Skip to main content

लेख

मन्या आणि डावक्या

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 16/01/2016 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मन्या आणि डावक्या ============== मन्या आणि डावक्या दोघं एकाच शाळेमध्ये , एकाच इयत्तेत शिकत होते . दोघांचे वर्ग तेवढे वेगळे होते . शाळेला जाण्या येण्याच्या बसमध्ये हे दोघे कायम एकत्र असत . त्यामुळे त्यांची चांगली मैत्री झाली होती . तसे बघायला गेले तर डावक्याचे खरे नाव "रवीकिरण" असे होते . पण त्याच्या वर्गामध्ये तो एकटाच डावखुरा होता . त्यामुळे वर्गातील इतर मुलांनी त्याचे नाव "डावरया" पाडले होते . तेच पुढे बदलत बदलत "डावक्या" असे झाले होते . आज मधली सुट्टी संपल्यानंतर मन्याच्या वर्गात गणिताचा तास होता . सरांनी काही गणिते सगळ्या मुलांना सोडवायला दिली होती .

शोध राजीव हत्येचा भाग-२

लेखक गुल्लू दादा यांनी शनिवार, 16/01/2016 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
21 मे 1991 रात्री 10.30 वाजता दिल्ली पोलिस मुख्यालयातील फोन खणाणला. त्याची घंटा नेहमीपेक्षा बेसुर वाजत होती. एखाद्या विदारक घटनेची चाहुलच जणू ती. शिपायाने फोन उचलताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली, हात पाय गारठले, त्याच्या चेहऱ्याचा नूरच पालटला. मजकूर होता 10 मिनिटांपूर्वी झालेली राजीव हत्या. घटना वाऱ्यासारखी देशभर पसरली. कोणाचाही या घटनेवर विश्वास बसत नव्हता. अजुन कोणत्याही प्रसार माध्यमातून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. तरीसुद्धा देशात शोकाकूल वातावरण तयार झाले होते.

साहित्यिक कसले हे !

लेखक सुधीर मुतालीक यांनी शनिवार, 16/01/2016 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यिक नामक जमात - कदाचित बहुसंख्येने - व्यवहारात म्हणजे प्रत्यक्ष जीवनात सुमारे कशी असते याचे प्रतिबिंबच "दरवर्षी" "वाजतगाजत" ( म्हणजे बोंबाबोंब करत ) साजरे होणा-या साहित्य संमेलनात दिसते !!! ते साहित्य संमेलन आले की काही तरी वादविवाद, हाणामारी, पेपरबाजी होणार हे अगदी ठरून गेलंय. म्हंजे एखाद्या साहित्यीकाविषयी काहीतरी भलते सलते लिहून आले की संमेलन आले असे ओळखावे इतके !! साहित्याव्यतिरिक्त अन्य संमेलनाच्या बाबतीत असे का नाही होत ? उदाहरण सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे घ्या.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

न्यूरेंबर्गचा निकाल - द डेथ परेड

लेखक ऋत्विका यांनी शुक्रवार, 15/01/2016 08:46 या दिवशी प्रकाशित केले.
१६ ऑक्टोबर १९४६.. जर्मनीतल्या न्यूरेंबर्ग तुरुंगातल्या जिम्नॅशियममध्ये अमेरीकन सेनाधिकार्‍यांची आणि सैनिकांची एकच लगबग सुरू होती. जिम्नॅशियमची ती जागा सुमारे ८० फूट लांब आणि ३३ फूट रुंद होती. अवघ्या तीन दिवसांपूर्वीच इथे अमेरीकन सैन्यातील सिक्युरीटी गार्ड्सच्या दोन संघात इथे बास्केटबॉलचा सामना रंगला होता. परंतु आता या क्षणी मात्रं तिथे एका वेगळीच तयारी सुरु होती. ही तयारी होती ती जागतिक इतिहासातील एका अत्यंत ऐतिहासिक खटल्याच्या निकालाच्या अंमलबजावणीची! या खटल्यात एकूण १२ जणांना देहांत शासनाची शिक्षा फर्मावण्यात आली होती!

देह देवाचे मंदिर

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी गुरुवार, 14/01/2016 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देव कुठून येतात? देव कसे तयार होतात? देव हे आधी माणूस म्हणून जन्माला येतात का? चारचौघांसारखी जन्माला आलेली माणसं, देव होऊन असे कसे अजरामर होऊन जातात? देव ही प्रतिभावान माणसाची निर्मिती आहे का? देवाच्या नावाने प्रश्नच प्रश्न. पण हे प्रश्न प्रत्येकाला सतावत नाहीत, हाच खरा मोठा प्रश्न आहे. हा लेख लिहीत असताना एक गोष्ट माझ्या प्रकर्षाने लक्षात आली. प्रथितयश देवांनी कधीही जनसमुदायासमोर मोठमोठी प्रवचने दिली नाहीत. भाषणे केली नाहीत. खूप मोठे उपदेश कोणाला केले नाहीत. त्यांच्या घरात वा चौकात आठवडी वा मासिक सत्संगाचे कार्यक्रम आयोजित केल्याची कुठे नोंद नाही.

गोधडीची चोरी

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 14/01/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
गावात सगळी कडे निरव शांतता होती. रात्रीचे बहुतेक ११ वाजले होते. दिनुला घरी येऊन दोन दिवसच झाले होते. (एस वाय . बि एस सी ) चे पेपर संपल्यामुळे तो सुट्टयात घरी आला होता. बाहेर अंगणात खाटेवर दिनु गाढ झोपेत होता . अचानक त्याला एक भयानक स्वप्न दिसले आणि तो दचकुन जागा झाला . आजुबाजुला बघतो तर काळा भिन्न अंधार होता. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. ईतक्यात समोरुन कुणी तरी पळत जात असल्याचा आवाज दिनुला आला तो चपलांचा आवाज दिनुने ऐकला. तो सावध पणे ऐकु लागला तर तो आवाज थोड्याच वेळात येईनासा झाला.

बंगाली मातीचा साजरा बुरूज

लेखक माहितगार यांनी रविवार, 10/01/2016 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी क्रिकेटची बातमी खुपच हौशी क्रिडा रसिक असाल तर फुटबॉलची बातमी, कधी मधी राजकारणाच्या निमीत्ताने-कम्युनीस्ट किंवा आजकाल ममता बॅनर्जी- अल्पसा उल्लेखाच्या बातम्या फारफारतर बांग्लादेशींची घुसपैठ या पलिकडे 'कलकत्ता' आणि 'पश्चिम बंगाल' हा विषय तुमच्या माझ्या सर्वासामान्य मराठी माणसाच्या फारसा नजरेस येत नाही. विचारवंत आणि रॅशनलीस्ट असलेल्या बंगाली बाबूंनी गेली ३० ३५ वर्षे कम्युनीस्टांना लोकशाही मार्गाने स्वत:हून वाहून दिली होती म्हटल्यावर पश्चिम बंगाल मधला सेक्युल्रीझमचा झेंडा चांगलाच गाढ असेल आणि ब्राह्मोस्माज - विवेकानंदांची ते रबिंद्रनाथ टागोरांची पुरोगामी प्रतिमा आणि पश्चिम बंगाल बद्द्ल अस्म

बंडयादादाची फेफे - कथा

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 10/01/2016 01:59 या दिवशी प्रकाशित केले.
----------बंडयादादाची फेफे - कथा ------------ "चला , विद्याभवन शाळेचा स्टॉप आला. ए पोरा, तुला इथच उतरायचं आहे ना?" कंडक्टरचा आवाज बसमध्ये घुमला. देवीदास गडबडीने बसमधून उतरला . बराच वेळ बस प्रवास झाल्याने तो जरा कंटाळून गेला होता . पण समोरची विदयाभवन शाळेची भव्य ईमारत पाहून त्याचा कंटाळा पळून गेला . आज तो या शाळेमध्ये अ‍ॅडमिशन घेण्यासाठी आला होता . त्याने एकदा खिशामधले घरातून निघताना आईने फीसाठी दिलेले पैसे तपासले . व तो गेट मधून शाळेच्या आवारामध्ये शिरला . शाळेमध्ये तुरळक शिक्षक , विद्यार्थी व पालक यांची लगबग चालू होती . शाळेचे वर्ग सुरु झालेले दिसत नव्हते .

दिनुची प्रेमकथा भाग १

लेखक दिनु गवळी यांनी शुक्रवार, 08/01/2016 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
दिनुची प्रेम कहाणी ( एक सत्य कथा ) भाग १ आज दिनु थोडा ऊदास दिसत होता . रवी ने त्याला नाराजीच कारण विचारल पण दिनु आज काहीच बोलत नव्हता मुकाट्याने टेकडीची वाट चढत होता त्याच्या पाठीमागे रवी ,, शेवटी रवीने त्याचा हात पकडला व त्याला खोदुन विचारले तेव्हा कुठे दिनु ने तोंडातुन उच्चार काढला अगदी बारीक आवाजात तो बोलला ' अरे रवी काल तिला बघायला स्थळ आल होतं रे ! ओ हो अच्छा तर हे कारण आहे माझ्या मित्राच्या नाराजीच ,, अरे रवी तुला मजाक वाटतोय का ? अरे मी तिच्या शिवाय नाही जगु शकत आणि ती तर जीवच देईल कारण कालच ती मला म्हणाली होती .