मरणघाई (लोकल गोष्टी)
- Read more about मरणघाई (लोकल गोष्टी)
- 5 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
मरणघाई
=============================================
मी राजसला शाळेत सोडून पार्ला स्टेशनवर ट्रेनमध्ये चढायचे तेव्हाची गोष्ट आहे. स्टेशनवर एक जिंगल सतत वाजत असायची.. आणि शेवटच्या एका ओळी व्यतिरिक्त काहीच मला समजायचं नाही. बरं तिच्याकडे दुर्लक्ष करावं.. तर ती इतक्यांदा वाजत राहायची की एखादा तरी शब्द डोक्यात घुसायचाच. मी पाच ते दहा मिनिटं तरी स्टेशन वर असायचे त्या तेवढ्या वेळेत किमान सात-आठ वेळा तरी ती जिंगल मला ऐकावी लागायची.
मग एकदा कधीतरी मी ती जिंगल नीट लक्ष देऊन ऐकायचं ठरवलं. आणि ट्रेन येत असल्याच्या, विलंब होत असल्याच्या, स्वच्छतेच्या..