आंध्र प्रदेशमधील वरंगळ जिल्ह्यात दोन तरुणींवर ऍसिड हल्ला केला गेला. हल्ला करणारे तीन तरुण सुशिक्षित होते. त्यांनी इतक्या टोकाची भूमिका का घेतली? ज्या तरुणींवर हल्ला झाला, त्यांचा दोष काय, यांसारखे अनेक प्रश्न या घटनेच्या निमित्ताने समोर आले आहेत. स्वप्निका आणि प्रणिता या विद्यार्थिनी वरंगळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. दहा डिसेंबर रोजी दुचाकीवरून घरी परतत असताना, त्यांना श्रीनिवास (23), संजय (22) व हरिकृष्ण (23) या तरुणांनी गाठले आणि काही लक्षात यायच्या आत त्यांच्यावर ऍसिड हल्ला केला. यात दोघी गंभीर जखमी झाल्या.