Skip to main content

लेख

जंटलमन्स गेम - ७ - The Barnacle & The Tortoise

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 18/12/2015 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
१९५३ चा जून महिना.... लिंडसे हॅसेटच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ अ‍ॅशेस सिरीजसाठी इंग्लंडच्या दौर्‍यावर आला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघात स्वतः हॅसेट, आर्थर मॉरीस, नील हार्वे, कॉलिन मॅक्डोनाल्ड, ग्रॅहॅम होल असे बॅट्समन होते! डॉन टॅलनसारखा गाजलेला विकेटकीपर होता. रॉन आर्चर, डग रिंग, रिची बेनॉ, अ‍ॅलन डेव्हीडसन यांच्यासारखे ऑलराऊंडर्स संघात होते! त्याखेरीज फास्ट आणि स्पिन बॉलिंग सारख्याच परिणामकारकपणे टाकू शकणारा बिल जॉन्स्टनसारखा हरहुन्नरी बॉलरही होता!

चिठ्ठी

लेखक अद्द्या यांनी गुरुवार, 17/12/2015 01:04 या दिवशी प्रकाशित केले.
" चहा हवा असेल तर साखर घेऊन या राजे " आईने ने आज्ञा सोडली . तसा मी लगेच निघालो हि , चहा साठी काय पण . गल्लीच्या कोपऱ्यावर दुकान. नेहमीप्रमाणे गर्दी होतीच . कशाला उगाच गर्दीत शिरा.गर्दी जरा कमी झाली कि दुकानदार आपणच सांगेल . त्याला किलोभर साखर बांधायला सांगितली . आणि बाजूच्या कट्ट्यावर उभा राहिलो . तसा हि वेळच काढायचा होता . हे दुकान म्हणजे रोजच्या गावभारातल्या बातम्या मिळवण्याचं सर्वोत्तम ठिकाण. नेहमीची मंडळी होतीच आजूबाजूच्या गल्लीतली . मला बघितल्या बघितल्या बाळ्या हसला . "काय नाना , लई दिस खटे दिसला नैसाय ! " व्हय. कामाची वेळ ठरलेली नसते गा .

घोस्टहंटर-१

लेखक DEADPOOL यांनी बुधवार, 16/12/2015 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
"व्हू आर यू?" "युवर डेथ!" तो खाली कोसळला! "मनिष उठ!" एलिझाबेथ मनिषला उठवत होती. गेले काही दिवस मनिषचे झोपेचे प्रमाण वाढले होते. एलिझाबेथ याच काळजीत होती. शिवाय आताची केस तिच्या काळजीत भर घालत होती. ग्रेग मॉरिसन मर्डर केस! सर्व घोस्टहंटर यामुळे हादरले होते, कारण ग्रेग मॉरिसन हा घोस्टहंटर लोकांचा मुकुटमणी होता. जगात जिवंत लोक जेवढे भूतांना घाबरत नसतील तेवढी भुते ग्रेग मॉरिसनला घाबरत असत. "झोपू दे मला!" "अरे मूर्ख उठ!" "मी केस सॉल्व करतोय." एलिझाबेथ आता पूर्णपणे कंटाळली होती. कारण ग्रेगच्या अँत्यविधिला सर्व घोस्टहंटर हजर राहणार होते.

मोसाद - भाग १

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 16/12/2015 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
1 . जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पुरातन व्यवसाय (the second oldest profession in the World) म्हणजे हेरगिरी. जवळपास सर्व देशांकडे आज गुप्तचर संघटना किंवा संस्था आहेत आणि त्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल, आदर, दरारा, भीती, तिरस्कार अशा विविध भावना असतात. गुप्तचर किंवा हेर हे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात आहेत. आर्य चाणक्यांच्या ‘अर्थशास्त्र ‘ मध्ये गुप्तहेरांचा उल्लेख सापडतो.

अहिराणीच्या निमित्ताने बोलींचे भवितव्य

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी मंगळवार, 15/12/2015 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक कानाकोपर्‍यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते.

सलाफी-वहाबी-दहशतवाद....१

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 13/12/2015 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
इस्लाममधील वहाबी किंवा सलाफी पंथ- दहशतवादाचे मुळ. इस्लाम धर्मात दोन पंथ आहेत हे आपणा सर्वांना माहित आहेच. एक शिया व दुसरा सुन्नी. यातील सुन्नीधर्मात अनेक अतिरेकी उप पंथाची उत्पत्ती झाली ज्याने हा पंथ सध्या जगात बदनाम झाला आहे त्यातीलच एक म्हणजे वहाबी पंथ. बऱ्याच जणांना असे वाटते की व हल्ली जगात जे इस्लामी अतिरेकाचे वारे वहात आहे ते या नवीन काळातील उत्पत्ती आहे पण वहाबींनी पहिली कत्तल केली ती सुन्नी पंथियांची आणि ती सुद्धा शेकडो वर्षापूर्वी. ही कत्तल झाली सौदी अरेबियामधे.

एक आटपाट नगर होतं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 12/12/2015 08:24 या दिवशी प्रकाशित केले.
त्यावेळी व्हिडियो गेम्स नव्हते.त्यामुळे आमचे खेळ मैदानातच व्हायचे.रात्री जेवल्यानंतर दमल्यामुळे झोपेची पेंग यायला सुरवात व्हायची.बरेच वेळा झोपताना आम्ही आजोबांना गोष्ट सांगायला सांगायचो. बर्‍याच गोष्टी आम्हाला त्यांनी सांगीतल्या आहेत.त्यातली "एक आटपाट नगर होतं " ही त्यांची पेट गोष्ट आम्हाला फार आवडायची. आजोबा म्हणायचे, "एक आटपाट नगर होतं.तिथे राजा-राणी राज्य करायची.त्यांचा एक प्रधान होता.तो पण राजा-राणीच्या सत्त्तेत सामिल असणार हे उघड होतं.परंतु, राजाच्या बाजूने असलेली जनता आणि प्रधानाच्या बाजूने असलेली जनता यामधे चूरस असायची.असं असूनही वरकरणी राजा-प्रधानाची युतीची सत्ता होती असं भासवलं जायच

कडेमनी कंपाऊंड

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 11/12/2015 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
जी ए कुलकर्णींच्या स्मृतीस..... कडेमनी कंपाऊंडमध्ये बसून एक माणूस लिहायचा. अंगावर कातडी नसलेल्या माणसांच्या कथा त्याने इतक्या सोलीवपणे लिहिल्या, कि अंगभर कातडी असूनही आम्हाला पुन्हा नव्याने आरशात पहावे लागले. पुस्तके मनाचा आरसा असतात, कि फुटलेल्या काचेतून आरपार जाणारे माणसाचे अंतर्मन असते! पुस्तकांच्या नावापासूनच मनाचा कुठला तरी कोपरा धरधरीत अंधारात गळपटायचा. ‘रमलखुणा’ म्हटलं कि, आजही वाळूवर कुणीतरी काही गूढ लिहून गेलंय, त्याचा अर्थ लावता लावता माणसं परागंदा होतात, असं वाटतं. ‘काजळमाया’ आणि ‘पिंगळावेळ’ आयुष्याच्या मध्यरात्रीही दचकून जागे करतात.

जंटलमन्स गेम - ६ - वर्ल्ड सिरीज

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 11/12/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
१९७५ चा फेव्रुवारी महिना.... माईक डेनेसच्या नेतृत्वात इंग्लंडचा संघा अ‍ॅशेस सिरीजसाठी ऑस्ट्रेलियात आला होता. पाचपैकी चार टेस्ट्स जिंकून ऑस्ट्रेलियाने सिरीज जिंकली होतीच पण त्याहीपेक्षा त्यांनी इंग्लंडचे अक्षरश: हाल केले होते! याला कारणीभूत होते ते स्ट्रेस फॅक्चरमधून सावरुन पुन्हा ऑस्ट्रेलियन संघात परतलेला डेनिस लिली आणि पायाचं हाड मोडलेल्या अवस्थेत टेस्ट पदार्पण केल्यामुळे पार निष्प्रभ ठरलेला परंतु आता पूर्ण सावरलेला जेफ्री रॉबर्ट थॉमसन! लिली आणि थॉमसन यांना तोंड देताना इंग्लिश बॅट्समनची जी काही द्यनिय अवस्था झाली होती त्याला तोड नव्हती!

परीकथा भाग ५ - (फेसबूक स्टेटस १.७ ते १.९ वर्षे)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 10/12/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
. ३१ ऑक्टोबर २०१५ आमच्या एफ एम रेडिओला सिग्नल मिळायला सुरुवात झाली आहे. हल्ली रोज नॉनस्टॉप नॉनसेन्स प्रादेशिक चॅनेल लागतात. नक्की कुठल्या प्रदेशाचे कार्यक्रम चालू असतात ते नाही समजत, पण योग्य ती फ्रिक्वेन्सी पकडली की मध्येच एखादा मराठी शब्द निघतो :) . . ५ नोव्हेंबर २०१५ बाथरूम ही आपल्याला पर्सनल स्पेस देणारी प्रायव्हेट जागा असते असा एक समज आहे. पण आमच्याकडे ते सुखही नाही. तिला त्या क्षणी जगातली तीच व्यक्ती सर्वात लाडकी होते जी बाथरूममध्ये असते. मग ती मम्मी असो वा पप्पा, दारावर थडाथड लाथाबुक्के बसायला सुरुवात होते. काल मात्र ही थडथड दोन्हीकडून अनुभवली.