Skip to main content

लेख

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/10/2014 04:15 या दिवशी प्रकाशित केले.
बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला!

स्वयंभू (संपूर्ण कथा)

लेखक बोबो यांनी बुधवार, 08/10/2014 00:58 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

उकिरडा

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 07/10/2014 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये, रबरी चेंडू - ८ रुपये, टेनिस चेंडू - २० रुपये ..... एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/10/2014 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली.

ऑक्टोबर मध्ये होणारे ३ कट्टे.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 06/10/2014 02:07 या दिवशी प्रकाशित केले.
ह्यावेळी डोंबोली, ठाणे आणि पुणे इथे ३ कट्टे होणार आहेत. डोंबोलीतला कट्टा नक्की झाला आहे. ठाण्यातील आणि पुण्यातील कट्या संदर्भातील इतर माहिती लवकरच कळवण्यात येईल. डोंबोली कट्ट्याची माहिती खालील प्रमाणे... १. ठिकाण ===> नंदी पॅलेस २. दिनांक ===> १८-१०-२०१४ ३. वेळ ====> संध्याकाळी ७:३० ४. संपर्काचे माध्यम ===> व्य.नि. करणे. डोंबोली कट्टा झाला की मग ठाणे कट्टा आणि मग पुणे कट्टा असा बेत आहे.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १२

लेखक स्पार्टाकस यांनी रविवार, 05/10/2014 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
९ सप्टेंबरला हर्शेल बेटावरुन आलेला मिशनरी फ्रेझर याची अ‍ॅमंडसेन आणि स्टेन यांच्याशी गाठ पडली. फ्रेझर मॅकेंझी नदीवर असलेल्या फोर्ट मॅकफर्सन इथे निघाला होता. त्याच्या जोडीला रॉक्सी हा एस्कीमोदेखील होता. किंग पॉईंटच्या पश्चिमेला चार मैलांवर एका तंबूत त्यांनी मुक्काम ठोकला होता. हर्शेल बेटाच्या परिसरात पाच जहाजं बर्फात अडकून पडलेली होती. त्याचबरोबर किंग पॉईंटच्या पूर्वेला आणखीन सहा जहाजं अडकल्याचंही त्याच्याकडून स्टेनला कळून आलं.

अवजारांप्रति कृतज्ञता

लेखक जागु यांनी शनिवार, 04/10/2014 12:56 या दिवशी प्रकाशित केले.
खालील लेख दिनांक ३ ऑक्टोबर २०१४ रोजी लोकसत्ता-वास्तुरंग पुरवणी मध्ये प्रकाशीत झाला आहे. http://www.loksatta.com/vasturang-news/dasra-1008880/ --------------------------------------------------------------------------------- दसरा म्हणजे मांगल्याचा दिवस. ह्या दिवशी विशेषकरून यंत्रे हत्यारांची पूजा केली जाते. अशीच पूजा शेतकरी कुटुंबे आपल्या शेतीच्या अवजारांची करतात. वर्षभर शेती-मळ्यांसाठी राबणार्‍या अवजारांना दसर्‍याच्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केले जाते. संध्याकाळी दिवेलागणीच्या वेळी रांगोळी काढून पाटावर अवजारे ठेवली जातात.

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - ११

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 04/10/2014 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
केप कॉलबॉर्न इथे पोहोचल्यावर अ‍ॅमंडसेनने सुटकेचा नि:श्वास टाकला! तो म्हणतो, "इथून पुढे जाताना सतत पाण्याची खोली मोजण्याची आवश्यकता नव्हती! आमच्या जहाजापेक्षा कितीतरी मोठी जहाजं इथपर्यंत येऊन परत गेली होती! जॉन रे, कॉलीन्सन, मॅक्क्युलर आणि इतरांच्या मेहनतीतून तयार झालेले अनेक नकाशे आता आम्हाला उपलब्ध होते! अज्ञात सागरातून मार्ग काढण्याची यापुढे आवश्यकता नव्हती!" शिडाच्या उपकरणाची दुरुस्ती केल्यावर उरलेला दिवसभर त्यांनी तिथे आराम केला.

अश्वत्थामा

लेखक निलरंजन यांनी शुक्रवार, 03/10/2014 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
अश्वत्थामा ... अंगिरा गोत्रात उत्पन्न भारद्वाज ॠषिंचे पौत्र अर्थात नातू व द्रोणाचार्य या दिव्य अयोनिज ऋषिंचा पुञ द्रोणाचार्यांनी वडिलांच्या आदेशानुसार धर्मपारायण, सुशील ,तपस्वी अश्या कृपी या कृपाचार्यांच्या बहिणीशी विवाह केला, या दिव्य दांपत्याला शंकराच्या घोर तपश्चर्येच्या नंतर दिव्य तेजस्वी असा अश्वत्थामा हा पुञ झाला जो जन्माला आल्या आल्या होते उच्चस्वारात घोड्या समान किंचाळला त्याचा स्वर दिशदिशांत घुमला और संपूर्ण नभोमंडल व्यापले तेव्हाच आकाशवाणी झाली कि हया बालकाचे नाव अश्वत्थामा होईल - पुत्र जन्मानंतर द्रोणाचार्य प्रसन्न झाले आणि ब्राह्मणांना सहस्त्र गायी व धनदान केले द्रोणाचार्यांकडे

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १०

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/10/2014 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
सप्टेंबरच्या अखेरीस आणि ऑक्टोबरच्या पहिल्या दोन आठवड्यात अ‍ॅमंडसेन, रिझवेल्ट आणि हॅन्सन जोडगोळीने ग्जो हेवनच्या आसपास पंचवीस मैलांच्या परिसरात शिकारीसाठी तीन मोहीमा केल्या. या सर्व मोहीमांत अनेक रेनडीयर आणि क्वचित पक्षी त्यांच्या हाती लागले. मागे राहीलेले चार एस्कीमो या सर्व मोहीमांत त्यांच्याबरोबर गेलेले होते! ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात अ‍ॅमंडसेन आणि हेल्मर हॅन्सन यांनी एका मोठ्या एस्कीमो तळाला भेट दिली आणि त्यांच्याकडून माशांचा भरपूर मोठा साठा विकत घेतला! २० नोव्हेंबरच्या सकाळी अ‍ॅमंडसेन आणि त्याचे सहकारी ग्जो वर ब्रेकफास्टच्या तयारीत असतानाच एक एस्कीमो त्यांच्या भेटीला आला.