निगरगट्ट आठवांचा चिखल..
पाऊस आला की मन आठवांनी ओलंचिंब होतं. तसं पाहिलं तर हरेकाच्या मनामध्ये आठवांचा पाऊस हमेशा बरसत असतोच...
अवकाळी बरसणाऱ्या काही आठवणी असतात तर काही भुरभुरत्या सरींसारख्या अंगावर सुखद शिडकावा करणाऱ्या. झिम्मड पावसागत काही फेर धरणाऱ्या तर काही झडीच्या धारांप्रमाणे नकोनकोशा. काही स्मृती श्रावण सरींसारख्या ऊन पाऊस खेळणाऱ्या तर काही उगाचच मनाच्या शिखरावर रेंगाळणाऱ्या. काही आठवांची इंद्रधनुष्ये असतात तर काही स्मृती काळ्याशार ढगांमधून दाटून येत असतात.
जितके पावसाचे प्रकार तितकी स्मृतिंची ही वलये... शांत जलाशयाच्या पृष्ठभागी थेंबाथेंबाने उमटणाऱ्या अगणित तरंगांसारखी... झाडाला वेढणाऱ्या वेलींसारखी...
मिसळपाव