लेख
(जंगलातला) आजोबा !!
'सुजय डहाके' हा एक मराठी चित्रपटसृष्टीतला प्रयोगशील दिर्दर्शक ! सुरवातीचा चा पिच्चर 'शाळा' काढून त्याने सगळ्यांना 'इचीभना' म्हणायला लावला. त्याचा नवीन येणारा चित्रपट म्हणजे 'आजोबा'!
आजोबा नावाच्या एका बिबट्याची गोष्ट त्याने सुंदर चित्रबद्धीत केली आहे.
आजोबाला बघा आणि अनुभवा !
'आजोबा' हे कसले बिबट्याचे नाव..पण हाच बिबट्या वाघ महाराष्ट्राच्या जंगलचा राजा होता. जसा राजा आपल्या प्रजेपासून अंतर ठेवून राहतो तसा तो ऐटीत जंगलात राज्य करायचा पण नंतर हीच प्रजा मारुतीच्या शेपटी सारखी वाढत गेली आणि राजाचे राज्य कमी होऊ लागले.
शापित अप्सरा
पारावारच्या गप्पा चालू असताना विषय निघाला की सर्वात सुंदर अभिनेत्री कोण ? नावांची बरसात झाली; नुसता कल्ला. माझी पसंत एकच.....ती ! अस्मादीकांना आउटडेटेड ठरवण्यात आले. चालायचंच..! तब्बल ४ दशकं उलटली 'तिला' जाउन पण ती भुरळ अजुन तशीच आहे.....चिरतरुण आणि चिरंतन! जमतेम टीनएजर असताना या अप्सरेचं पहिले 'छायागीत' (दूर)दर्शन झाले. त्या दिवशी "प्रथम तुज पाहता जीव वेडावला" हे गाणं पुरेपूर उमगलं ;)
मधूबाला नावाची शुक्राची चांदणी अगणित रसिकांच्या ह्रदयाची धडकन आहे. फक्त जनसामान्यच नव्हे तर प्रेमनाथ, दिलीपकुमार आणि किशोरकुमार असे महारथी रांगेत उभे आहेत.
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
आधीच्या भागात लिहिल्या प्रमाणे मी सापांचे कॉल (कॉल: साप, घोरपड, घर, गरुड, घुबड ,उदमांजर , रानमांजर इ. पकडण्यासाठी साठी आलेला फोन) करायला सुरवात केली. पण कुठून यायचे हे कॉल ? कोण करायचे ? नंतर त्या सापांचे काय व्हायचे ?
अमानवीय-काही उत्तरे
काही उत्तरे या भागात मागील भाग http://www.misalpav.com/node/24838 तील काही प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न. यातुन भुत आणि मानवात स्नेह वाढुन एक दिवस हा स्नेह भारत-पाकिस्तान मैत्रीलाही मागे टाकेल याची खात्रीच आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------
भुतांची सायकॉलॉजी थोड्याफार प्रमाणात माणसांसारखीच आहे. उदा. आपल्यात कोणी गल्ली चुकलं की लोक स्वत:हुन म्हणतील, "काय ब्वा, हिकडं कसं काय?" तसच भुतांमध्येपण आहे. आपण त्यांच्या एरीयात गेलो की आलेच ते आपली चौकशी करायला.
अंड्याचे फंडे ८ - हरवलेले आवाज
बरेच दिवसांनी अंड्याचे कॉलेजला जाणे झाले जे तो कधीच मागे सोडून आला होता. होस्टेलला चक्कर मारली पण शुकशुकाट वाटला. बरेच वर्षांनी एखाद्या ओळखीच्या जागी जावे आणि तिथे कोणी आपल्या ओळखीचे दिसू नये की मग एकतर तेथील गजबजाट तरी अंगावर येतो किंवा शुकशुकाट तरी वैताग आणतो. तिथून बाहेर पडलो आणि कॉलेजच्या मुख्य इमारतीकडे वळलो. रात्रीचे साडेदहा वाजले होते. सिनेमा बघून परतत होतो. सोबतीला कॉलेजमधीलच मित्र होते. सारे एकाच कॉलेजचे माजी विद्यार्थी, म्हणून रात्री घरी परतण्याऐवजी कॉलेजलाच मुक्काम टाकून मैहफिल जमवायचा बेत आखला. कॉलेजच्या मुख्य इमारतीचा एक मजला रात्रभर जागत असतो हे सवयीने माहीत होते.
मिसळपाव