Skip to main content

लेख

गेटींग थिंग्स डन - डेव्हीड अ‍ॅलन

लेखक सुधीर यांनी रविवार, 30/06/2013 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
कधी असं होतं का? एखादं काम करायचं आहे हे आपल्याला फार पूर्वी लक्षात आलेलं असतं. पण इतर महत्त्वाच्या कामांच्या उपद्व्यापात आपण ते छोटंसं काम पूर्णपणे विसरून जातो आणि मग एक वेळ अशी येते की ते काम "आज, आता, ताबडतोब" म्हणून बोंबलतं. मग हातातली सगळी इतर कामं सोडून आपल्याला त्या कामाच्या पाठी लागण्याशिवाय गत्यंतर नसतं. असं बर्‍याच वेळा होतं आणि सगळी कामं सोडून ते काम करण्यात फारसं विशेषही नसतं. पण कधी कधी असं झाल्याने आपल्याला चांगलाच आर्थिक वा इतर फटका पडतो.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (४)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 27/06/2013 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुन २०१३ आजकाल आमच्या घडाळ्यात साडेदहा वाजले की माझ्या डोक्याचे सव्वाबारा वाजतात.. त्यावेळी आमच्या टीवीवर एक सिरीअल लागते जी मला "बडी बोअर लगती है" .. न बघणे हा पर्याय संपुष्टात येतो कारण माझी आई आणि बायको.. दोघींनाही ती "बडी अच्छी लगती है" .. जेवायची आमची वेळही साधारण हिच असल्याने आणि जेवायची जागाही अर्थातच टिव्हीसमोर असल्याने इच्छा नसूनही बघावीच लागते. सासूसुनेच्या भांडणात पुरुष बिचारा मधल्यामध्ये मरतो असे म्हणतात खरे, पण जेव्हा याच सासूसुनेची युती होते तेव्हा जगणेही मुश्किल होते हा अनुभव मी गेले काही दिवस या मालिकांमुळे घेतोय.

एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !

लेखक जॅक डनियल्स यांनी बुधवार, 26/06/2013 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद ! एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला ! एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ ! ....मला घरी फोन यायचा "अहो ते साप वाले आहेत का ? आमच्या घरी/बागेत/रस्त्यावर/गच्चीवर/स्वयंपाकघरात इ.भला मोठा साप आहे...तुम्ही ताबडतोब या":- ही अशी वाक्य ते एका दमात बोलायचे. मी तर जे हातात असेल ते सोडून पूर्ण जीव फोन मध्ये लावायचो.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (३)

लेखक तुमचा अभिषेक यांनी सोमवार, 24/06/2013 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
१० जुन २०१३ ती नेहमी मला बोलते, जेव्हा तू मला भेटतोस, हसत नाहीस.. जसा लग्नाआधी हसायचास.. जेव्हा लांबूनच बघायचास.. नजर पडताच खुलायचास.. आता तिला कसे समजवू, उगाच हसता येत नाही मला, आणि कृत्रिम हसायला तर मुळीच जमत नाही.. लग्नाआधीची गोष्ट वेगळी होती.. आता तुला भेटणे आणि तुझ्याबरोबर घरी जाणे रोजचेच आहे.. रोज तशीच तूच दिसणार हे ठाऊक आहे.. मग का उगाचच ते औपचारीक हसणे.. पण.., गेले दोनचार दिवस मात्र हे रुटीन बदलले होते.. तिच्या कॉलेजला सुट्ट्या, तर घर ते ऑफिस माझ्या एकट्याच्या वार्‍या.. आजही एकटाच होतो.. आणि ती कसल्याश्या कामासाठी बोरीबंदरला गेली होती. ऑफिसातून निघता निघता आठवले, श्या..!

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (२)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शुक्रवार, 21/06/2013 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
८ जुन २०१३ पहिल्या पावसाची चाहूल लागल्यापासून बायकोचे कुठेतरी लांबवर फिरायला घेऊन चल चालूय.. तिचेही खरेच आहे.. पावसाळा हा काही खिडकीतून बघायचा उत्सव नाही.. कडाडणारी वीज अन गडगडणारे ढग.. घरबसल्याच धडकी भरवतात.. जणू काही शत्रू अंगावर चाल करून येतोय.. पण मैदानात उतरायचे ठरवल्यास तेच जोडीदार बनून राहतात.. तरीही लांबवर कुठे जायचे म्हणजे वेळ हवा, सुट्टी हवी.. पैशाचेही सोंग काही घेता येत नाही.. जमेल तेव्हा जाऊच, पण आजची संध्याकाळ भाऊच्या धक्क्यावर घालवूया म्हणालो.. हो ना करता झाली तयार.. भाऊचा धक्का..! टॅक्सी पकडली की मीटर पडायच्या आधी येते.. तरीही चार सहा महिने वर्षातूनच जाणे होते..

(जंगलातला) आजोबा !!

लेखक जॅक डनियल्स यांनी रविवार, 16/06/2013 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'! आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे. आजोबाला बघा आणि अनुभवा ! 'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.

शापित अप्सरा

लेखक रसिया बालम यांनी शनिवार, 15/06/2013 02:33 या दिवशी प्रकाशित केले.
पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं ;) मधूबाला नावाची शुक्राची चांदणी अगणित रसिकांच्या ह्रदयाची धडकन आहे. फक्त जनसामान्यच नव्हे तर प्रेमनाथ, दिलीपकुमार आणि किशोरकुमार असे महारथी रांगेत उभे आहेत.