॉ. जयंत वडतकर लिखित पुस्तकाबद्दल वाचण्यात आलं. बरेच दिवस झालेले नवीन पुस्तक घेऊन, म्हणून पटकन हे पुस्तक मागवलं . ३ दिवसात पुस्तक घरपोच आलं आणि एका बैठकीमध्ये वाचून काढलं .

बेंगळुरूचा कार्तिक -३

लेखक पॉइंट ब्लँक यांनी शुक्रवार, 18/12/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
आज कुंदलहल्ली येथील नागलिंगेश्वर मंदिरातील यंदाच्या तसचं गेल्या वर्षीच्या पूजेची छायाचित्र पाहु. नागलिंगेश्वर हे तस थोड जास्त वर्दळ असणारं मंदिर. मंदिरातील शिवलिंग जवळपार पाच फुट उंचीच आहे. लिंगावर पाच फण्यांचा नाग आहे म्हणुन हा नागलिंगेश्वर. गेल्या वर्षी कार्तिक महिन्यातल्या चारी सोमवारी पूजेसोबत रोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा असत- शास्त्रीय संगती, भरतनाट्यम्, कुचिपुडी इत्यादी. ह्या वर्षी फक्त पूजाच झाल्या.