Skip to main content

लेख

Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे

लेखक सुधीर वैद्य यांनी रविवार, 03/01/2016 09:59 या दिवशी प्रकाशित केले.
४४१) Selfie सेल्फी / लेखक : शिल्पा नवलकर / दिग्दर्शक : अजित भुरे Selfie - सेल्फी हे नाटक नुकतेच बघितले. नाटक खूप भारावून टाकणारे आहे. अश्या धाडसी विषयावर नाटक लिहून समाज प्रबोधनाचा प्रयत्न केल्याबद्दल लेखिकेचे मनापासून अभिनंदन. नाटकाचा विषय: ट्रेन वेळापत्रकानुसार धावत नसल्यामुळे एका रेल्वे स्टेशनच्या महिला वेटिंग रूम मध्ये ५ स्त्रिया अडकून पडतात. वेळ घालवण्यासाठी म्हणून एकमेकींशी ओळख करून घेतात. सहज बोलता बोलता त्या स्वत:चे आयुष्य share करतात. अनेक वेळा मनातील खोल जखम अनोळखी माणसासमोर बोलायला लाज वाटत नाही.

कळसूत्र आणि Life of Brian

लेखक Anand More यांनी गुरुवार, 31/12/2015 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
काजळमाया हे जी ए कुलकर्णींचे एक पुस्तक. लहानपणी वाचलेले. नंतर विसरलेलो. पुन्हा वाचायला घेतले. काल त्यातली कळसूत्र ही कथा वाचत होतो. दूर डोंगरात राहणारी, आदिमानवाच्या आस्था बाळगणारी आणि निसर्गावर अंधविश्वास ठेवणारी एक टोळी. त्यांचा प्रमुख म्हणजे लाल गरुडाचं चिन्ह अंगावर रंगवलेला माणूस.

लकी

लेखक मीन यांनी गुरुवार, 31/12/2015 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
आई गंऽऽ! खूप कंटाळा आलाय आज. खूप दिवस काही काम केलं नाही. कुठे बाहेर फिरायलाही गेले नाही. अश्शी एका जागी बसून आहे. मी मुळात आळशी नाही बरं का! खूप कामसू आहे. लोकांना मदत करायला खूप आवडतं मला. कुठे काही वाईट घडलं की जशी काही मला सूचनाच मिळते. डोळ्यांसमोर लाल वर्तुळं दिसतात. कानात भोंगे वाजू लागतात. एक प्रकारचा सिक्स्थ सेन्सच म्हणा ना. मग मी अगदी धावपळ करुन लोकांच्या मदतीला जाते. आणि एक अभिमानाची गोष्ट सांगू? मी आजपर्यंत ज्यांना ज्यांना मदत केलीये, त्या सर्वांवरील संकट टळून ते अगदी सुखरुप बचावले आहेत. म्हणूनच माझे मित्र, नातेवाईक सगळेजण मला ‘लकी’ म्हणतात. माझे खूप लाड करतात.

छंदाच्या पलीकडे

लेखक केतन बारापात्रे यांनी गुरुवार, 31/12/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक भेटी पूर्ण झालेल्या किंवा न झालेल्या, अनेक संवाद झालेले किंवा न झालेले त्यांच्याशी अतुटपणे जोडल्या गेले असतात समाधान आणि असामाधान दोन्ही एकाच रथावर जुंपल्यासारखे त्यांच्यासोबत चालत राहतात, समाधान आणि असमाधान एकसोबत जुंपलेले असूनही त्यांच्या सुरात तालात कमालीची शांतता आणि धीर असतो आणि ते फक्त आणि फक्त अनुभवायच असत. गझल किंवा ठुमरी यांचं माझ्यासोबतच वेगळच नात आहे खरंतर त्यांच्याशी नात जुळायला वेळ लागत नाही हे अत्यंत हळवं आणि तितकच जिव्हाळ्याच असत, विशेष म्हणजे याला कसलीच बांधिलकी नसते,कुठले करार नाही,कुठलीच मागणी नाही हे नात फक्त देण्यासाठी असत.

शोध राजीव हत्येचा भाग १

लेखक गुल्लू दादा यांनी बुधवार, 30/12/2015 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्यातल्या कडक उन्हामुळे मोहनचे डोके ठणकत होते , अंगातून घाम सतत पाझरत होता . मनाने तर संपच पुकारला होता , कशातच मन लागत नव्हते . 2 महिन्यांखालीच त्याची पोलिस उपायुक्तपदी नियुक्ती झाल्यामुळे अतिरिक्त भार खांद्यावर पडला होता . तेव्हापासून एकही रजा त्याच्या वाट्याला आली नव्हती . शरीर आता आराम मागत होते . तेवढ्यात हॉलमधला फोन वाजला . मोहनने उठायचे कष्ट नकोत म्हणून बायकोलाच कॉल उचलण्यास सांगितले . बायकोने साहेबांचा कॉल असल्याचे सांगताच , मोहन ताडकन उठून बसत म्हणाला , " जेवणाच्या सुट्टीत पण पिच्छा सोडत नाहीत ही साहेब लोकं ." साहेबांशी बोलत असतानाच, त्याची कळी एकदम खुलली .

शेवटची ट्रेन

लेखक अज्ञात यांनी बुधवार, 30/12/2015 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटची ट्रेन शेवटची ट्रेन होती वाटतं, मनगटावरचं घड्याळ स्पष्ट दिसत नव्हतं, अगदी प्लेटफार्म वरचं मोठं घड्याळ ही! मी ट्रेन मधून बाहेर पाहिले… काहीच हाल-चाल नाही, माझ्या समोर एक प्रचंड वयस्कर माणूस बसलेला, जाड भिंगाचा चश्मा, पांढरी दाढी, डोक्यावर लोकरीची टोपी, काळं हाफ-ज्याकेट...मळलेला लेंगा, एका पायात स्लीपर, दुसऱ्या पायात चप्पल, तेवढ्यात ट्रेन सुटली... ट्रेननी जसा वेग पकडला तसा एक माणूस ट्रेनमध्ये चढला, अगदी माझ्यासमोर बसलेला म्हातारा आणि तो जसे जुळे भाउच... इतके साम्य!!! तो दरवाज्यापाशीच उभा होता, मी माझा चष्मा लावला...

हॅपी न्यू इयर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी बुधवार, 30/12/2015 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सुधीर रा. देवरे (31 डिसेंबर 1999 साली अहिराणी भाषेत लिहिलेला हा ललित लेख ‘अहिराणी वट्टा’ या माझ्या पुस्तकात- पद्मगंधा प्रकाशन पुणे- समाविष्ट झाला आहे. कोणतेही संपादन न करता ब्लॉग म्हणून देतोय.) दरवरीसले डिसेंबर महिना लागा का सगळास्ले ३१ डिसेंबरना यम लागी जातंस. येकतीस डिसेंबर हाऊ याळ आपू कशा साजरा कराना हाऊ सोबतीस्मा भयान मोठा प्रश्ननागत चावळाना इशय व्हयी जास. मंग उघरानी किती काढनी, पार्टी कुठे करनी, चोखी करनी का तिखी करनी हायी ठरंस. काही सोबतीस्ना घोळकामा पार्टी वल्ली करानी का कोयडी हायीबी ठरंस.

मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी

लेखक शीतल जोशी यांनी बुधवार, 30/12/2015 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
मंगेश पाडगावकर: जगणे शिकवणारा कवी आज कवी मंगेश पाडगावकर यांचे दुख:द निधन झाले. त्यांच्या कविता नेहमीच आपल्या मनात असतील आणि मंगेश पाडगावकर हि. अगदी लहानपणापासून मला कविता आवडायच्या, बालकवींची निर्झरास आणि औदुंबर तर मी पाठच केली होती. पण पहिल्यांदा कविता सोपी आणि जवळची वाटली जेव्हा "बोलगाणी" हातात पडले . सहज सोप्या वाटणारया कविता, परत परत वाचल्या आणि त्या मागे असणार विचार हि कळत गेला. सोपे आणि सहज वाटणारे लिखाण हे सगळ्यात अवघड. शब्दांना बोलके करणारी हि कविता मला भावली आणि पहिल्यांदा मला वाटले कि हे शब्द आपणही गुंफावे कि, बघू आपले शब्द बोलके होतात का.

मोसाद - भाग ३

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 30/12/2015 00:30 या दिवशी प्रकाशित केले.
1 . मोसाद - भाग ३ या सगळ्याची सुरुवात झाली होती, ती एका प्रेमप्रकरणातून. वर्ष होतं १९५६. अमेरिका आणि सोविएत रशिया यांच्यातलं शीतयुद्ध ऐन भरात होतं. रशियाच्या अंकित राष्ट्रांमध्ये कम्युनिस्ट राजवटींनी अगदी व्यवस्थित पाय रोवले होते. या राष्ट्रांमधला एक महत्वाचा देश म्हणजे पोलंड.

‪‎मी उत्सवला जातो‬ (भाग ४)

लेखक Anand More यांनी मंगळवार, 29/12/2015 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ____________________________________________________________________________________ खाण्याच्या स्टॉल्सच्या ठिकाणी सगळीकडे फिरत आधी काय काय आहे त्याची चाचपणी केली. वेगवेगळे स्टॉल छान सजले होते. कुठे महाराष्ट्रीयन, कुठे चायनीज, कुठे राजस्थानी, कुठे मालवणी, कुठे पाव भाजी, कुठे दाबेली, कुठे चाट, तर कुठे काय अशी सगळी चंगळ होती. मी डाएट वर असल्याचे माझ्या ध्यानात होतं. म्हणून पहिला मोर्चा फळांच्या स्टॉलकडे वळवला. एक मोठा बाउल भरून फळांचे काप घेतले आणि ते खाण्यासाठी दिलेले लाकडी दातकोरणे फेकून सरळ हाताने खाऊ लागलो. कुणाला टोचून बोलणे मला अजून जमत नाही मग टोचून खाणे काय जमणार. म्हणून पाचही बोटांनी फळांना गुदगुल्या करत मोठ्या मजेने रसास्वाद घेऊ लागलो.